ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 826

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८२६

सखीप्रती सखी आदरें करी प्रश्न । जीव शिव पूर्ण कैसा दिसे ॥१॥ सखी सांगे मात उभयता ब्रह्म । नाहीं हो विषम हरीवीण ॥२॥ सूर्यप्रकाश मही घटमठी समता । तैसा हा उभयतां बिंब एका ॥३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठल जीवाचा । व्यापक शिवाचा शिवपणे ॥४॥

अर्थ:-

एक सखी, आपल्या मैत्रिणीस आदराने विचारते. कां ग जीव, पूर्ण शिव म्हणजे परमात्मा कसा दिसावा? मैत्रिण उत्तर देते की त्या दोन्ही दशा ब्रह्मरूपच आहेत हरिवांचून त्यामध्ये दुसरी विषमता काहीच नाही. ज्याप्रमाणे पृथ्वीवर घटांवर प्रकाश पाडणारा एकच सूर्य आहे. त्याप्रमाणे या देहामध्ये आत्मा एकच आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच जीवपणाने जीवांत व शिवपणाने शिवांत व्यापक आहते असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading