👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५२
स्वरूपी पाहतां बिंबी बिंब उमटे । ते मेघःशाम दाटे बुंथी मनीं ॥ चित्त वित्त हरि झाला वो साजणी । अवचिता अंगणी म्यां देखीयेला ॥ सांवळा डोळसु चतुर्भुज रुपडे । दिसे चहूंकडे एकतत्व ॥ ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसुनि पाही । एका रूपा सोयी बाही तरशील ॥ त्या
अर्थ:-
मेघशामाकडे पाहिले की त्या बिंबाचे प्रतिबिंब माझ्या मनात उमटले आहे. त्या सगुण रुपाला अंगणात मी अवचित पाहिला त्यामुळे माझे चित्त व वित्त सगळेच मी विसरलो.त्या चतुर्भुज परमात्म्याला डोळ्यानी पाहिल्यावर ते एकतत्वाने सर्वत्र आहे हे मला जाणवले. त्या रुपाला एकत्वाने पाहिले तर सहज तरुन जाता येईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
