ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 827

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८२७

सखी सांगे सार शांति क्षमा दया । प्रपंच विलया बरळ पोशी ॥१॥ सखी म्हणे एका दुजी म्हणे अनेकां । अनेकीं सम्यका गुरुगम्य ॥२॥ सावध निबंध आद्याचा उकल । रसनेचालपालन रसना तोयें ॥३॥ ज्ञानदेव सांगे रखुमादेवी जप । अगम्य संकल्प एक दिसे ॥४॥

अर्थ:-

एक सखी, दुसरीस सांगते हा सर्व प्रपंच असार असून त्यामध्ये सार जर काय असेल तर शांति क्षमा दया ह्या होत. त्या सोडून नाशवंत प्रपंचाचे आपण वेड्यांसारखे फुकट पोषण करतो. जे परमात्मतत्त्व प्राप्त होणार ते तत्त्व एकच आहे. अशी एक सखी म्हणते तर दुसरी म्हणते. अनेक तत्त्व आहेत पहिली म्हणते अग त्या अनेक तत्त्वांमध्ये एकच परमतत्त्व कसे आहे. असे विचारशील तर ते गुरुगम्य आहे. म्हणजे गुरुपासूनच समजून घेतले पाहिजे. समजून घेतेवेळी सावधान चित्त असून त्याला प्रतिबंध कोणताही असू नये. अशा स्थितीत आपण तत्त्वांचा उलगडा करुन घ्यावा. त्याची चव बुद्धिरुपी रसनेनेच घेतली पाहिजे. अगम्य प्राप्तीचा मनांत संकल्प धरुन त्याच्या नामाचा जप केला असता त्याची प्रतिती होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading