ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.688

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६८८

निर्गुणाचा पालऊ लागला । लय लक्षीं हरपला देह माझा ॥१॥ वांयावीण गेलें वांयावीण गेलें । अवघी बुडालें ब्रह्मेसहित ॥२॥ रखुमादेविवरू विठ्ठलु मालाथिला । निजपद पावला जीऊ शीवा ॥३॥

अर्थ:-

माझ्या चित्ताला निर्गुणाचा धागा लागल्यामुळे त्या निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी चित्ताचा लय झाला. त्यामुळे माझा देहभाव हरपला. एवढेच काय पण ब्रह्मदेवासहवर्तमान सर्व जग बुडाले. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यानी माझा अंगीकार केल्यामुळे माझा जीव परमात्मस्वरूपाला प्राप्त झाला असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading