स्वामी विवेकानंद चरित्र भाग ८, (३७ ते ४१)

आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न!  सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्‍या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

विवेकानंदाच्या जन्माअगोदर त्यांची माता भुवनेश्वरीदेवींनी आपला वंश उज्वल व्हावा म्हणून इतर धर्मशील हिंदु मातांप्रमाणे अनेक धार्मिक व्रत वैकल्ये,तपःसाधना, उपवास करीत होत्या.त्या शंकरभक्त असल्यामुळे त्या क्षेत्राचे दैवत असणार्‍या विरेश्वर शिवाची विशेष पुजा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! स्वामी विवेकानंद !!!    

भाग-३७*

      प्लेगच्या साथीच्या मदतकार्यासाठी निधिची गरज पडल्यास,नुकतीच घेतले ली जागा विकायचा त्यांनी विचार केला. आपण सन्यासी असल्यामुळे एखाद्या झाडाखाली सुध्दा झोपु व पुर्वी करत होतो तसे ॐ भिक्षां देहिं करत जगायची सर्वांनी तयारी दाखविली.सुदैवाने बर्‍याच लोकांनी प्लेग निवारण कार्या साठी भरपुर मदत प्राप्त झाल्याने जमीन विकायची गरज पडली नाही. पिडीतांच्या दुःखनिवारानार्थ स्वामीजीं नी घेतलेल्या कठोर परिश्रमाने त्यांची स्तुती व प्रेम व्यक्त करण्याला पारावारच उरला नाही.प्लेग साथ नियंत्रणात आल्यावर ११ मे ला कोलकात्याहुन नैनीतालला गेले.या प्रवासात शिष्यवर्गा ला अखंड ज्ञानदान,भारताचा इतिहास, धर्मविचार,तत्वज्ञान शिकण्याची या पाश्चात्य स्नेही मंडळींना दुर्लभ पर्वणीच मिळाली, भगिनी निवेदितांनी “नोट्स ऑफ सम वॉडरिंग्ज विथ दी स्वामी विवेकानंद या ग्रंथात ही माहिती संग्रहीत केली.

        अल्मोडाला असतांनाच पवहारी बाबा व श्री गुडविन यांच्या निधनाची बातमी मिळाली,

जी कधीही भरुन न येणार्‍या हानीने स्वामीजी अत्यंत दुःखा ने उद्गारले ” माझा उजवा हातच गेला”! “प्रबुध्द भारत” मासिकाचे संपादक बी आर राजमच्या मृत्युने बंद पडलेले मासिक परत सुरु करुन स्वामी स्वरुपा नंदांना संपादक आणि कॅप्टन सेव्हीयरां ना व्यवस्थापक बनविले.नंतर ११ जुन ला स्वामीजी आपल्या पाश्चिमात्य शिष्यांसह पृथ्वीतलावरील नंदनवन असलेल्या काश्मिरला पोहोचले.प्रवास भर स्वामीजी आपले अंतरंग उघड करीत होते. शिष्यांना काय कल्पना की, ते लवकरच दृष्टीआड होणार आहे. काश्मिरला सर्वांपासुन अलिप्त एकटेच दुरवर भटकंती करीत असे.त्यांच्यात अनासक्ती व विरक्तीचा भाव जागृत होऊ लागला.त्यांच्या इच्छेनुसार २ ऑगस्टला अमरनाथला पोहोचले. गुहेत चमकत असलेल्या शिवलिंगाचे दर्शन मनोभावे दर्शन घेतले.त्यांना तिथे साक्षात शिवदर्शन होऊन “इच्छा मरणा चा ” वर प्राप्त झाला.मात्र याबाबत त्यांनी कोणालाही सांगीतले नाही. ८ ऑगस्टला ही मंडळी श्रीनगरला पोहोचली.तिथे सप्टेबर अखेरपर्यत राहिलेत.या काळात स्वामीजींना ध्यानधारणा व एकांताची तिव्र ओढ लागली.तिथे संस्कृत महाविद्यालय उघडण्यासाठी एका निवडलेल्या भूभागाचा प्रस्ताव ब्रिटिश रेसिंडेटकडे पाठवला, पण तो प्रस्ताव नाकारण्यात आला.एक महिन्या नंतर ते कालीमाता जगददंबेच्या उपासनेकडे वळले व त्यांना मातेची अनुभुती प्राप्त झाली. ३० सप्टेंबरला स्वामीजी जगन्मातेच्या मंदिरातच जाऊन राहिले. तिथे नित्यनेमाने पुजा सुरु असतांनाच प्राप्त झालेल्या अनुभुतीद्वारेच आपले पृथ्वीवरील कार्य संपल्याची सुचना मिळाली.फार पुर्वी रामकृष्णांनी सांगीतले होते की,नरेंद्र या देहात फक्त जगन्मातेचे कार्य होईपर्यतच राहिल,कार्य संपल्यावर त्याला जाणीव होऊन स्वइच्छेने शरीराचा त्याग करेल.

        श्रीनगरला जेव्हा आपल्या शिष्य वर्गामधे स्वामीजी आलेत, ते पुर्णपणे कोणीतरी वेगळेच वाटत होते.त्यांच्या मुद्रेववर तपस्व्याचा अनाकालनीय असा प्रखर भाव दिसत होता.त्यांनी गाठीभेटी पण कमी केल्यात.जणुकांही मृत्युदेवते लाच छातीशी कवटाळल आहे.भगिनी निवेदिता लिहितात की, उच्च आध्यात्मिक अनुभुतीची तिव्रता त्यांचे शरीर सहन करुं शकले नाही.त्यांच्या थकव्याची परिसीमा झाल्याने ह्या सर्व मंडळींनी आक्टोबरला काश्मिरमधला मुक्काम हलवुन स्वामीजींसह लाहोरला आलेत. १८ आक्टोबरला शिष्य सदानंदाबरोबर बेलूरला आलेत.स्वामीजींची प्रकृती खुपच खालावली. दम्याच्या त्रासाने व इतर दुखण्याने हैराण असुनही दुखण्याचा बाऊ न करतां निरनिराळ्या उपक्रमां मधे गुंतलेल होते.

           क्रमशः   
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

*!!!स्वामी विवेकानंद!!!भाग-३८*

       गुरुदेव रामकृष्णांची रक्षा स्वामीजीं नी आपल्या खांद्यावर वाहुन ९ डिसेंबर १८९८ ला एका शुभ मुहुर्तावर गुरुदेवां च्या मूर्तीची मंदिरात प्रतिस्थापना करुन बेलुरच्या रामकृष्ण मठाचे पुजाविधि निलांबरीबाबुंच्या उद्यानगृहात पार पाडले होते. गुरुदेवांच्या समाधी मंदिरा ची प्रष्ठीस्थापना,गुरुबंधु व भविष्यकालीन सन्यासीसाठी साधुनिवास,श्रीराम कृष्णांच्या दिव्य उपदेशाच्या प्रवासा साठी व इतर सामाजिक कार्यासाठी रामकृष्ण संघाची प्रशासकीय इमारत उभी करण्यासाठी भूखंड स्वामीजींनी मिळवला.मठाचे त्रिविध उपक्रम म्हणजे अन्नदान,विज्ञादान,

ज्ञानदान या तिन्हीचा  समन्वय साधला तर मनुष्याची जडण घडण होऊन मठवासी लोक निःस्वार्थ पणे सेवा करुन ब्रम्हज्ञानासाठी सत्पात्र बनतील.

       लवकरच नवीन मठाचे बांधकाम पुर्ण होऊन बेलुरला २ जाने.१८९९ ला स्थानांतरीत करण्यात आले.  १४ता लाच बंगाली भाषेतील “उद्बोधन” हे नियतकालीन सुध्दा प्रकाशित झाले.

गुरु बंधु व शिष्यांनी आग्रहाने विनंती केल्या वर स्वामीजी औषधोपचारासाठी वारं वार कोलकात्यास सतत जाऊ लागले. पण तिथेही त्यांना कामातुन सुटका मिळत नव्हती.त्यांना काळजी होती, भविष्यात त्यांचे कार्य पुढे सुरु राहण्या साठी संन्यासी व ब्रम्हचार्‍यांच्या

प्रशिक्षणार्थांची ! त्यांना वाटत असे, धर्माच्या क्षेत्रात किल्ले बांधणारे आणि सुरुंग पेरणारे सैनिक तयार व्हावे,त्यासाठी त्यांना स्वकष्टाची संवय,व्यायाम करुन स्नायु दणकट करावे! स्वामीजी म्हणजे कर्माचा जिवंत मंत्रच होते.जीवन ही एक लढाई आहे!म्हणुन सतत कृतिशील राहावे,असे त्यांना वाटे.त्यांना आपले शिष्य सर्वांगपरिपूर्ण व संपुर्ण जगात क्रांती घडविणारे व्हावेत व त्याप्रमाणे ते प्रयत्नशील होते.आपला अंतकाळ जवळ आल्याची त्यांना जाणीव झाली असुनही ते कर्तव्याच्या वेडाने झपाट लेले होते.

       पाश्चिमात्य राष्र्टात उभारलेल्या कामाची व तेथील कार्याला चालना देण्यास युरोप अमेरिकेला जाण्यासाठी सोबत भगिनी निवेदिता व स्वामी तुरीया नंदांना नेण्याचे ठरविले. आपले बहुतांश जीवन ध्यानध्यारणेतच व्यतीत केलेल्या तुरीयानंदांनी अनिच्छा दाखवल्यावर स्वामींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवुन एखाद्या लहानमुलासारखे रडत म्हणाले मी अगदी मृत्युच्या काठावर येऊन ठेपलो तरी, गुरुदेवाच्या इच्छित कार्यांची परिपूर्ती करण्यासाठी माझ्या जीवाचा कण नी कण कसा वेचत आहे,हे तू पाहतोस ना?माझ्यावरील प्रचंड ओझ्या चा भार थोडाही तू कमी करुं इच्छित नाही का? स्वामीजींच्या करुन कळकळीच्या उद्गारांनी तुरीयानंदाचे अंतःकरण द्रवुन गेले व स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे  वागण्याचे वचन दिले.

       १९ जुन १८९९ रात्री बेलुरमठात सभा घेतली व २० ता.ला स्वामीजी दोन सहकार्‍यांबरोबर जहाजाने कोलंबो, एडन,नेपल्स,मार्सेलिस मार्गे जलप्रवास करीत ३१ जुलैला लंडनला पोहोचले.हा जलप्रवास भगिनी निवेदिता व स्वामी तुरीयानंदांना कथाकथन आणि ज्ञानगंगे च्या वाहत्या प्रवाहात डुबकी मारण्याची सुवर्णसंधीच जणुं प्राप्त झाली. स्वामी विवेकानंद नोव्हेम्बरमधे न्युयार्कला पोहोचुन कॅटस्कील पर्वतरांगांतील स्टीन रिज येथील रिजले मॅनॉर येथील गुरुबंधु लेगेट दाम्पत्यांच्या ग्रामीण घरी पोहोचले.माफक विश्रांती व चांगले हवा मानामुळे त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होत होती. लॉस एंजेलस आणि पॅसाडेना येथे मोठ्या श्रोतृसमु दायासमोर व्याख्याने दिलीत ती लिहुन घ्यायला आतां गुडविन नव्हते.त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेले विचार हवेतच विरले कांही अत्यल्प विचारच शिष्यांनी तुटक तुटक टिप्पणे घेतल्या गेलीत.

            क्रमशः       
संकलन  –  मिनाक्षी देशमुख.

