स्वामी विवेकानंद चरित्र भाग २, (६ ते १०)

आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न!  सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्‍या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

विवेकानंदाच्या जन्माअगोदर त्यांची माता भुवनेश्वरीदेवींनी आपला वंश उज्वल व्हावा म्हणून इतर धर्मशील हिंदु मातांप्रमाणे अनेक धार्मिक व्रत वैकल्ये,तपःसाधना, उपवास करीत होत्या.त्या शंकरभक्त असल्यामुळे त्या क्षेत्राचे दैवत असणार्‍या विरेश्वर शिवाची विशेष पुजा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! स्वामी विवेकानंद !!!    

                    भाग – ६.

          नरेंद्र आणि रामकृष्णांची ही भेट दोघांच्याही जीवनांतली अत्यंत महत्वा ची घटना  ठरली.नरेंद्र जेव्हाही राम कृष्णांकडे येत, तेव्हा त्याच्या अंतर्मनात वादळ उठत असे.स्वतः रामकृष्णही एके काळी अशाच संघर्षमय अवस्थेतुन गेलेले होते. परंतु त्यांना इश्वरदर्शन व ब्रम्हानुभूती झाल्याने त्यांना शांत शांत वाटत होते. त्यांना आधुनिक विचारप्रणा लीचे ज्ञान नव्हते, याउलट नरेंद्र मात्र आधुनिकतेची मूर्तीच होते.ते चौकस, दक्ष आणि निखळ बुध्दीवादी असुन मनाचा मोकळेपणा असल्यामुळे कोणताही निर्णय किंवा अनुमान घेण्या पुर्वी बुध्दुगम्य सत्य पुराव्याची खात्री करुन घेत.नरेंद्रने स्वतःवर अंधश्रध्देचा पगडा जराही बसु न देता जवळ जवळ पांच वर्षे श्रीरामकृष्णांची परीक्षा घेतली. त्यांना आपले गुरु म्हणुन आध्यात्मिक जीवनाचे आदर्श म्हणुन स्विकारतांना नरेंद्रना अपरिमित दुःखयातनांना सामोरे जावे लागले. पण जेव्हा त्यांना गुरु म्हणुन स्विकारण्याची वेळ आली तेव्हा नरेंद्रने अगदी अंतः पुर्वक दृष्टीने अपरि- वर्तनीय निश्चयाने गुरु म्हणुन त्यांचा स्विकार केला.आणि रामकृष्णांनाही आपली पुर्ण परीक्षा घेऊन स्विकारणारा शिष्य मिळाल्याचा आनंद झाला.त्यांना खात्री झाली की, आपला संदेश जगभर पसरविण्यास नरेंद्रच समर्थ आहे.

       श्रीरामकृष्णांनी असीम धैर्य,प्रेम, प्रत्यक्ष देखरेखेव्दारे आपल्या बंडखोर वृत्तीच्या शिष्याला वशीभूत केले व त्याच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया पक्का करण्यासाठी त्याच्याकडुन नैतिक व आध्यात्मिक साधना करवुन घेतल्या.ह्या शिष्याची भविष्यकालीन महानता त्यांना आधीच कळुन चुकली होती.फक्त योग्यवेळेची वाट पाहत होते.

नरेंद्रनाथ संसारमय दोषयुक्त दुर्गंधाने कलंकित न झालेले दिव्यात्मा होते. साक्षात नारायण होते.असे वाटत असल्यामुळे नरेंद्रवर ते विशेष प्रेम करीत.त्या मुळे त्यांच्यावर टीका सुध्दा होत असे. नरेंद्रची तुलना दुसर्‍याबरोबर करुन स्तुती केली की, त्याला खुप अवघडल्या सारखे वाटत असे, व गुरुंना तसे सांगीत ले की, गुरुदेव म्हणत,हे माझ्या मनाचे बोल नसुन जगदंबेने कांही गोष्टी आधी च दाखवल्या त्याच सांगतोय,पण नरेंद्र चा विश्वास बसत नसे.त्याला दर्शन वगैरे केवळ भ्रम वाटत असे.तरीसुध्दा राम कृष्ण म्हणत, तुझ्यात इश्वर दिसतो.ज्या दिवशी तुझ्यातल्या इश्वराचे दर्शन घडेल त्यावेळी मी सुध्दा तुझ्याकडे पाहु शकणार नाही.

