ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.777

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७७७ 

कमळावरी कमळ ठेवुनी उल्हाटे । कमळी कमळ उफाराटें गे माय ॥१॥ वासना निरसलिये वासना निरसलिये । ब्रह्मकमळी उगवलीये गे बाईये ॥२॥ कारण कामातें करुनी आपैतें । महाकारण तें गगना परौतें गे बाईये ॥३॥ बापरखुमादेविवर विठ्ठल तेजसु । ब्रह्मकमळी दावितां प्रकाशु गे बाईये ॥४॥

अर्थ:-

भगवान श्रीकृष्ण आपले चरणकमळ, दुसऱ्या चरणकमलावर ठेवून दिडक्या पायावर उभेआहेत.त्याकडे पाहून अंतःकरणातील वैषयिक वासना नाहीसी होऊन हृदय ब्रह्मकमळी तें श्रीकृष्णाचे चरण उगवले.त्यामुळे कारण शरीर म्हणजे व्यष्टी अज्ञान त्यांत वैषयिक कामना त्याचे संस्कार सहजच असतात. त्याचा निरास केला असता महाकारणदेह म्हणजे परमात्मस्वरुप प्रगट होते. ही स्थिती गगनाच्याही पलीकडची आहे म्हणजे त्या स्वरुपांत सर्व अनात्मपदार्थाचा अभाव असतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते हृदयकमळामध्ये स्वरुपज्ञान दाखविणारे आहते असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading