ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.768

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७६८

अगाधपण माझे अंगीं बाणलें । वरपडें देखिलें मृत्तिकालिंग ॥१॥ त्यासी चैतन्य नाहीं गुण नाहीं । चळण नाहीं गुण रुप नाहीं ॥२॥ माझ्या शरीरी जोतिर्लिंग उगवलें । अगाध कवळिलें हस्तेंवीण ॥३॥ बापरखुमादेविवरु जोतिर्लिंग विश्वनाथ । तेणे माझा मनोरथ पुरविला गे माये ॥४॥

अर्थ:-

 माझ्या ठिकाणचा परिछिन्न देहात्मभाव होता तो नाहीसा होऊन मृतिकालिंग म्हणजे परमात्मस्वरुप मला प्राप्त झाले.त्या परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी ज्ञान, गुण, चलन, रुप हे काही नाही. अशा तहेचे ते ज्योतिर्लिंग माझ्या शरीरांत म्हणजे हृदयांतच प्रगट झाले. असे ते अगाध ज्योतिर्लिंग त्यास मी हातावाचून स्वाधीन करुन घेतले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच जोतिर्लिंग म्हणजे विश्वनाथ होय व त्यांनी माझे सर्व मनोरथ पूर्ण केले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading