ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 594

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५९४

पहाते पहाणे पहात निरुतें । पाहिलिया तेंथें तेचिं होय ॥१॥ तोची तो आपण श्रीमुखे जाण । आणिक साधन नलगे कांहीं ॥२॥ भानुबिबेविण निरसलें तम । ज्ञानदेवी वर्म सांगितलें ॥३॥

अर्थ:-

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या ब्रह्मस्वरूपाकडे पहा. तेच तुझे लक्ष्य असू दे. म्हणजे त्याच्या दर्शनाने तुही तद्रूप होशील. तो परमात्मा तूंच आहेस अशी खात्री तूं करून घे.या खात्रीला दुसऱ्या साधनाची आवश्यकता नाही. याप्रमाणे माझ्या श्रीगुरू निवृत्तीरायांनी सूर्योदयावाचून माझ्या ठिकाणच्या अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश केला. असे माउली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading