ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.686

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६८६

सगुणाची सेज निर्गुणाची बाज । सांवळी विराजे कृष्णमूर्ति ॥१॥ मन गेलें ध्याना कृष्णचि नयनीं । नित्यता पर्वणी कृष्णसुखें ॥२॥ हृदयपरिवारी कृष्ण मनोमंदिरी । आमुच्या माजघरी कृष्णबिवें ॥३॥ निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट । नित्यता वैकुंठ कृष्णसुखें ॥४॥

अर्थ:-

निर्गुण स्वरूप हीच कोणी बाज, त्यावर माया विशिष्ट परमात्म्याचा बिछाना घालून, त्यावर शामसुंदररूप मनोहर श्रीकृष्णमूर्ति विराजमान आहे. त्याचे ध्यानांत मन प्रवृत्त झाल्याबरोबर सर्व शरीरांत कृष्णरूपच प्रगट झाले. अर्थात् डोळ्यांनी जे पहावे ते कृष्णरूपच दिसू लागले. मग त्या कृष्णसुखाची नित्य पर्वणी झाली. अंतःकरणांत कृष्णच प्रगट होऊन राहिला असून घरीही त्याचाच प्रकाश आहे. ज्यांत यत्किचितही अडचण नाही. अशा तहेची वाट श्रीगुरू निवृत्तिरायांनी दाखवल्यामुळे वैकुंठातील कृष्णसुखच आम्ही नित्य भोगित आहोत. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading