
विवेकानंदाच्या जन्माअगोदर त्यांची माता भुवनेश्वरीदेवींनी आपला वंश उज्वल व्हावा म्हणून इतर धर्मशील हिंदु मातांप्रमाणे अनेक धार्मिक व्रत वैकल्ये,तपःसाधना, उपवास करीत होत्या.त्या शंकरभक्त असल्यामुळे त्या क्षेत्राचे दैवत असणार्या विरेश्वर शिवाची विशेष पुजा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! स्वामी विवेकानंद !!!
*!!!स्वामी विवेकानंद!!!भाग-३१*
हिमालयातील मायावती नांवाने ओळखल्या जाणार्या अतिशय दुर्गम ठीकाणी पौर्वात्य व पाश्चिमात्य शिष्यां ना निराकार इश्वरतत्वाच्या ध्यानधारणेचे प्रशिक्षण देण्यासाठी अद्वैत आश्रमाची, कॅप्टन व श्रीमती सेव्हीयरांच्या औदार्या ने स्थापना केली. कॅप्टन सेव्हीयर यांचे मायावती येथे निधन झाल्यावर श्रीमती सेव्हीयर १५ वर्षे वास्तव्य करुन जवळ पासच्या डोंगरकड्यांतील बालकांना शिकविण्यात स्वतःला गुंतवुन घेतले होते.
स्वामीजी जरी इंग्लडमधे निरनिरा ळ्या ऊपक्रमांमधे जरी गुतले होते तरी भारतातील कार्याचा क्षणभरही विसर पडलेला नव्हता.आलमबाजारातील मठाची स्थापना करतांना भारतातील आपल्या शिष्यांना पत्रात सविस्तर माहिती देत, मठ कशाप्रकारे असावा, अशी आखणी,तसेच स्रियांसाठीही वेगळामठ असावा,तो सारदामाताच्या नियंत्रणाखाली असावा. रामकृष्ण मठाचे कार्यकर्ते लोखंडी बाहुचे,पोलादी नसांचे,वज्रासारख्या मनाचे असावे.
इंग्लडमधे केलेल्या सततच्या परि श्रमाने स्वामीजी अगदी थकुन गेले होते. म्हणुन सेव्हीयर पतीपत्नी व हेन् रिएटा मुलर यांनी त्यांच्या विश्रांतीसाठी एका सहलीचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला. त्यामुळे तेही बालकाप्रमाणे आनंदित झाले. या आपल्या सुह्रदयांबरोबर ३१ जुलै १८९६ ला स्वित्झर्लंडला जायला निघाले. जिनिव्हा,मेर-डी-ग्लेस मॉक्स शिलॉन,शामुनिक्स,दी सेंट बर् नॉड, ल्युकेर्न, दी रिगी झेरमॅट आणि स्कॅफ हाऊड्रेन इत्यादी स्थळांना भेटी दिल्यात. आल्प्स पर्वतरांगातुन मुक्तपणे भ्रमण करतांना ते हरखुन गेले. स्विस खेडुतांचे जीवन व चालीरिती व वागणुक, हिमाल यातील लोकांच्या जीवनाशी साम्य असावे असे स्वामींना आढळले.तिथल्या एका खेड्यात असतांना हिमालयात एक मठ स्थापन करुन सर्व कार्यातुन मुक्त होऊन उर्वरित दिवस ध्यानं धारणेत भारतीय व पाश्चिमात्य शिष्य एकत्रित पणे राहुन त्यांना सेवाव्रती म्हणुन घडवा वे असा विचार त्यांनी आपल्या सोबत च्या सोबत्यांना सांगीतल्यावर सेव्हियर दाम्पत्यांनाही ही कल्पना आवडली. हे त्यांचे स्वप्न मायावती येथील अद्वैत आश्रमाच्या उभारणीमुळे साकार झाले, कारण आश्रमातुन बर्फाने आच्छादिले ल्या हिमालय पर्वताचे अनुपम दर्शन होत होते. आल्प्स पर्वतांमधे भटकंती सुरु असतांनाच सुविख्यात प्राच्यविद्या पंडीत व कील विद्यापीठातील तत्वज्ञाना चे प्रोफेसर पॉल डायसन यांनी पत्राद्वारे स्वामींना लवकरात लवकर भेटीला बोलावल्यामुळे स्वामीजींनी आपल्या परिभ्रमणाच्या कार्यक्रमांत बदल करुन जर्मन राष्र्टातील हायडेलबर्ग, कोब्लेन्झ, कोलोन आणि बर्लीन या स्थळांना भेटी देऊन स्वामीजी कील ला पोहोचले.
प्रोफेसर संस्कृतमधील गाढे पंडीत असुन संस्कृत बोलु शकणारे एकमेव युरोपियन होते.ते शंकराचार्यांच्या तत्व ज्ञानाची अद्वितिय उंची जाणु शकणारे होते. या जर्मन पंडीताने स्वामीजी आणि सेव्हीयर दांपत्यांचे स्वागत केले. चर्चेत डायसन म्हणाले की,आध्यात्मिक च्या उगमापाशी घेऊन जाणारी एक चळवळ सुरु होत आहे.विविध देशात सुरु होणार्या या चळवळीचे नेतृत्व कदा चित भारताकडे येईल,कारण भारतच उच्चत्तम आणि महान प्रतिभासामर्थ्य आहे.त्यावेळी स्वामीजी दुसर्याच विचा रांत गर्क असल्यामुळे त्यांचे बोलण्या कडे दुर्लक्ष झाल्याबद्ददल दिलगिरी व्यक्त केली.सहाजिकच त्यांचे संभाषण यौगिक तत्वज्ञान शक्तीकडे वळले.याच कारणासाठी त्यांनी स्वामीजींची भेट घेतली म्हटले तरी चालेल.डायसन यांनी स्वामीजींना कील शहराचे दर्शन घडविले. अॅमस्टरडॅम येथे तीन दिवस घालव ल्यावर सर्व मंडळी लंडनला पोहोचली.
स्वामीजींनी इंग्लडमधे आणखी दोन महिने व्याख्यान देत कांही महत्वाच्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. राजघरा ण्यातील कांही व्यक्तीनी तर वेशांतर करुन त्यांचे व्याख्यान ऐकले.व्याख्याना च्या वेळी असे वातावरण निर्माण झाले की, सर्वश्रोते अगदी भावसमाधीत जाऊन पोहचली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-३२*
अभेबादानंद भारतातुन इंग्लंडमधे आल्यावर त्यांनी केलेल्या त्यांच्या पहिल्याच भाषणाची झालेली प्रशंसा पाहुन स्वामी विवेकांदांना वाटले मी जरी या भूमीतुन लोप पावलो तरी याच्या मुखातुन माझा संदेश जगभर निनादत राहील.युरोपमधे स्वामीजी जरी व्यस्त होते तरी अमेरिकेतील कार्याशी संपर्क ठेवुन होते. १६डिसेंबर १८९६ ला ल्युईटपोल्ड जहाजाने स्वामीजी, सेव्हीयर दाम्पत्य व गुडविन भारतांकडे निघाले.त्यांचा भव्य निरोप समारंभ ५०० लोकांच्या उपस्थितीत होत असलेल्या भेटीगाठीच्या वेळी स्वामींचा आवाज रुध्द होऊन अश्रु दाटुन आले. स्वामीजींच्या पश्चात तेथील कार्य अभेदा नंदानी सुरु ठेवायचे ठरले.
एकदा स्वामीजी कु.मुलर व इंग्रज मित्राबरोबर शेतात फिरत असतांना एक क्रुध्द बैल उधळत त्यांच्याकडे येत आहेसे पाहुन इंग्रज पळुन गेला. मुलरला पळणे अशक्य झाल्याने मटकन खालीच बसली. तीच्या रक्षणार्थ स्वामीजी दोन्ही हाताची घडी करुन दृढ पणे उभे राहिले.येणारा क्रुध्द बैल कांही पावलांच्या अंतरावर येऊन थांबला व शांत होऊन माघारी निघुन गेला.असेच असाधारण धैर्य त्यांच्याबालपणी घोड्यां च्या टापांखाली येत असलेल्या एका बालकाचा जीव प्रसंगासावधान दाखवुन वाचवला.
अशाच एका भावेशात स्वामीजी म्हणाले, मी २० व्या वर्षी सहानुभुती शुन्य, सर्वांशी तुटक वागणारा हेकेकोर होतो, तर आतां तेहतीसव्या वर्षी किती ही वाईट स्थितीत राहयचा प्रसंग आला तरी मनावर कांहीही फरक पडत नाही. माझ्या वाटेचे कार्याचा भाग संपल्यामुळे यातुन बाहेर पडण्याची तळमळ लागली आहे.आपल्या मातृभुमीतील दुर्घट आणि भारतातील संगठणाचे कार्य या धरातलाचा निरोप घेण्याआधी करायचे होते.भारतावर त्यांचे निरितिशय प्रेम होते. पाश्चिमात्य ही कर्मभुमी होती तर भारत ही पवित्र इश्वरी लाभ देणारी पुण्य भूमी आहे.भारताकडे येतांना नेपल्स बंदरापर्यंतचा प्रवास जमीनमार्गे, व नंतरचा प्रवास आनंद घेत रेल्वे मार्गे केला.मिलानमधील भव्य कॅदेड्रल, लिओनार्दोचा लास्ट सपर चित्राकृती, पिसा येथील झुकता मनोरा पाहुन ते विस्मयचकित झाले.रोममधे ख्रिसमसचा सण साजरा करतांना तेथील होणार्या विधी पाहुन भारताची आठवण येत होती.
दोन आठवड्यांच्या सागरी प्रवासांत गेल्या तीन वर्षाच्या अनुभवांच्या आठ वणी जागृत होत होत्या.तीन वर्षापुर्वी ते एक निर्धन,अज्ञात व्यक्ती म्हणुन अमेरिकेत गेल होते,तर आज हजारो लोक प्रशंसा करीत एक प्रेषित,महात्मा,द्रष्टा म्हणुन आपल्या मायभूमीला परतत होते. अमेरिकेत गेलेले स्वामीजी,त्या राष्र्टाला पुर्वेकडील कांही देण्यासाठी व ते त्यांनी भरभरुन दिलेही! आणि भारतात परतलेले “स्वामीजी” ही भारता ला मिळालेली एक अपुर्व अशी भेट होती.
भारतात येतांना सागरी प्रवासात दोन ख्रिश्चन मिशनरींशी चर्चा करतांना ते हिंदु धर्मावर अर्वाच्य शब्दात टीका करताहेत हे पाहुन, संतापाने दोघांपैकी एकाची गचांडी पकडत धमकीवजा स्वरांत गरजले, जर कां तु हिंदु धर्माला आणखी एक जरी शिवी दिलीस तर सरळ तुला समुद्रात फेकुन देईन.त्यांची देहयष्टी पाहुन घाबरुन माफी मागीतली.
भारताच्या किनार्याला जेव्हा स्वामीजींची बोट लागली, व भगव्या वेशातील तेजस्वी स्वामीजीची मूर्ती दिसली तेव्हा किनार्यावरील जमावाने प्रचंड जयजयकार करुन त्यांचे चरण स्पर्श करण्याकरितां जमीनीवर झोकुन दिले.नंतर त्यांची भव्य मिरवणुक काढली.पण स्वामी विवेकांनद जराही विचलित न होता, हा दिलेला सन्मान म्हणजे भारताच्या आध्यात्मिक आदर्शा चाच होता.हा वैयक्तिक सन्मान नसुन हा जयजयकार म्हणजे एका तत्व विचाराला दिलेली मान्यता होती.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-३३*
रामनदच्या राजेसाहेबांनी केलेल्या स्वागताने स्वामीजी अगदी भारावुन गेले.अमेरिकेत जातांनाही राजे साहेबांनी आर्थिक मदत देऊन प्रोत्साहित केले होते आणि आता स्वागताचा त्यांचा रथ ओढणार्यांपैकी ते एक होते. शिवाय रामेश्वरला ४० फुट उंचीचा विजयस्तंभ उभारुन प्रसंगोचित शिला लेखही कोरला.या घटनेच्या प्रित्यर्थ दुष्काळग्रस्त मद्रासला निधि पण दिली. स्वामीजींच्या दर्शनासाठी मद्रासजवळ च्या छोट्या रेल्वे स्टेशनवर न थांबणारी गाडी रुळावर जमावाने ठाण मांडल्या मुळे थांबवावी लागली. या प्रेमाने स्वामी जी भारावुन जाऊन त्यांनी जमावाला दर्शन व आशिर्वाद दिला.
