ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.687

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६८७

आहे तें पाहीं नाही तें कांहीं । ठायींच्या ठायीं हरपलें । नाहीं आम्हां काज नाहीं आम्हां चोज । आमुचें निज गोविंदराज ॥२॥ बापरखुमादेविवरू आनंद सोहळा । ब्रह्मानंद कळा भोगितसे ॥३॥

अर्थ:-

तुम्ही सर्वठिकाणी व्यापक असलेल्या परमात्म्याला पहा वंध्यापुत्राप्रमाणे नसलेल्या प्रपंचाला पाहून काय उपयोग? परमात्म्याला पाहिले तर ठायींच्या ठायी म्हणजे पहाणाऱ्याच्या ठिकाणचा पाहाणेपणा परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी हारपून जातो. आम्ही त्या परमात्म्याला पाहिल्यामुळे आम्हाला या जगांत कांही एक कर्तव्य उरले नाही. तसेच जगतांतील मायिकपदार्थाचे आम्हाला कौतुकही वाटत नाही. आमचे अंतःकरण गोविंदरूपच होऊन गेले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आनंदरूप आहेत. व त्या आनंदाचा सोहळा आम्ही भोगीत आहोत, असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading