
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८८२
सांवळीये बुंथी सांवळिया रूपें । सांवळिया स्वरूपें वेधियेलें ॥१॥ काय करूंगे माये सांवळे न सोडी । इंद्रिया इंद्रिय जोडी एकतत्त्वें ॥२॥ कैसे याचें तेज सांवळे अरूवार । कृष्णी कृष्ण नीर सतेजपणे ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचे खुणे । सांवळेंची होणें यासी ध्याता ॥४॥
अर्थ:-
शामवर्ण खोळीत शामवर्णरूपाने असलेल्या परमात्म्याने त्या सांवळ्या स्वरूपाचे मला वेडच लावले. काय करावे, हे रूप माझ्या डोळ्यांत भरून गेले. ते मला सोडावेसे वाटत नाही. त्याच्या योगाने इंद्रिय एकरूप झाली. काय या शामसुंदर कृष्णाचे तेज सांगावे. ते नीलवणनि त्याच्याठिकाणीं शोभते. निवृत्तीनाथांच्या उपदेशाने याचे ध्यान करू गेले असता आपणही सांवळे रूप होऊन जावू असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
