👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११९
रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी । हृदय मंदिरी स्मरा कांरे ॥ आपुली आपण करा सोडवणं । संसार बंधन तोडा वेगीं ॥ ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा । हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ति रया ॥
अर्थ:-
रामकृष्ण या दोन नामांचे नित्य स्मरण करुन आपली आपल्याला सोडवणूक करता येईल व संसार बंधनातून मुक्त होता येईल.हृदय मंदिरी श्रीमूर्तीचा जिव्हाळा असल्याने ध्यानात रामकृष्ण माळा जपतो असे माऊली सांगतात.