         अभ्यासाच्या किंवा अन्य व्यस्तते मुळे दिर्घकाळ नरेंद्रची भेट झाली नाही की, रामकृष्ण अतिशय अस्वस्थ होत! एकतर त्याला बोलावुन घेत,न आल्यास स्वतः भेटीस जात. एकदा नरेंद्रला भेटा यला ब्राम्हमंदिरात रामकृष्ण गेले असतां तिथे नरेंद्रचा गाण्याचा आवाज ऐकुन ते एकदम भावावस्थेत गेल्याने एकच गोंधळ माजला. नरेंद्र थोडे नाराज झाल्यावर ते अश्रुभरल्या नयनांनी म्हणाले, मला तुझ्यापासुन दूर राहणे अशक्य झाल्याने आलो.एकदा असेच बरेच दिवस भेट न झाल्याने ते नरेंद्रच्या घरी कोलकात्याला पोहोचले. नरेंद्र वर खोलीत अभ्यास करीत आहे हे कळल्या वर उभा जीना चढुन त्याच्या खोलीत गेल्याबरोबर रामकृष्ण समाधीवस्थेत गेले.गुरुदेवांचे आपल्यावर खरेखुरे व निरतिशय प्रेम आहे हे तो जाणत होता. पण मिश्किलपणे त्यांची टीका केली की ते म्हणत थोड्या अवधीतच तु जगदंबे ला मानशील व तीचे नांव घेत अश्रुही ढाळशील.

         नरेंद्रनाथांनी रामकृष्णांचा गुरु म्हणुन कधी स्विकार केला हे सांगणे कठीण आहे.रामकृष्ण हे ऐक परिपुर्ण गुरु होते म्हणुनच त्यांनी नरेंद्रला अहार, यमनियमन,हिंदु पुराग्रंथातील देवदेवतां वर विश्वास ठेवण्याची कधी सक्ती केली नाही.तत्वज्ञानाकडे कल असणार्‍या नरेंद्रला मुर्तीपुजेचेही सक्ती केली नाही. असे असलं तरी त्याचा विवेकविचार, अनासक्ती,आत्मसंयमन आणि नियमित ध्यानधारणा यांवर रामकृष्णांची कडक नजर होती.मानवाचे ईश्वराशी ऐक्य आहे हा दृष्टीकोन नरेंद्रला शुध्द वेडेपणा वाटे.

                 क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

!!! स्वामी विवेकानंद !!!

                 भाग -७.

          एकदा नरेंद्र मित्रांबरोबर राम कृष्णाच्या अद्वैतवादाची चर्चा सुरु अस तांनाच रामकृष्ण तिथे पोहोचले व चर्चा कशावर आहे हे विचारल्यावर,नरेंद्र म्हणाले, इश्वर प्रत्येक गोष्टीत आहे हे दांभिकपणाच आहे,असे म्हटल्यावर त्यांनी नरेंद्रला सहज स्पर्श करुन त्याला एका भावविश्वात नेऊन सोडले.नरेंद्रंना संपुर्ण जग एका दिव्य तत्वाने भरलेले दिसले.त्याच भाव अवस्थेत घरी परत ल्यावर जेवतांनासुध्दा समोरचे पदार्थां मधे,अन्नामधे आणि स्वतःमधे ब्रम्ह एका तत्वाने व्यापले असल्याचे जाणवले.तरी सुध्दा संपुर्ण जग हे स्वप्नच वाटत असे ही दिसणारी दृष्ये खरी की, भ्रामक हे पाहण्यासाठी आपले डोके वारंवार एका पोलादी खांबावर आपटुन अद्वैतत्वाच्या अनुभूतीची झलक पाहावयास मिळाली.याच तत्वाची परिपुर्ण अनुभुती काशीपुरला प्राप्त होणार होती.

         एकदा रामकृष्ण दक्षिणेश्वरला असतांना नरेंद्रने त्यांच्या बिछान्याखाली एक नाणे लपवुन ठेवले. जेव्हा गुरुदेव बिछायतीवर बसले,तेव्हा एखादा विंचु चावल्यासारखे वेदनेने विव्हळत ताडकन उठले.काय झाले म्हणुन विचा रल्यावर लपवुन ठेवलेले नाणे सांपडले. नरेंद्रचीही अनेकदा रामकृष्ण परीक्षा घेत असत. एके दिवशी नरेंद्रच्या खोलीत गुरुदेव आल्यावर त्याच्याकडे कांही न बोलतां पुर्ण दुर्लक्ष केले. दोन तीन वेळा नरेंद्रंनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यावर सुध्दा ते बोलले नाही. एक महिन्यानंतर रामकृष्ण म्हणाले, गेल्या महिण्यात तुझ्याशी एक शब्दही बोलत नसल्यावरही तुं कां येतोस?नरेंद्र म्हणाले तुमच्यावरच्या प्रेमाने,तुम्हाला पहावेसे वाटते म्हणुन! अतीव आनंदाने अलिंगन देऊन म्हणाले,मी फक्त तुझी परीक्षा पाहत होतो,

        रामकृष्णांनी आपल्या तपसाधने द्वारा प्राप्त झालेल्या विविध शक्ती नरेंद्र मधे संक्रमित करायचे ठरवल्यावर, नरेंद्रां नी त्यांना विचारले, या शक्तींमुळे मला इश्वरप्राप्ती होईल का?त्यांनी नकारात्म क उत्तर दिल्यावर,नरेंद्र म्हणाले, आधी  इश्वरप्राप्ती होऊ देत.शिष्याची इश्वर प्राप्तीविषयीची असलेली एकनिष्ठा पाहुन त्यांना अतिशय आनंद झाला. नरेंद्रनाथाच्या जडणघडणीत अनेक गोष्टी कार्यरत होत्या. त्यांची जन्मजात आध्यात्मिक प्रवृत्ती, ऊच्च विचारसरणी सुसंस्कृत आचरण जे आईकडुन प्राप्त झाले होते,मनाची उदारता,सत्याची चाड तसेच त्यांच्या काळातील हिंदु समाजाने अंगीकारलेल्या धर्म व अंधश्रध्दा आणि सामाजिक चालीरिती बद्दल असलेली बंडखोर वृत्ती! हे सर्व ज्ञान त्यांना वडीलांकडुन व पाश्चिमात्य संस्कृतीतुन मिळाले.

        गुरु रामकृष्णांच्या जीवनाची रहस्ये उलगडतां यावी म्हणुन नरेंद्रने मंज्जासंस्थेचे, विशेषतः मेंदु व पाठीचा कणा यांचे कार्य समजावुन घेण्याच्या दृष्टीने पाश्चिमात्य चिकीत्साशास्राचे अध्ययन केले.पण परिणाम मात्र त्यांच्या विचारांत खळबबळ वाढविण्या तच झाली. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष चिंतन व वैयक्तीक अनुभवातुन प्राप्त ज्ञान जास्त सापेक्ष असते हे त्यांच्या लक्षात आले.

        हेगेलचा “वैश्विक विवेकवाद”, वेदां तातील परब्रम्ह आणि फ्रेंच राज्यक्रांती तील समता, स्वातंत्र्य,बंधुतेची एकत्रीकरण करुन दार्शनिक म्हणुन ते स्वतःला अभिव्यक्त करुं पाहत होते. नितीविचार, हेगेलचा ‘वैश्विक विवेकवाद आणि स्वतःच्या व्यक्तीत्वाचा लोप या तिन्ही गोष्टींचा स्विकार करुन संशयवाद व भौतिकवादावर विजय प्राप्त केला.प पण मनःशांती मात्र लाभली नाही. त्यांच्या समोर आतां वेगळीच समस्या निर्माण झाली. एवढं तत्वज्ञान प्राप्त करुनही तारुण्यसुलभ विषयवासनेवर विजय मिळवण्यास सहाय्यभूत नाही हे लक्षात आले,कारण या वासनाच त्यांना अपवित्र,पाशवी,दैहिक वाटत होत्या.म्हणुन त्यांचे मित्र ब्रजेद्रनाथ सीलशी चर्चा केली,पण त्यांचे तत्वज्ञान कांंही पटले नाही.त्यांच्या असे लक्षात आले की, मोहाच्या क्षणांमधे व आत्म मुक्तीच्या संघर्षामधे उन्नत व रक्षण करणार्‍या हाताची गरज आहे.त्यानुसार गुरु रामकृष्णांशी चर्चा केल्यानंतर रामकृष्णांनी सच्चिदानंद ब्रम्हाच्या अनुभुतीद्वारे नरेंद्रच्या मनांत एक विश्वास संक्रमित करुन निश्चिंत केल्या वर नरेंद्रच्या क्षुब्ध अंतःकरणाला शांती मिळाली.

