ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.402

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०२

प्रणवाचे रुप कोणें देहें देखिलें । निवृत्तीनें दाखविलें याच देंही ॥१॥ सकार हकार तूर्या उन्मनी भेद । अभेदुनी भेद केलें मज ॥२॥ ज्ञानदेव म्हणे प्रणवाची खोली । अक्षरींची बोली देह सार ॥३॥

अर्थ:-

प्रणवाचे स्वरुप देहधाऱ्याने आपल्या देहांत पाहिले असा कोण आहे? मला मात्र याच देहांत निवृत्तीनाथांनी त्याचे दर्शन घडविले. सोहं शब्दातील सकार, हकार, तूर्या व उन्मनी वगैरे भेदांचा निराळेपणा न मोडता मला त्या सर्वस्थिती अभेदाने अनुभविता आल्या. प्रणवाची सूक्ष्म वर्णन करणारी अक्षरे व ज्याच्या सहाय्याने योगाभ्यास करावयाचा असे शरीर ही सारभूत आहेत. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading