👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५४
ज्याचे गुणानाम आठवितां मनचि नाही होय । अनुभवाचें पाय पुढे चालती ॥ निर्गुण गे माये गुणवंत जाला । प्रतिबिंबी बिंबतसे चैतन्याचे मुसे । प्रति ठसावत ते वृंदावनी ब्रह्म असे गे माये ॥ बापरखुमादेविवरू डोळसु सांवळा । द्वैत अद्वैत सोहळा भोगवी गे माये ॥
अर्थ:-
त्याचे गुणनाम घेतले की मनच राहात नाही व अनुभव आठवला तर पाय चालत राहतात. त्या प्रतिबिंबात चैतन्याची मुस(साचा) दिसली तो निर्गुण, सगुण होऊन आला.ते सगुण ब्रह्मरुप वृंदावनात मी पाहात आहे. तेच रुप, मला द्वैत अद्वैत रुपाचा सोहळा, माझ्या डोळ्याना दाखवणारा, तो सावळा रखुमाईचा पती व माझा पिता आहे असे माऊली सांगतात.
