👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके गौळणी अभंग ८६३
मे दुरर्थी कर जोडुं । ताऱ्हो सेवा न जाणुं ॥१॥ मन्हा रे कान्हा मन्हा रे कान्हा । देखी कां न गिणा रे मन्हा कान्हा रे ॥२॥ तऱ्हा मराठा देश । मन्ही बागलाणी भाष ॥३॥ घटि पटि विजार । खंडे भाले तरवार । बापरखुमादेविवरु जाण ऐसें मन्हा कान्हा ॥४॥
अर्थ:-
नाशिक जिल्हाच्या उत्तरेच्या भागाला बागलाणी भाषा आहे. त्या भाषेत एक गौळण म्हणते. हे श्रीकृष्णा, मी दोन्ही हात जोडून तुला शरण आले आहे. तुझी सेवा कशी करावी हे मला माहित नाही. मला असे वाटते की तुला डोळे भरुन पाहावे. व कांनानी तुझे गुणानुवाद ऐकावे हे श्रीकृष्णा, तूं महाराष्ट्र देशांत राहाणारा व माझी (वेडी) बागलाणी भाषा असल्यामुळे मी तुला कशी आळवू ? हे मला कळत नाही. शास्त्रातील घटा पटाचा विचार मोडून काढण्याला तुझे नामोश्चरण ही एक ढाल तलवारच आहे. हे माझा कान्हा श्रीकृष्णा तूंच माझे पिता व रखुमादेवीचे पती, श्रीविठ्ठल आहेस असे माऊली सांगतात.