मद्रासमधे स्वामीजींचे भव्य स्वागत झाले.त्यांची भव्य मिरवणुक कॅसल कर्नल श्री बिलीगिरी अय्यंगारां च्या प्रशस्त निवासस्थानी नेण्यात आली. मद्रासमधील छोट्याश्या मुक्कामांत स्वामीजींनी “माझ्या मोहिमेची योजना” “भारतीय महापुरुष” “भारताचा भावी काळ” आणि “आपल्यापुढील कार्य” अशी चार उद्बोधक व प्रेरक जाहीर व्याख्यान करुन त्यांच्या महानतेची व त्यांच्यातील उणीवांचीही आठवण करुन दिली. तसेच भूतकाळाचा अभिमान व भविष्यकाळात आशावाद ठेवण्याचे आव्हानही त्यांनी केले. “माझ्या मोहिमेची योजना” या वरील व्याख्यानात कोतेपणा बाळगणार्या कांही थिऑसॉफिस्ट लोकांचे पितळ स्वामीजींनी उघड पाडले.याच लोकांनी अमेरिकेत त्यांच्या कार्यात बाधा आण ण्याचे प्रयत्न केले होते.शिवाय हताशा वस्थेत सागरी संदेशाद्वारे पैसे मागवले होते,तेव्हा याच थिऑसॉफिस्ट च्या लोकां नी अतिशय वाईट अनुद्गार काढले होते, तरी त्यातही स्वामीजींचे कांही चाहते व शुभचिंतकही लोक होतेच.
मद्रासच्या नऊ दिवसांच्या मुक्का मात स्वामीजींना क्षणाची ऊसंत मिळाली नाही.स्वामी विवेकांनदांनी कोलंबो ते मद्रास या प्रवासात जी व्याख्याने दिली होती ती प्रेरणा आणि उत्साहवर्धक होती.भारताने अखिल जगातील राष्र्टांमधे अपले स्वत्व प्रस्था पीत करण्यासाठी भारतीयांची कठोर कानउघाडणी करण्याची गरज त्यांना भासली.आठवण होते ती श्रीकृष्णाने अर्जुनाची कुरुक्षेत्री कानऊघडणी केल्याची.क्रांतीकारी आव्हानाला सुयोग्य प्रतिसाद मिळाला.भारताला आत्मशक्ती व मानवामधे निद्रिस्त असणार्या इश्वराची जाणीव झाली. राष्र्टीय भावनेची जागृती करणारे पहिले श्रीरामकृष्ण परमहंस व स्वामी विवेका नंद हे राष्र्टीय नेते होय.तथापी विवेकानंद हे लढवय्ये असले तरी राजकारणी नव्हते.त्यांचे संदेश एकाच वेळी राष्र्टीय व आंतरराष्र्टीय अशा दुहेहरी स्वरुपाच्या पातळीवर होते.
मद्रास ते कोलकाताचा जलप्रवास करत नंतर आगगाडीने स्वामीजी व मंडळी १९ फेब्रुवारी १८९७ ला कोलकात्यात पोहोचले. येथे त्यांचे भव्य स्वागत करुन वाजत गाजत भक्तीगीते गात, प्रचंड मोठी मिरवणुक गंगातीरी असलेल्या निवासस्थानी आली.
स्वामीजींच्या स्वागताची जाहीर सभा २८ फेब्रुवारी १८९७ रोजी राजा विनयकृष्णांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली.पांच हजारांहुन जास्त अस लेल्या श्रोत्यांना उपनिषदांच्या शाश्वत तत्वज्ञानाकडे परतण्याचा उपदेश केला. त्याचवेळी श्रीरामकृष्ण परमहंसांनाही भावपुर्ण श्रध्दांजली वाहत,त्यांचे स्तवन करत म्हणाले, आज मी जो कांही आहो ते त्यांच्यामुळेच! कांही दिवसांनी “वेदांताचे विविध पैलु या विषयावर आणखी एक जाहीर भाषण कोलकात्यात दिले.थोड्याच दिवसांत दक्षिणेश्वर ला श्रीरामकृष्णांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात स्वतः स्वामीजींनी जातीने साजरा केला.त्यांना विश्रांतीची अतिशय निकड होती पण, लोक सतत त्यांना पाहण्यासाठी,
भेटीसाठी,आदर भाव व्यक्त करण्यासाठी कांही तात्विक चर्चा, करण्यासाठी तर कोणी त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी येतच असत.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख,
*!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-३४*
स्वामीजींचे सारे लक्ष सुशिक्षित ब्रम्हचारी तरुणांवर होते,ज्यांनी ‘माणुस’ घडविणार्या धर्माचे प्रचारक व्हावे, त्यांच्यात आपला उसळता उत्साह संक्रमित करावेस वाटत.एक दिवस कितीही प्रयत्न केला तरी आपले मन ध्यानात लागत नाही अशी तक्रार करत एक तरुण स्वामीजींकडे आला असतां, स्वामीजी त्याला म्हणाले, खोलीचा दरवाजा बंद न करतां,डोळे उघडे ठेवुन अवतीभवती पहा.आसपासचे शेकडो गरीब,अनाथ,दुर्बल लोकांची, आजार्यां ना औषधोपचार, अशिक्षितांना शिक्षण देणे हे तुझ्या कुवतीनुसार केल्यास नक्कीच तुला मनःशांती मिळेल.
