ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.776

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७७६

तुजमाजी विरावें तुज गिळुनी राहावें । तुझें रूप पाहावें रुपेंवीण ॥१॥ तूतें अवघे गुज म्यां सांगावें । वाचेवीण बोलावें निःशब्दाकारें ॥२॥ रखुमादेविवरु वाचे विनविला । प्रसन्न जाला ब्रह्म दाउनी ॥३॥

अर्थ:-

तुझ्या स्वरुपांत मी विरुन तुलाच गिळून टाकलें, दिसणाऱ्या रुपावांचून जे तुझे यथार्थ अरुपरुप आहे ते पाहावें.आणि असे तुझ्या स्वरुपाच गुह्य मी वाचेवांचून सांगावे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते माझ्या वाणीने आळविले त्यामुळे ते प्रसन्न झाले व त्यानी ब्रह्म दाखविले.असे माऊली सांगतात.

Leave a Reply