*!!!स्वामी विवेकानंद!!!भाग-३९*

        लॉस ऐंजेलसमधील “होम ऑफ ट्रुथ” च्या मुख्यालयात स्वामीजी एक महिना राहुन राजयोगाच्या निरनिराळ्या पैलुंवर अनेक जाहीर व्याख्याने,व नियमित अध्ययन वर्गही घेतले.

स्वामीजींनी आपल्या साध्या वागणुकेने,तिव्र बुध्दीमत्ता आणि आध्यात्मिक ज्ञानाने तेथील सदस्यांना त्यांच्या बद्दल प्रेम, आत्मियता वाटुन आपलेसे करुन घेतले  “युनिटी”च्या मुखपत्रात स्वामीजींबद्दल लिहिले की, स्वामी विवेकानंद हे एखाद्या विश्वविद्यालयातील कुलपतींची शोभणारी विद्वता,अचार्यबिशपच्या तोडीची सन्मान्यता, आणि एखाद्या मुक्त निरागस बालासारखा डौल व गोडवा यांचा समन्वय आहे. व्यासपीठा वर क्षणाचीही तयारी न करतां मुख्य विषयावर ते भाष्य करुं शकत असे.ख्रिश्चन राष्र्टे एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात बायबल घेऊन फिलिपाईन लोकांना सुधारायला किंवा दक्षिण आफ्रीकेत एकाच देवांच्या लेकरांची खांडोळी होऊ देतात. उलट भारतात भिषण दुष्काळात देखील भारतीय माणसे गायीगुरांना मारुन टाकण्यासाठी हात न उचलतां उपासमारी स्विकारुन ते स्वतःचे मरण पत्करतात हे त्यांनी तीथे पटवुन दिले.

       डॉ.बेंजामिन फे मिल्स, फर्स्ट युनिटे रियन चर्चचे मिनिस्टर यांचे अतिथी म्हणुन राहिलेले स्वामीजींनी ओकलंड यथे दोन हजार श्रोत्यांसमोर आठ जाहीर व्याख्याने दिली. त्यांच्या व्याख्या नांनी प्रभावित होऊन सॅनफ्रान्सिस्कोत एक केंद्र सुरु केले.आणि सॅन अॅन्टोन व्हॅलीची सुमारे १०८ एकर क्षेत्रफळाची जमीन देणगी मिळाल्यावर,विद्यार्थ्यांना ध्यानधारनेत प्रशिक्षित करण्यासाठी स्वामी तुरीयानंदाची नेमणूक केली.

       न्युयार्ककडे परतीच्या प्रवासात स्वामीजींना अतिशय थकवा आल्याने वाटेतच शिकागो आणि डेस्टाईटला थांबुन शिकागोतील हेल कुटुंबाचे पाहुणे म्हणुन राहिलेत.या निष्ठावान स्नेहीजनां शी ही भेट शेवटचीच याची त्यांना जाणीव झाली. नव्या आश्रमाचे “शांती आश्रम” असे नामकरण झाले.डेट्राईटला आठवडाभर राहुन २० जुलैला पॅरीसचा जलप्रवास सुरु झाला. माणसांच्या दुःख यातनांबाबत स्वामीजी खुप हळवे होते. त्यांनी आपल्या अमेरिकेतील स्नेहाला लिहिल्या दि.१२ डिसें. १८९९ च्या पत्रात लिहाले की,कांही वर्षापुर्वी परत कधीही न येण्याच्या निर्धाराने हिमालयात गेलो होतो,त्याचवेळी बहिणीने आत्म हत्या केल्याची बातमी समजली आणि दुबळ्या अंतःकरणाचा मी,शांती लाभण्यापासुन दूर भिरकवल्या गेलो.दुबळ्या लोकांनाच मदत करण्यासाठीच भारता तुन इथे आलो.शांतीचा खुप शोध घेतला,पण कुठेच शांती लाभली नाही. संघर्ष आणि यातना हेच आयुष्यभर पुरले. अमेरिकेत असतांना त्यांचेवर अस्थिदोष व चुंबक चिकिस्ता उपचार केले पण लाभ झाला नाही.

