👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५६
दोही बाही संतांची सभा । सिंहासनी उभा श्रीविठ्ठल ॥ गाती नारद तुंबर प्रेमे । हरीची नामे गर्जती ॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥
अर्थ:-
सिंहासनावर तो श्री विठ्ठल उभा असुन त्याच्या दोन्ही बाजुला संतसभा भरली आहे. हरिनाम प्रेमाने घेत तेच नाम नारद तुंबर गात आहेत. तो रखुमाईचा पती विठ्ठल उभा राहिल्यावर त्र्यैलोकीची शोभा शोभुन दिसते असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 55
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 57
