👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०१
प्रणवाचें आकाश असे सर्वांवरी । आकाशीं भरोवरी प्रणवाची ॥१॥ प्रणव जे गुह्य ऋषी योगीयांचे । सर्वावरिष्टा साचे वेद आज्ञा ॥२॥ एका वेदांत सिद्धांती प्रणव तो तत्त्वता । ज्ञानदेव वक्ता सांगतसे ॥३॥
अर्थ:-
प्रणवाचे आकाश देहातील सर्व चक्रांच्या वर आहे. त्या आकाशांत सर्वत्र प्रणवच आहे. प्रणव हे ऋषी, मुनी, योगी यांचे गुह्यज्ञान आहे. प्रणव हा सर्वात श्रेष्ठ आहे. असे वेदही प्रतिपादन करतात. वेदाचा सिद्धांत एक प्रणवच आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.400
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.402