      न्युयार्कमधले कार्याचे अहवाल तितकेसे समाधानकारक नव्हते. अशातच त्यांचे निस्सीम मित्र हेलच्या निधना मुळे त्यांना खुप एकाकी वाटत होते. विवेकानंदांच्या कांही शिष्यांशी स्वामी अभेनंदांचे मतभेद होत होते.श्री लेगेट यांनी वेदान्त सोसायटीशी असलेले संबंध तोडले.अशा अनेक घटनांमुळे स्वामीजींचे ह्रदय विदिर्ण झाले. त्यात भर म्हणजे या पृथ्वीवरील कार्य संपल्याचीही जाणीव झाली.त्यामुळे त्यांचे कार्यातले सारस्यही संपु लागले.त्यांनी ठरविले की,भारतात जाऊन जीला त्यांच्यामुळे खुप दुःख भोगावे लागले त्या मातेसोबत,गंगेकीनारी झोपडी बांधुन ऊर्वरीत आयुष्य घालवुन तिचे अखेरचे दिवस सुखात जाण्याचे प्रयत्न  करायचे आणि या सर्वातुन शांतपणे निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.आपल्या कार्याचा आणि आयुष्याचा शेवट जवळ आल्याने हे जग त्यांना स्पष्टपणे रंगभूमी सारखे जाणवु लागले.

                क्रमशः
       संकलन – मिनाक्षी देशमुख.

*!!!स्वामी विवेकानंद!!!भाग-४०*

          स्वामी विवेकानंद आपल्या गत जीवनाचा आढावा घेत शरीरासकट सर्व वस्तुंच्या सापेक्ष गुणदोषांची,चांगल्या वाईट,उच्चनीच वगैरैची जाणीव गळुन पडत आहे. ॐ तत् सत्ः …. परंतु अद्यापी विवेकांनदाचे कार्य संपलेले नव्हते.पॅरीसला “युनिव्हर्सल एक्स्पोझि शनच्या निमित्याने आयोजित” धर्माचा इतिहास या विषयांवरील अधिवेशनात सहभागी होऊन प्रकृती अस्वस्थामुळे फक्त दोनच चर्चासत्रांमधे भाग घेऊ शकले.पॅरीसमधे असतांनाच वनस्पतीतील प्राणतत्व व मज्जासंस्था अस्तित्वाचा शोध नामवंत देशबंधु जगदीशचंद्र बोस यांच्या बद्दल माहिती कळल्याने पॅरीसमधील परिषदे च्या विज्ञान विभागात सहभागी होण्या करितां निमंत्रित केले.

स्वामीजींनी या  भारतीय वैज्ञानिकाचा “बंगालचा मान बिंदु आणि गौरव” अश्या शब्दात उल्लेख केला.

      व्हीएन्ना व कॉन्स्टॅंटीनोपल मार्गे पूर्वे कडील देशात जाण्यासाठी २४ आक्टो. १९०० ला पॅरीस शहर सोडले. त्यांच्या सोबत मॉसेयर,मादाम लॉयसन,ज्युल्स बॉइस,मादाम काल्व्हे आणि कु.मॅक्लाऊड एवढे लोक होते. कैरोमधे स्वामीजी असतांना त्यांना दुःस्वप्न पडले की, सेव्हेयर अस्वस्थ आहेत,म्हणुन भारतात येण्यासाठी त्यांना जी पहिली बोट मिळाली तिने ते एकटेच मुंबईला निघाले. युरोपच्या संपुर्ण प्रवासात सोबतच्या मंडळींना जाणवले की, स्वामीजी बाह्य गोष्टींविषयी अनासक्त होत असुन ते ध्यानातचा मग्न होत आहे व जगण्या विषयी त्यांच्यात विरक्ती आलेली आहे. स्वामींनी तुरीयानंदाना पत्राद्वारे कळविले की, माझे शरीर व मन दोन्हीही मोडुन पडले.विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे. आतां आपण जास्त काळ जगुं शकणार नाही. ज्याच्यावर विश्वास ठेवावा असा एकही माणुस दिसत नाही उलट मी जिवंत आहे तोपर्यंत सर्वजण स्वार्थीपणे वागुन प्रत्येक गोष्टीसाठी माझ्यावर अवलंबुन राहणार! स्वामींच्या नांवावर असलेली बेलुरमठाची माल मत्ता रामकृष्ण संघाच्या नांवाने केली. त्यांच्याकडे असलेल्या जबाबदार्‍या त्यांनी योग्य व्यक्तींकडे सुपुर्द करुन ते पुर्णपणे मोकळे झाले.

