👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १२०
आठविता विसरले आपुलिया गोता । हरिनामे त्वरिता मोक्ष जाला ॥ त्यांचे नामची त्वरित प्रल्हादे केले प्रसन्न । तेणें संजिवन जाळे त्याचे देह ॥ बापरखुमादेविवरू नृसिंहरुपे देखे । दैत्य हरिखे धरी जानु ॥
अर्थ:-
त्या परमात्म्याचे नुसते स्मरण झाले तरी कुळ गोत सर्व काही विसरायला होते. त्या हरिनामाने त्वरित मोक्ष ही प्राप्त झाला. प्रल्हादाने ते हरिनाम घेऊन परमात्म्याला प्रसन्न करुन घेतले त्यामुळे त्याचा देह संजिवन अवस्थेला गेला.माझे पिता व रखुमाईचे पती ह्यांनी घेतलेले नृसिंहरुप घेऊन हिरण्यकश्यपु दैताला मांडीवर घेऊन मारलेले पाहिले