ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.230

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २३० 

कानी घालूनिया बोटे । नाद जे पाहावे । न दिसता जाणावे । नऊ दिवस ॥ भोवया पाहतां न दिसे जाणा । आयुष्याची गणना सात दिवस ॥ डोळा घालूनिया बोट चक्र जे पहावे । न दिसतां जाणावे पाच दिवस ॥ नासग्रीचे अग्र न दिसे नयनी । तरी तेचि दिनी म्हणा रामकृष्ण ॥ ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण । अतंकाळी आपण वेगी पहा ॥

अर्थ:-

कानात बोटे घालून नाद ऐकू आला नाही की, आपल्या आयुष्य नऊ दिवस उरले आहे असे समजावे.भुवयांकडे नजर टाकून त्या दिसल्या नाहीत म्हणजे आपले आयुष्य सात दिवस उरले आहे असे समजावे.डोळ्यात बोटे घालून चक्र न दिसल्यास आपले आयुष्य पाच दिवस उरले आहे असे समजावे. नाकाचा शेंडा न दिसल्यास त्याच दिवसी मृत्यु आहे असे समजुन रामकृष्ण नामाचा जप करावा.ही साधूनी सांगून ठेवलेली लक्षणे आहेत याचा अनुभव अतंकाळी ज्याचा त्यांना घ्यावा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading