👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५१
सारासार दोन्ही । न दिसती नयनी । अवचिता गगनी बिंबलासे ॥ लोपले रविशशी । तेज न भाये आकाशी । मेघेःशामे मेघाशी लपविले ॥धृ॥ दिव्य रूप तेज । तीव्र ना तेजबीज । कुंडली विराज । लोपलें सुर्यो ॥ ज्ञानदेवा ध्यान । मनाचेंही मन । हरिचरण स्थान । दृढ केलें ॥
अर्थ:-
सार असारचे रुप असलेले ते स्वरुप डोळ्याना दिसत नाही पण अवचित गगनात बिंबते. त्याच्या तेजाने आकाशातील चंद्र सुर्य हे त्या तेजात लोपले आहेत.ते तेज त्या आकाशात मावत नाही.जणुकाही त्या मेघःशामाने मेघालाही झाकुन टाकले. कुंडलिनी जागृत झाल्यावर जे दिव्य तेज त्या रुपावर निर्माण होते. ते तेज तिव्र नाही व त्यात सुर्य लोपला आहे. आम्ही मनाचे मन असलेले ते ब्रह्मपद त्या समचरणांमध्ये पाहतो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
