ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.356

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा फोटो min. सार्थ गाथा फोटो min min

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३५६

आकाशाची गुंफा अंत नाहीं जिचा । शोध करा तिचा सर्वभावें ॥१॥ अनंत ब्रह्मांडाचा खेळ जिच्या योगें चाले । चांग्यासी मीनले तया ठायीं ॥२॥ गुंफेच्या आधारें चंद्र सूर्य चालती । विश्रांतीसी येती तये जवळी ॥३॥ ज्ञानदेव नयन धरिता समभावें । सोहं स्वरूप भावें लाधलेंसे ॥४॥

अर्थ:-

जिला आकाशांची गुंफा म्हणतात. तसेच जिचा आत्मज्ञाना शिवाय अंत कळत नाही, अशी जी माया तिचा सर्वदृष्टीने शोध करा.जिच्या अधिष्ठानांवर सर्व अनंत ब्रह्माडांचा खेळ चालतो. त्या पदाला चांगले विचारवान पोहोचले. त्या मायेचा आधार जो परमात्मा त्याच्या योगांने चंद्र सुर्य चालतात व तेथेच शेवटी विश्रांती घेतात. सर्वत्र मायेचे अधिष्ठान परमात्माच भरला आहे. अशा तऱ्हेची समदृष्टी मला प्राप्त झाली. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading