ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.357

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३५७

षट्चक्रे बंद निघूनियां गेली । पाहों जों लागली तया गांवा ॥१॥ निरंजन सभराभरीत वस्तु कोंदली ।साक्षित्वास आली आत्मदशा ॥२॥ वृत्ति झेंपावली आनंद झाला सैरा । सत्रावी येरझारा करी जेथें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे लक्ष लावी आकाशीं । ब्रह्म पावसी लौकरीं तूं ॥४॥

अर्थ:-

योगाभ्यासाच्या सिद्धिने आत्मदर्शन झाले असता पूर्वीची ती षट्चक्रे तो मुळबंद वगैरे पाहू गेले तर ते सर्व नाहीसे झालेले असतात.आणि सर्वीकडे शुद्ध आत्मवस्तुच व्याप्त आहे असा अनुभव येतो. अशा रितीने आनंदाची वृत्ति फोफावली असता सत्रावीची येरझार म्हणजे थेंब थेंब अमृत गळण्याची स्थिती सुरुच राहते. तुम्हीही या रितीने योगाभ्यास केला तर तुम्हालाही ब्रह्मस्थिती ताबडतोब प्राप्त होईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading