👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १२३
विठ्ठल विठ्ठल न म्हणसी । पुनरपि पडसी गर्भवासी ॥ अंतकाळी स्मरे । स्मरे विठ्ठल राणा ॥ रखुमादेविवरू निर्धारी । पडों नेदी चराचरीं ॥
अर्थ:-
विठ्ठल नामाचा जप केला नाहीस तर पुनरुपी गर्भवासाला जावे लागेल. त्या मुळे त्या राजा विठ्ठलाचे नाम अंतकाळापर्यंत सतत घे. रखुमाईचा पती त्याला परत चराचरात येऊ देत नाही.