             क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!! स्वामी विवेकानंद !!

                    भाग – ८.

        नरेंद्र गुरुदेवांकडे ध्यानधारणा शिकवण्यासाठी प्रार्थना केल्यावर ते म्हणाले, अंतःकरणापासुन भक्तीभावाने श्रध्देने व विश्वासाने जर प्रार्थना केलीस तर तुझी हाक त्याच्यापर्यंत नक्की पोहचेल.त्यांच्या मार्गदर्शनानुसार नरेंद्रां नी ध्यानधारणेची तिव्रता वाढवत नेली, देहभान हरपु लागले,आंतरिक शांती जाणवु लागली.स्वप्नामधे अद्भुत अनुभूती येऊ लागली.परिणामी ते उच्च त्तम परमानंदात स्थिरावु लागले.गुरुदेव रामकृष्ण आपले कार्य सहजतेने समज णार नाही अशा गुढ पध्दतीने करीत होते.

        १८८४ साली नरेंद्रनाथ बी.ए.च्या परीक्षेची तयारी करीत असतांना त्यांचे कुटुंब कठीण परिस्थितीत सांपडले. वडीलांच्या अचानक निधनाने आई व भावंडे शोकसागरांत बुडुन गेली.वडील, विश्वनाथ दत्त सढळहस्त व उदार असल्यामुळे मिळकतीपेक्षा खर्च प्रचंड होता.त्यामुळे कर्जाचा मोठा बोजा कुटुं बावर पडला.घेणेकरांच्या चकरा वाढल्यात.भरीतभर म्हणुन की काय, वडीलोपार्जित घरात वाटा मिळण्या साठी नातेवाईकांनी फिर्याद लावली. अर्थात त्यांची हार झाली.दरम्यानच्या काळात नरेंद्रनाथांना दारिद्र्याचे चटके बसु लागले.कुटुंबात ते मोठे असल्याने  घरांतील ७-८ तोंडाची भूक शमविण्या साठी नोकरीच्या शोधार्थ उपाशीपोटी, अनवाणी पायाने,जाडे भरडे कपडे  घालुन भटकंती सुरु झाली.याच दरम्यान त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरुं केला. मित्रांंनी दिलेली भोजनादी निमंत्रणे,घरी  सर्वजण उपाशी असतील या जाणीवेने ते नाकारीत असे.घरी स्वतःच्या वाटेचे अन्न भावडांना मिळावे म्हणुन मित्रांकडे बाहेरच जेवलो असे खोटेच सांगत असे. आत्मसन्मानी दत्तकुटुंब कोणाकडुन मदत घेणे शक्यच नव्हते. फक्त एक मित्र मात्र स्वतः उजेडात न येता अधुन मधुन सहाय्य करीत असे.नोकरीचे सर्व प्रयत्न फोल ठरत होते.अशातच एका धनाढ्य महिलेने तर मोहात पाडणारा प्रस्ताव ठेवला होता, पण नरेंद्रने निग्रहा ने स्पष्टपणे नाकारला.

          एके दिवशी नोकरी व्यवसाय शोधण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर थकुन कोलकात्याच्या बगीच्यातील एका स्मारकाच्या सावलीत बसले असतां सांत्वन करण्याच्या उद्देशाने कांही मित्र आले पण त्यांना आवडले नाही.देवाच्या अस्तित्वाचीच शंका घेतल्याचा विपर्यास्त वृतांत रामकृष्णाच्या काना वर गेला पण त्यांचा पुर्ण विश्वास होता नरेंद्रावर! वास्तविकता अशी होती की, लहानपणा पासुनचे धार्मिक संस्कार व गुरुंच्या सानिध्यात आलेल्या अनुभूती मुळे परमेश्वराबाबत ते अविश्वास बाळगु शकत नव्हते, एकदा भर पावसात भिजत नोकरीच्या शोधात उपाशीपोटी अविरत पायपीट करीत होते. थकुन भागुन एका घराच्या ओट्यावर बसले असतां त्यांना ग्लानी आल्यासारखे वाटले. एकाएकी त्यांना इश्वराच्या अनुभुतीची जाणीव झाली. त्यांच्या अंतःकरणातले वादळ शमुन शरीर व मन प्रफुल्लीत झाले. आपण सामान्य माणसाचे आयुष्य जगण्यासाठी नसल्या मुळेच विवाहाचे प्रस्ताव कसे आपोआप फोल ठरले, हे सर्व इश्वरेच्छेनेच घडले हे त्यांच्या लक्षात आले.आणि वैराग्यपुर्ण जीवन जगण्यासाठी संसाराचा त्याग करण्याचा निश्चय केला. योगायोगाने त्याच दिवशी गुरु रामकृष्ण कोलकात्या त येत असल्यामुळे त्यांच्या कृपा-आशि र्वादाने परिव्राजक संन्यासाचे जीवन स्विकारु शकु म्हणुन आनंदित झाले. रात्री दोघेही बोलत असतांना रामकृष्ण म्हणाले, तुझा जन्म जनहितासाठी असुन तू सन्यासी होणार हे मी जाणतो, परंतु निदान माझ्यासाठी मी जिवंंत असे पर्यंत या संसारातच राहावे.

           क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!स्वामी विवेकानंद!!!

भाग-९

         थोड्याच दिवसांनी नरेंद्रला दोन वेळचे अन्न पुरेल इतपत नोकरी भेटली. एके दिवशी नरेंद्रच्या मनांत आले की, गुरुदेव जर कालीमातेला मानतात त्यांची प्रार्थना मान्य करतात, तर आपली दुःस्थिती दूर करण्यासाठी प्रार्थना कां करीत नाही.? असे जेव्हा गुरुंशी बोलले, तर ते म्हणाले, “काली” ही विश्वब्रम्हाडां ची सार्वभौम आदिसत्ता आहे, तू मानत नाहीस म्हणुनच दुःखकष्ट भोगत लागत आहे. आज मंगळवार! देवीच्या अर्चना साठी मंगल दिवस आहे. तिच्या मंदिरांत   जाऊन मूर्तीसमोर मनोभावे, निष्ठने साष्टांग प्रणिपात करुन तुला जे मागाय चे ते मागीतल्यावर मिळाल्याशीवाय राहणार नाही. ती परब्रम्ह आदीशक्ती आहे.आपल्या भक्ताच्या प्रांजळ याचने ची ती परिपूर्ती करतेच करते.

      रात्री नरेंद्रनाथ कालीमंदिराच्या अंगणातुन जातांनाच त्यांचे भावांतर होत असल्याचे जाणवले.नुसत्या दर्शना नेच त्यांचे अंतःकरण आनंदाच्या उसळ्या मारुं लागले. देवीमुर्तीवर नजर  स्थिर झाल्यावर असे दिसले की, ही पाषाण मुर्ती नसुन चिन्मयी मूर्ती आहे.

समाधानाचे संसारी जीवन किंवा आध्या त्मिक मुक्ततेचा आनंद देण्यास सिध्द आहे.त्यांनी विवेक,वैराग्य,ज्ञान,भक्ती मागुन तिच्या अखंड दर्शनासाठी प्रार्थना केली, पण जगन्मातेकडे धनसंपती मागायचे विसरुनच गेले. रामकृष्णांनी त्याला परत त्याच्या निकडीविषयी प्रार्थना करण्यास सांगीतल्यावर परत द्रव्य याचना करण्याचे नरेंद्र विसरले, तिसर्‍या खेपेस सुध्दा असेच घडले. त्यांच्या लक्षात आले की, जगन्माते समोर सांसारीक गोष्टीची याचना करणे, विसरणे ही श्रीरामकृष्णांचीच लीला असणार!आपण सन्सस्त जीवन जगावे हीच त्यांची इच्छा असावी.मग कुटुंबाची कांहीतरी सोय लावण्याची त्यांनाच गळ घातली.

       नरेंद्रला कळुन चुकले की, ब्रम्ह्यच सर्व सृष्टीत मग ते व्यक्त असो की अव्यक्त…. जीव व चैतन्य म्हणुन विल सत असते.वैश्विक तत्व किंवा विश्वात्मा जेव्हा सृष्टी,स्थिती आणि लय करण्या साठी जेव्हा व्यक्तीत्व धारण करतो, तेव्हा त्याला व्यक्त परमेश्वर म्हटल्या जाते.आणि कालीमाता हे असेच व्यक्त रुप आहे.स्वतःमधे सृष्टी,लय,प्रेम,भय, जीवन,मृत्यु धारण करणारी कालीमाता अखिल विश्वब्रम्हांडाचे सांकेतिक रुप आहे. तीच विब्रम्हाडांची महासत्ता असुन सर्व जीवीतांचे मिळुन होणारे पुर्ण ब्रम्हच होय.पुर्वी नरेंद्रांचा या सर्व गोष्टीं वर विश्वास नव्हता,मानत नव्हते,म्हणुन च त्यांना संघर्ष करावा लागला.परंतु त्या मंगळवारच्या पवित्र दिवशी काली मातेच्या दर्शनाने सर्व आवरणे गळुन पडलीत व तीचे भक्त बनले.

        गुरुदेवांच्या आनंदमय सहा वर्षा च्या सहवासात नरेंद्रच्या जीवनाला खर्‍या अर्थाने आकार येऊ लागला.राम कृष्ण कोणत्याही शिष्यावर आपले विचार,उपदेश लादत नसत,पण त्यांच्या विचारांची पवित्रता व मनाची एकग्रता असणे गरजेचे असे.उलट ते शिष्यांशी मित्रवत,

गमतीजमती,थट्टामस्करी करीत,पण शिष्यांनी शरीर व मनाच्या पवित्रतेपासुन जराही ढळलेले खपत नसे.रामकृष्णांनी नरेंद्रनाथाला “चिन्हित शिष्य मानले होते.त्यांची निवड प्रभुने विशेष कार्यासाठी केलेली होती.नरेंद्रच्या शारिरीक,मानसिक विकासावर त्यांचे विशेष लक्ष असे.त्यांनी पाहिले की,महा मोहिनी मायादेखील या धगधगत्या अग्निपुंजाच्या जवळपास देखील फिरकु शकत नाही.नरेंद्रवरील प्रेमभावनेने एकदा गुरुंनी एका धनाढ्य व्यक्तिजवळ नरेंद्रच्या कुटुंबाला कांही आर्थिक सहाय्य मिळुं शकेल कां? असे विचारले ले नरेंद्रला कळल्यावर आपला निषेध व्यक्त केल्यावर,गुरुदेव म्हणाले,तुझ्या सुखासाठी मी कांहीही करुं शकतो,हे ऐकुन नरेंद्र गलबलुन गेलेत.

                 क्रमशः 
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!स्वामी विवेकानंद!!!

भाग-१०

         श्रीरामकृष्णांच्या या आंत्यतिक प्रेमामुळेच नरेंद्रनाथ जीवनांतील दुःख कष्टांचा धीरस्थिरपणे सामना करुं शकले.एका कठोर स्पष्टवक्त्या युवकाचे कोमल ह्रदयाच्या युवकात रुपांतर झाले.रामकृष्णांच्या उपदेशातील गूढ मतीतार्थ समजण्याची तीक्ष्ण व सुक्ष्म बुध्दी नरेंद्रकडे होती.त्यांन वाटत होते की, संपूर्ण जगांत सत्याचा प्रचार करुन सत्य हे विद्वान,मुढ,गरीब,श्रीमंत,

ब्राम्हण शुद्र या सर्वांसाठी सारखेच असावे. त्यांच्या लक्षात आले की, हिंदुधर्म हा केवळ कर्मकांड व रुढीग्रस्त नसुन सर्व समावेशक,व्यापक अशी आंतरिक अनुभुती आहे.सर्व संप्रदाय,मार्ग,मते, सर्व प्रकारचे साक्षात्कार यांचा सन्मान करणे म्हणजेच धर्म व अनेकातील एकता हाच परम आदर्श!

     रामकृष्णांनी आत्म्याचे दिव्यत्व,इश्वराचे अद्वैतत्व,जीवनांतील एकत्व,सत्ते च्या अस्तित्वातील एकत्व,आणि धर्मा धर्मातील सुसंवाद नरेंद्रनाथाच्या लक्षात आणुन दिला.

