ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 593

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५९३

साध्यसाधनकाज निवृत्तिचे गुज । केशव सहज सर्वभूतीं ॥१॥ रामकृष्ण मंत्रे प्रोक्षियेलीं गात्रें । हरिरूप सर्वत्र भरला दिसे ॥२॥ गुरूगम्य चित्त जालें माझें हित । दिननिशीं प्राप्त हरि आम्हां ॥३॥ पूर्णिमाप्रकाशचंद्र निराभास । हरि हा दिवस उगवला ॥४॥ चकोरें सेविती आळीउळें पहाती । घटघटा घेती अमृतपान ॥५॥ ऐसें हे पठण ज्ञानदेवा जालें । निवृत्तीने केलें आपणा ऐसें ॥६॥

अर्थ:-

निवृत्तिरायांनी जे गुह्यज्ञान मला दिले ते ज्ञान मी माझे साध्य व साधन ठरविले. त्या योगाने परमात्मा सर्वाभूती भरला आहे. असे मला सहज कळले. त्या गुह्यज्ञानरूप मंत्राच्या योगाने माझी गात्रे अभिमंत्रित होऊन डोळ्यांना जिकडे तिकडे हरीचे रूपच दिसू लागले. गुरूपासूनच केवळ प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा मला लाभ झाल्यामुळे हरि रात्रंदिवस माझ्या जवळच राहिला. पूर्णिमेच्या चंद्राला जसा अत्यंत निर्मळ प्रकाश असतो. त्याप्रमाणे हरीचे रूप माझ्या अंतःकरणांत स्पष्ट दिसू लागले. ज्याप्रमाणे चकोर पक्षी मोठ्या प्रेमाने चंद्रकिरणातील अमृत घटघटा पितात.

त्याप्रमाणे निवृत्तिरायांनी मला ज्ञान देऊन आत्मसात केले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading