👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १२२
भ्रम धरिसी या देहाचा । विठ्ठल म्हणे कां वाचा ॥ पडोन जाईल कलेवर । विठ्ठल उच्चारी पा सार ॥ रखुमादेविवरू अभयकरू । मस्तकीं ठेविला हा निर्धारु ॥
अर्थ:-
उगाच मी म्हणजे देह हा भ्रम धरतोस.पण विठ्ठलनाम घेत नाहीस. हा देह कधी ही पडुन जाईल तेंव्हा साररुप विठ्ठल नाम उच्चार. असे नाम घेणाऱ्याच्या डोक्यावर रखुमाईचा पती आपला अभयकर ठेवतो.