👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-२ ले, एकविध अभंग ५६७
पतीचा जिव्हाळा म्हणोनी सासुऱ्याचे साहिजे । येऱ्हवी वाहिजे नामाची मोट ॥१॥ न पाहे वास न धरी मनीं आस । वाया निकण भुस काय उपणिसी ॥२॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलुचि पुरे । चाड नाहीं आम्हां दुजेवीण ॥३॥
अर्थ:-
लग्न झालेली स्त्री आपल्या पतीच्या प्रेमाकरिता सासुसासऱ्यांचा जाच सहन करते. तसे जर नसेल तर एऱ्हवी कातड्यांची मोट म्हणजे नुसते शरीर रक्षण करून करावयाचे काय? या विचाराने नुसत्या शरीराचे रक्षण करावे अशी माझी दृष्टी नाही. व अन्य कोणत्याही प्रापंचिक विषयाविषयी आशा नाही. कारण ज्यामध्ये कण नाही. म्हणजे धान्य नाही असे नुसते भूस वाऱ्यावर कोण उपणीत बसेल? एवढ्याकरिता माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना सोडून इतर दुसऱ्या कशाचीही आम्हाला इच्छा नाही आम्हाला तो एकच पुरे. असे माऊली सांगतात.
