ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.778

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७७८

निरखित निरखित गेलीये । पाहें तंव तन्मय जालिये ॥१॥ उन्मनीं मन निवालें । सांवळे परब्रह्म भासलें ॥२॥ रुप येवोनियां डोळां बैसलें । पाहें तंव परब्रह्म अवतरलें ॥३॥ बापरखुमादेविवरें विठ्ठलें । मूस ओतूनियां मेण सांडिलें ॥४॥

अर्थ:-

निरखित निरखित म्हणजे श्रवण, मनन, निजिध्यासन करीत, करित वा पंचकोशाचा निरास करीत करीत किंवा नामस्मरणादि भक्ति करीत करीत श्रीकृष्ण परमात्म्याला पहावयाला म्हणून गेले. तो त्याला पाहाताक्षणीच मी तद्रूप झाले. उन्मन जो परमात्मा त्याचे ठिकाणी मन शांत होऊन तो सांवळा श्रीकृष्ण परब्रह्म भासला. त्याचे रुप माझ्या डोळ्यांत येऊन बसले. विचार करुन पाहिले तर परब्रह्मच माझ्या शरीरांत अवतीर्ण झाले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यानी माझ्या शरीरुपी मुसीत परमात्मस्वरुप ओतल्याबरोबर अनात्मभावाचे मेण सर्व नाहीसे होऊन गेले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading