👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५०
विज्ञानाचे ज्ञान अज्ञानी घनवट । ज्ञाने अज्ञान नीट लाविलें दिसें ॥ मी तूं हे मात हरपले दृष्टांत । हृदयीं हृदयस्थ निजतसे ॥ साकार निराकार शून्याशून्य दिठा । रुपी रुपवाटा हरि माझा ॥ बापरखुमादेविवरू हृदयस्थ घटी । बिंबोनी उफराटी कळा दिसे ॥
अर्थ:-
प्रपंचाचे ज्ञान हे अज्ञानच असुन परमार्थ ज्ञानाने त्याला वाटेला लावले. त्यामुळे मनातील मी तु पण नष्ट होऊन हृदयात तो निजतेजाने स्थापित होतो. साकार निराकार शुन्याचे शून्य हे सर्व रुप घेऊन तो प्रगट झालेला माझा हरि आहे. असा जो रखुमाईचा पती हृदय घटात अवतरला तरी मूर्खाना तो वेगळा भासतो. असे माऊली बोलतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 49
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 51
