ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 117

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११७

कर्म आणि धर्म आचरती जयालागी । साधक सिणले साधन साधितां अभागी ॥ गोड तुझें नाम विठोबा अवडतें मज । दुजे विचारितां मना वाटतसे लाज ॥ भुक्ती आणि मुक्ति नामपाशी या प्रत्यक्ष । चारही वेद साही शास्त्रे देताती साक्ष ॥ काया वाचा चित्त चरणीं ठेविलेसे गाहाण । बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥

अर्थ:-

 परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अभागी साधक कर्म व धर्म आचरताना शिणून गेले.हे विठ्ठला तुझे गोड नाम मला खूप आवडते व दुसऱ्या साधनाचा विचार करण्याची मला लाज वाटते. चारी वेद व सहा शास्त्र साक्ष देतात की भक्ती आणि मुक्ती या नामापाशीच आहेत.रखमादेवीचे पती व माझे पिता विठ्ठल याच्या चरणी काया वाचा व चित्त गहाण ठेवले आहे असे माऊली शपथ पूर्वक सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading