👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३५४
अव्यक्त मसुराकार पूर्वार्ध संचलें । लक्षा सरीसे झाले लक्षासी पैं ॥१॥ अव्यक्त देखणें देखण्या आलें व्यक्त । पाहता व्यक्त अव्यक्त दोन्ही नाहीं ॥२॥ जागृतीच्या ठायी निजतो सहखदळीं । बिंदूच्या समेळी उच्चार होतो ॥३॥ ज्ञानदेव शरण निवत्तीच्या शरणा । समजुनी खुणा तटस्थ झालों ॥४॥
अर्थ:-
आत्मा अव्यक्त आहे. पण योगी लोक अभ्यासाकरिता त्याला अगोदर मसुरेएवढा मानतात व पुढे चित्त स्थिर झाले म्हणजे त्या मसुरेएवढ्या आकाराचाही निश्चय करून, आपण द्रष्टा आहोत असा निश्चय करतात. व्यक्तरूप पहावयाचे असा शब्दप्रयोग करण्यामुळेच त्याला व्यक्तपणा आला. वास्तविक तो व्यक्ताव्यक्त दोन्ही नाही. योगी जागृतीतच सहस्त्रदळ असलेल्या कमलाच्या आतील नीलबिंदुच्या ठिकाणी आपल्या वृत्तीची स्थिरता करतो. व त्या स्थिरतेतही ओंकार उच्चारतो. श्री निवृत्तिनाथांच्या कृपेने योगमार्गातील या सर्व गोष्टीचा अनुभव घेऊन मी ‘स्थिर झालो आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
