👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११८
प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशी आलें । सार्थक पै झालें संसाराचे ॥ केशव नाम सार विठ्ठल उच्चार । राम निरंतर हृदयी वसे ॥ पाहातां हा भाव लीळा तो विग्रह । तेथींचा अनुभव विरळा जाणे ॥ बापरखुमादेविवरू पाहतां विस्तारू । नामाचा बडिवारू न बोलवे ॥
अर्थ:-
ह्रद्यात प्रेम व जिव्हाळा असल्यामुळे माझ्या मुखात नाम आले व त्यामुळे माझ्या संसाराचे सार्थक झाले. केशव व विठ्ठल हे नाम साररुप असल्याने तो श्रीराम माझ्या ह्रदयी निरंतर वास करतो. सगुण रुपाने भक्तासाठी लीला करणारा परमात्मा पाहणारे व अनुभवणारे विरळच आहेत. रखमादेवीचे पती व माझे पिता यांचा विस्तार व त्याच्या नामाचा मोठेपणा वर्णन करता येत नाही असे माऊली सांगतात.