        ९ डिसेंबर १९००ला स्वामीजी रात्री बेलुर मठात पोहोचले.तिथे त्यांना हिमालयातील मायाववतील सेव्हीयरांचे निधन झाल्याचे कळले.श्रीमती सेव्हीयर यांना भेटण्यासाठी कडाक्याच्या थंडीत अस्वस्थ प्रकृतीत ते ३ जानेवारी १९०१ ला मायावती आश्रमात आले.इतकी त्यांची तब्बेत ठीक नसतांनाही “प्रबुध्द भारत” मासिकासाठी तीन लेख लिहिले.मायावतीला असतांनाच खेत्रीच्या राजे साहेबांच्या निधनाची वार्ता कळली, ज्यांनी स्वामीजींच्या पहिल्या अमेरिकन प्रवासाचा आर्थिक भार उचलला होता. सम्राट अकबराच्या आग्रा येथील कबरी जवळील उंच मनोर्‍याची दुरुस्ती कार्या ची देखभाल करीत असतांना अचानक त्यांचा पाय घसरुन कित्येक फुटांवरुन खाली पडुन मृत्यु झाला होता.

         २४ जानेवारीला स्वामीजी बेलुर मठात पोहोचले.याच सुमासास त्यांना पूर्वबंगाल मधुन व्याख्यानासाठी आग्रहा ची निमंत्रणे येऊ लागली.त्याच भागातल्या पवित्र तिर्थ स्थानांना भेट देण्याची इच्छा त्यांच्या आईने व्यक्त केल्यामुळे १८ मार्चला पूर्व बंगालमधील ढाक्याला पोहोचले. त्यांची प्रकृती खालावलेलीच होती.ते मधुमेह दम्याच्या त्रासाने हैराण होते तरी सुध्दा विश्रांती मिळत नव्हतीच. ढाक्यातही त्यांनी दोन जाहीर व्याख्याने दिलीत.त्यानंतर आईसह चितगावजवळ च्या चंद्रनाथ, आसाममधील कामख्या तिर्थक्षेत्री गेलेत.तब्बेत बिघडल्यामुळे शिलांगला बरेच दिवस मुक्काम करावा लागला. मे च्या दुसर्‍या आठवड्यात बेलुर मठात पोहोचले.तिथे त्यांनी जवळ जवळ सात महिने सक्तीची सेवानिवृत्ती घेतली.मित्र व प्रियजन त्यांना खुप जपत, परंतु प्रसंगी उपदेशासाठी आलेल्या शिष्यांना उपदेश करणे सुरुच होते.

          क्रमशः     
संकलन – मिनाक्षी देशमुख.

41 अंतिम भाग

*!!!स्वामी विवेकानंद!!! अंतिम भाग-४१*

      साधुनिवसाच्या दुसर्‍या मजल्या वरील कोपर्‍यातील ऐसपैस खोली त्यांना अतीशय प्रिय होती.तीचा शयन गृह व अभ्यासिका म्हणुन उपयोग करीत असे.त्यांनी कांही पशूपक्षी पाळले होते.हे सर्व प्राणी स्वामीजींवर   खुप प्रेम करीत.मटरु नांवाच्या कोकरा ला ते पुर्वजन्मीचा नातलगच मानत.ते कोकरु जेव्हा मृत्यु पावले तेव्हा त्यांनी लहानमुलासारखा शोक केला होता. मठामधे चिंताममुक्त जीवन व्यतित करु लागले.तरी प्रकृतीला उतार पडण्याचे चिन्हे कांही दिसत नव्हते, पण भावी कार्याचा उत्साह जराही कमी होत नव्हता. १९०१ च्या उत्तरार्धात स्वामीजीं नी मठातील सर्व उत्सव,दुर्गापुजा,लक्ष्मी पुजा व जगन्मातेचे परंपरागत विधिवत पुजन केले.फेब्रुवारी १९०२ मधे बेलुर मठात श्रीरामकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला,पण त्या दिवशी त्यांना जास्त ताप व पायही दुखत असल्यामुळे ते खोलीतच होते. तब्बेत थोडी बरी असल्यामुळे १९०२ जाने.-फेब्रु.ला जपानचे विद्वान बौध्द यांच्यासोबत अखेरच्या वाढदिवसाला बोधगयाला आलेत.

श्रीरामकृष्ण परमहंसांची प्रथम भेट याच बोधगयाला घडली होती.

        वाराणसीत असतांना एका राजाने तिथे मठस्थापण्यासाठी दिलेले पैसे व व्यवस्था स्वामी शिवानंदांवर सोपवली. या मठाला “रामकृष्ण होम ऑफ सव्हिस” असे नांव दिले.पुढे हे होम वैद्यकीय सेवा देणारी मोठी संस्था म्हणुन नांवारुपाला आली.ते वाराणसी हुन बेलुरमठात पोहोचले तेच मुळी बिघड लेली प्रकृती घेऊनच! मधुमेहामुळे रक्त भिसरणाला अडथळा येऊ लागला, पायांना सुज आली,शरीराचा कांही भाग संवेदनाहीन बनला होता,झोपेत डोळे बंद होत नव्हते. डॉक्टरांनी २१ दिवसां साठी पाणी व मीठ वर्ज्य केले.त्यांचे शरीर जरी चैतन्य हरवुन टाकणार्‍या आजाराला बळी पडले असले तरी मनाचा उत्साह टिकवुन होते.या काळात ते एन्सायक्लोपिडीया ऑफ ब्रिटिश चे खंड वाचत होते.

     कधी कधी त्यांच्या मनांत येत असे की, मठ,जमीन वगैरे सर्व विकुन गरीब व दैन्याने पिडीत लोकांचा उध्दार करावा.सन्यासांना निवार्‍याची आवश्य कताच कां असावी? पण काय दुर्दैव? या तळागळातील गरीब,दीनदुःखीतां साठी,देशाचा कणाच ज्यांच्या श्रमावर, जे अन्न पिकवतात, ज्यांची फक्त एक दिवसाची गैरहजरी हाःहाकार उडतो, अशा लोकांना मदत,

सहानुभुतीचा कोणी हात पुढे न करावा,ही खंत होती त्यांच्या मनांत….

       स्वामीजींची तब्बेत दिवसेंदिवस ढासळतच होती.त्यांचे कार्य पुढे नेण्यास फारच कमी युवक पुढे आले,त्यामुळे शारीरिक वेदनेपेक्षा ही खंत जास्त वाटत होती.स्वामीजींना भयंकर त्रास होत असतांनाही,मठाचे देनंदिन कामे, भेटीगाठी,उपदेश करणे सुरुच होते.प्रतिबंधालाही ते मानत नसत.अशाप्रकारे जीवनाच्या अंतापर्यंत मठाचे महान नेते बनुन राहिलेत.त्यांनी मठाचे नियम कडक पाळण्यावर नियंत्रण ठेवले होते.  त्यांनी अगदी मन हेलावुन जाणारे शेवटचे पत्र कु.मेरी हेल व प्रिय शिष्या भगिनी निवेदितेला लिहिले होते.

