ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 862

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके  गौळणीअभंग ८६२

ठाकुनी आलिये तुजपासीं । थिते मुकलिये मनुष्यपणासी ॥१॥ भलें केलें विठ्ठला पिके भरला साऊला । घरींची कोपती सोडी जाऊंदे वहिला ॥२॥ संसार साऊला माझा पालटुनी देसी । तरी मी होईन तुझी कामारी दासी ॥३॥ संसार साऊला माझा पालटुनी देसी । बापरखुमादेविवरा विठ्ठला गुणराशी ॥४॥

अर्थ:-

एक गवळण म्हणते. हे श्रीकृष्णा मी तुझ्याजवळ आल्याबरोबर मी आपल्या मनुष्यपणाला म्हणजे जीवभावाला मुकून गेले. तुझ्याजवळ आल्याबरोबर तूं माझे अंगावर पिचकारी मारलीस. त्यामुळे माझे वस्त्र सगळे भिजून गेले. तूं हे चांगले केलेस का? अरे हे पाहिल्यावर माझ्या घरची मंडळी माझ्यावर फार रागावतील. म्हणून मला लवकर घरी जाऊ दे. हे माझे संसाराचे वस्त्र जर पालटून देशील म्हणजे ज्या संसारास मी सत्य समजत होते. त्याचा मिथ्यात्व निश्चय करुन टाकशील तर मी तुझी कष्ट करणारी दासी होईन. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी माझे हे संसाररुपी वस्त्र पालटून दिल्यामुळे मी त्याचे गुणराशी म्हणजे निर्गुण स्वरुपाशी एकरुप झाले. असे माऊली सांगतात.

Leave a Reply