रामकृष्णांनी हिंदु, ख्र्चिश्चन,इस्लाम अशा वेगवेगळ्या धर्मा तांची साधना करुन परतत्वाची अनुभुती घेतली होती. ते सर्व शिष्यांना सांगत, इश्वर सर्वत्र आहे व मी त्याचा एक अंशभाग असुन तो स्वामी व मी सेवक! “तो” मीच आणि मी “तोच” आहे. नरेंद्र त्यांना साक्षात धर्मच समजत! रामकृष्ण सतत शिष्यांची परीक्षा घेत असत,त्यांत नरेंद्र त्यांच्या परीक्षेत उतरलेत.ते आसक्ती किंवा इंद्रियसुखाला कशालाही वश होत नाही. जणुं नर-पारवाच!

        १८८५ मधे रामकृष्णांच्या घशाचा त्रास सुरु झाला.पुढे कर्क रोगाचे निदान झाल्यावरही डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन आध्यात्मिक साधना,भक्तां शी संभाषण सुरुच असे.त्यामुळे त्यांचा आजार बळावला.प्रथम कोलकात्याला व नंतर काशीपुर उद्यानगृहात हलविले. नरेंद्र व कांही अंतरंग शिष्यांनी त्यांची सेवा शुश्रुषा करुं लागले.श्रीकृष्णांच्या आजाराच्या काळात नरेंद्रची तीक्ष्ण अंतरदृष्टी व परिपक्व निर्णयशक्तीचें दर्शन सतत होत राहिले.रामकृष्ण म्हणजे इश्वर व मानव यांचे एकत्रीकरण असल्याने त्यांचा भौतिक देह व जन्म, वृध्दी,र्‍हास आणि लय प्रकृतीच्या नियमाला अपवाद आहे, त्यांचा आजार  ही प्राकृतिक घटना असुन कोणताही अलौकीक रंग देण्यास नरेंद्रने स्पष्ट नकार दिला, पण रामकृष्णांची सेवा शेवटपर्यंत करण्यास ते कटीबध्द होते.

        रामकृष्णांच्या आजाराला उतार पडण्याचे कांहीच चिन्ह दिसेना.कांही शिष्य संसर्गाच्या भितीने त्यांच्या जवळ जाण्यास कचरतात असे पाहुन, नरेद्रांनी त्या सर्वांना त्यांच्या खोलीत नेऊन राम कृष्णांनी अर्धवट उष्टावलेली लापशी पिऊन शिष्यांचा गैरसमज दूर केला. त्यांच्या आजाराचे स्वरुप पाहुन नरेंद्रला कळून चुकले की, आतां गुरुदेव फार कमी दिवसांचे सोबती आहेत.

       एक दिवस नरेंद्रने त्यांना दिर्घकाळ भावसमाधीत कसे राहतां येईल विचार ल्यावर, ते रागावुन म्हणाले,तू एखाद्या विशाल वटवृक्षासमान वाढुन हजारों पांथस्थांना सावली देशील! असे असतांना स्वमुक्तीसाठी कां तडफडतोस?नरेंद्र ला गुरुंच्या अंतःकरणाची व्यापकता कळुन चुकली.

नंतर रामकृष्णांनी नरेंद्र ला ध्यानधारणेविषयी मार्गदर्शन केले. नरेंद्रनाथ शब्दशः इश्वरसाक्षात्कारा करितां व्याकुळ झाले. पंचवटीतील वृक्षाखाली बसुन ध्यान धारणेंत अनेक दिवस रात्र घालविल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याची अनुभुती व इतरही आध्यात्मिक दर्शने नरेंद्रला घडली,परंतु महाविद्यालयीन अभ्यासाकडे पुर्ण दुर्लक्ष झाले.नरेंद्रनाथांच्या आध्यात्मिक

संघर्षावर गुरुदेव प्रसन्न होते,त्यांना आपला आध्यात्मिक वारसा पुढे नेईल याची त्यांना खात्री झाल्याने त्यांचे सर्व शिष्य नरेंद्रच्या सुपुर्द करुन रामकृष्ण त्यांना म्हणाले, मी देह ठेवल्यावर त्यांची साधना खंडीत होणार नाही याची काळजी घे!

              क्रमशः
संकलन- मिनाक्षी देशमुख.

स्वामी विवेकानंद चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading