ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 64

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६४

पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥ नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥

अर्थ:-

जो हरिनामाला सन्मुख होता नाही त्याला पर्वतायेवढी पापे वज्रलेपाप्रमाणे (न वेगळी होंणारी) चिकटतात. ज्याला जन्माला येऊन भक्ती करता येत नाही तो पतित अभक्त ठरतो. हरिनाम न घेता फक्त संसाराचा अनंत गप्पा रंगवतो त्याला तो कसा प्राप्त होईल? तो सर्वघटामध्ये असणारा परमात्मा ह्या जगताचे प्रमाण आत्माराम आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading