ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.769

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७६९

अकरावरी सातवें होतें । सातवें कोठें मावळलें गे माये ॥१॥ सहस्राची भरोवरी जाली गे माये । लय लक्षी पाहे तंव चोजवेना ॥२॥ रखुमादेविवरु दोन्ही घेतलीं । विरुनि टाकिली ब्रह्मडोहीं ॥३॥

अर्थ:-

दहा इंद्रिये आणि अकरावे मन याच्याही पलीकडे असलेले तसेच सहा शास्त्रांच्या पलीकडे असलेले जे सातवे आत्मतत्त्व त्या आत्मतत्त्वाच्या ठिकाणी हजारो नावे असलेला परमात्मा त्याच्या ठिकाणी सर्वाचा लय होऊन गेला. शेवटी आत्मतत्त्व असे म्हणण्याचाही लय होऊन गेला. याचे चिंतन करुन पाहिले असता काही कळून येत नाही. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ठिकाणी ब्रह्मरुपी डोहांत जीव शिवादि कल्पना विरुन गेल्या. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading