👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५५
ऐसा अवतार नरहरि स्तंभामाझारी । भक्ता परोपरी धरी रूपे ॥ धरूनियां महत्व झाला नृसिंहरूप । वेदशास्त्रांशी अमूर्त मूर्तीस आला ॥ बापरखुमादेविवरू नरहरी अवतारू । वर्ण शारंड़्गधरू निजरूप ॥
अर्थ:-
आपल्या भक्तासाठी परोपरीने विविध अवतार घेणारा स्तंभातुन नरसिंह बनुन आला. ज्या नरसिंह रुपाचे वर्णन वेदशास्त्र आधीच करु शकले नाहीत त्याचे महत्व धरुनच ते नरसिंहरुप प्रगटले. मुळ निजरुप असणारा शारंगधरच नरसिंह रुपाने आलेला तो रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.