          सुर्य मावळतीच्या क्षितीजाकडे वेगाने झेपावत होता. त्यांच्या शेवटच्या महिन्यांमधे अंतकालच्या सुचना मिळणार्‍या अनेक घटना घडत होत्या. त्यांच्या इच्छेनुसार निरनिराळ्या भागातुन अनेक शिष्य गोळा झाले,पण त्यांच्या अंतकाळाची शंकाही कोणाला आली नाही.इतरांना त्यांची त्यांची जबाबदारी सोपवित मुक्त होत होते.त्यांची चिंतनशील मनोवस्था पाहुन सर्वजन काळजीत पडले.अमरनाथ गुहेत भगवान शिवांनी दिलेल्या “वरा” नुसार इच्छा केल्या शिवाय मृत्यु येणार नाही हे त्यांना आठवले.त्यानुसार हे पार्थिव शरीर कोणत्या दिवशी सोडायचा याचा निर्णय केला.त्यांच्या महासमाधीच्या तीन दिवस आधी स्वामी प्रेमानंदांना आपल्या पार्थिवावर कोणत्या ठीकाणी अंतिम संस्कार केले जावे ती मठातील जागा सांगीतली.

       ४ जुलै १९०२ शुक्रवारला स्वामीजी अगदी तरतरीत दिसत होते.शुक्रवारी पहाटेच उठुन दारे खिडक्या पक्क्या बंद करुन त्यांनी तीन तास ध्यानधारणा केली. नंतर कालीमातेची पुजा केली.त्यादिवशी दुपारचे जेवण सर्वांबरोबर घेतले. दिवसभर सर्वांशी हास्यविनोद केला. दोन मैल स्वामी प्रेमानंदाबरोबर फिरुन आले. संध्याकाळी सात वाजतां मी बोलावल्या शिवाय कोणीही खोलीत निघुन गेले. एक तास ध्यान व मालाजप मधे घालवल्यावर आपल्या बिछानात पहुडले.

एक तास झाल्यावर त्यांचे हात किंचित थरथरले. एक दीर्घ श्वास घेऊन दोन्ही नेत्र भ्रुमध्यात स्थिर केले.त्यांच्या मुखमंडलावर दैवी तेज फाकले आणि शाश्वत शांती पसरली.ही महासमाधीची अवस्था नऊ वाजुन दहा मिनीटांनी प्राप्त झाली.त्यावेळी त्यांचे वय ३९ वर्षे पांच महिने २४ दिवसांचे होते,ज्यावेळी त्यांनी देहत्याग केला.

        डॉक्टरांनी मृत्युचे कारण अॅपॉप्ले क्सी म्हणजेच ह्रदयक्रिया बंद पडल्याने झाली.परंतु त्यांच्या निकटवर्तीयांना वाटले की, त्यांनी स्वेच्छेने शरीर सोडले.  दुपारी त्यांच्या पार्थिवावर विधिवत अंत्य संस्कार करुन चंदनाच्या चित्ताने त्यांच्या पार्थिव देहाला लपेटुन घेतले. १६ वर्षा पुर्वी इथेच रामकृष्णांच्या पार्थिवाला अग्नि दिल्या गेला होता. त्याच जागेवर त्यांचे समाधी मंदिर बांधलेले आहे. संपुर्ण बेलुरमठ दुःखसागरात बुडुन गेले मठावर अवकळा पसरली.

      निधनाआधी त्यांचे ऊच्चारले शब्द, जीर्ण वस्राप्रणाणे पार्थिव शरीर टाकावे लागले तरी जोपर्यंत जगात इश्वराचे अस्तित्व आहे तोपर्यत स्रीपुरुषांना प्रेरणा देत माझे कार्य सुरुच राहील” हे  वाक्य सर्वांच्या मनांत निनादत राहिले..

 अहं ब्रम्हास्मि । खल्विदं ब्रम्ह।।….

  *अशा या थोर महामानवाला कोटी कोटी प्रणाम !*

                *समाप्त!*
    संकलन – मिनाक्षी देशमुख.

स्वामी विवेकानंद चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading