👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६३
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसा ॥२॥ मोक्षरेख आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्वीं ॥४॥
अर्थ:-
साधुचा बोध झाला की मग न संपणारा ठेवा मिळतो. पण तो ठेवा म्हणजे हरिनामच आहे. व तो अंगोपंगात मुरवुन ठेवावा लागतो व तो अनुभव मोठा असतो. कापुराची वात पेटवली की तिची समाप्ती त्या ज्योतीत होते तसेच त्या हरिनामाची समाप्ती शरिराबरोबर व्हायला हवी. अशा साधुबोधाने नटलेला भक्त मोक्षाला पोहचतो व भाग्याचा ठरतो. साधुसंगतीची गोडी घेतली की तो जनात वनात हरिरुपाने आहे हा बोध होतो असे माऊली सांगतात.
