👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७७०
नेत्र लाउनी मनासी जंव पुसों जाय । तंव देवें नवल केलें गे बाईये ॥१॥ देवें नवल केलें देवें नवल केलें । शेखीं सांगतां लाजिरवाणे ॥२॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलें । माझें बाह्य अभ्यंतर व्यापिलें ॥३॥
अर्थ:-
डोळे लाऊन म्हणजे विचार करून मनाला जर विचारले तर देवाने काय चमत्कार केला. देवाने मोठे नवल केले. काय नवल केले म्हणून विचारशील तर सांगणे कठीण. पण इतके सांगता येईल की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी मला अंतर्बाह्य व्यापून टाकले. असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.769
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.771
