👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १२१
विठ्ठल नाम नुच्चारिसी । तरी रवरव कुंडी पडसी ॥ विठ्ठल नाम उच्चारी । आळसु न करी क्षणभरी ॥ विठ्ठल नाम तीन अक्षरे । अमृतपान केलें शंकरे ॥ रखुमादेविवरा विठ्ठले । महापातकी उध्दरिले ॥
अर्थ:-
श्री विठ्ठल नाम मुखी घेतले नाहीस तर रवरव नरक कुंडात पडशील.विठ्ठल नामाचा सतत जप कर आळस करु नकोस. तीन अक्षरी विठ्ठल नाम अमृत असून त्याचे प्राशन श्रीविठ्ठलानी केले आहे.रखुमादेवीचा वर असणा-या विठ्ठलाने नाम साधना करणा-या साधकांना ह्रदयी धरले आहे असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 120
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 122