स्वामीजींचे अंतःकरण किती कोमल व कनवाळु आहे हे त्यांच्या शिष्यांना कळण्यासाठी गुरु रामकृष्णां चे अत्यंत जवळचे गृहस्थभक्त नाटक कार गिरिषचंद्र घोष, जेव्हा आपल्या शिष्यांना वेद व त्यावरील सायणाचार्यां चे निरसव दुर्बोध भाष्य सांगत असतांना तिथे आले व आपल्या काव्यमय भाषेत सर्वसामान्य लोकांचे दैन्य, उपासमार, हिंदु स्रीयांची पिळवणुक,गरीबीने पिचले ली शरिरे,सोसाव्या लागणार्या हाल अपेष्टा यांचे वर्णन करणे सुरु केले. आपल्या गुरुबंधुने केलेले हे वर्णन ऐकुन स्वामीजींच्या भावना अनावर झाल्यात, नेत्रातुन घळघळा अश्रु वाहु लागले, आणि आवेगात तिथुन निघुन गेलेत. शिष्यांना त्यांच्या विशाल अंतःकरणाची संवेदनशीलता दिसुन आली.
रामकृष्णांचे निस्सीम भक्त असलेल्या श्री बलराम बासुंच्या निवासस्थानी १ मे १८९७ रोजी स्वामी विवेकानंदांनी आपले कार्य संघटीत स्वरुपात करण्या च्या हेतुने सन्यासी व गृहस्थभक्तांची बैठक घेऊन हिंदु व अमेरिकन समाजा ची तुलनात्मक विचार मांडुन हिंदुमधे संघटनेचा कसा अभाव आहे?बौध्द धर्माचा भारतात व बाहेरही कसा प्रसार झाला?हे विशद केले. संन्यासी, भक्ताना शैक्षणिक,समाजहीत व धार्मिक उपक्रमांमधे सुसंघटीत होऊन कार्य करण्याचे आव्हान केले.आणि त्यांच्या प्रास्तावाला मान्यता देऊन सर्वानुमते “रामकृष्ण मिशन असोसिएशन” संस्था निर्माण झाली. या संस्थेत— जनसामा न्यांची भौतिक व आध्यात्मिक कल्याणा साठी ज्ञानविज्ञानाचे शिक्षण देण्यास समर्थ सेवाव्रती प्रशिक्षणार्थी, कला व जिवनाश्यक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देऊन विकास साधणे, रामकृष्णांनी दाखवुन दिलेल्या वेदान्त व तत्वांची ओळख सर्वसामान्य लोकांना करुन प्रसार करणे हे उद्दीष्ट ठरवल्या गेले.
ही ध्येय साध्य करण्यासाठी रामकृष्ण मिशन असोसिएशनमधे भार तातील कार्यासाठी एक व विदेशात एक असे दोन विभाग पाडले.पहिल्या विभागात वेगवेगळ्या ठीकाणी अंतर्योग शिबिरे व मठमंदिरांची स्थापना करुन जनसामान्यांना ज्ञानदान करणारे संन्यासी व गृहस्थभक्तांना प्रशिक्षित केले जातील व दुसर्या विभागात संघा चे प्रशिक्षित सदस्य दुसर्या देशांमधे पाठवुन जवळीकतेचे संबंध प्रस्थापित सामंजस्य निर्माण करुन वेदान्तविचारा चा प्रसार करणारी केंद्रे सुरु करतील.
एक दिवस बलराम बसुंच्या कोलकात्यातील घरी,ज्या स्वामी योगानंदांना अंतरंग शिष्य मानले होते, त्यांचे व स्वामीजींचे खुप मतभेद झाले. आपले विचार त्यांना पटवुन देतांना स्वामीजींच्या भावना अनावर होऊन, आवाज दाटुन आला, शरीर थरथर कापु लागले.डोळ्यात अश्रु उभे राहिल्यामुळे ते एकदम खोलीत जाऊन ध्यानस्थ झाले.मिटल्या डोळ्यातुन अश्रुधारा वाहत होत्या.थोड्या वेळाने शांत होऊन परत बैठकीत सामील झाले.हळुवार आवाजात म्हणाले,गुरु रामकृष्णांनी माझेवर फार मोठी जबाबबारी सोपवली अजुन मला बरेच कार्य करायचे आहे. स्वामीजींचा अंतरात्मा जागृत झाल्याची जाणीव सर्वांना झाली.गुरुदेवांनी म्हटल्या प्रमाणे,ज्या दिवशी “स्व” ची जाणीव होईल त्या दिवशी नरेंद्र या देहात राहणार नाही,या शब्दांचे स्मरण झाल्यामुळे त्या दिवसांनंतर त्यांचे मन दुखेल किंवा टीका करणे सोडुन दिले, कारण गुरुदेवच त्यांच्या करवी कार्य करवीत आहे हे त्या सर्वांच्या लक्षात आले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-३५*
स्वामी विवेकानंदांनी मानवाच्या दुःख परिहारासाठी आपल्या समाधी तत्वाच्या आनंदाने त्याग केला.त्यांच्या या वृत्तीचा परिणाम गुरुबंधुंवर झालाच. त्यांचे गुरुबंधु स्वामी अखंडानंदांनी बंगा लमधील मुर्शिदाबादेतील दुष्काळग्रस्र पिडीतांची सेवा व अन्नधान्याची सोय केली.स्वामी त्रिगुणातीनंदांनी दिनाजपुर येथे दुष्काळ निवारण केंद्र उघडले,तसेच देवधर,दक्षिणेश्वर,कोलकाता येथेही अश्याच केंद्रांची स्थापना केली. भारता तील कार्याला वेग येत असलेला पाहुन स्वामींना समाधान वाटले. १८९७ मे पासुन वर्षाअखेर पर्यंत ऊत्तर भारतात परिभ्रमण करुन त्या भागात भरपुर व्याख्याने दिलीत.त्यांची बिघडती प्रकृती पाहुन विश्रांती व हवापालट करण्यासाठी अल्मोडाला जाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला.
स्वामीजी लखनौला कांही गुरुबंधु, शिष्य,सेव्हीयर दाम्पत्य,कु.मुलर व गुडविनसह पोहोचले.आल्मोडा येथील सृष्टीसौंदर्याने आंतरिक शांती प्राप्त झाली.ते आनंदात असतांनाच मनःस्थिती बिघडवणारी माहिती मिळाली.अमेरिकेतील मित्रांनी पत्राद्वारे त्यांना कळविले की, कांही ख्रिश्चन मिश नर्यांनी त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे ऊडवणारे निंदाजनक अभिप्राय प्रसृत केला असुन त्या निंदक मंडळींमधे सर्व धर्म परिषदेचे डॉ. बेराज देखील सहभा गी होते.स्वामीजींना भारतात मिळत असलेल्या प्रसिध्दीने डॉ.बेरोजचा मत्सर जागा झालेला दिसतो. असे असुनही स्वामीजींच्या सुचनेवरुन मद्रासच्या लोकांनी मद्रासला आलेल्या बेरोजचे भव्य स्वागत केले.
याच अस्वस्थ मनःस्थितीत ३जुन १८९७ मधे लिहालेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, माझ्यापुरता विचार केला तर, माझ्या देशबांधवांना जागृत केले,मी पुर्ण पणे संतुष्ट आहे. मी आतांपर्यंत जी कांही कार्ये केलीत त्यांत स्वार्थाचा शुल्लकासाही अंश नव्हता.सत्याची अनुभुती मला झाली आहे.
आल्मोडा वास्तव्यात स्वामीजीं च्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली. अल्मोडाहुन स्वामीजी पंजाब व काश्मीरच्या वादळी दौर्यावर असतांना नवचेतना प्राप्त हिंदु धर्माची बीजे पेरली. बरेरी मधील विद्यार्थ्यांना व्यावहारीक वेदांताचे करण्यासाठी संघटीत होण्यास प्रोत्साहित केलेत. नंतर अमृतसर,धर्म शाला,मुरी इथे कांही दिवस घालवुन ते काश्मीरला गेले.जम्मुमधे काश्मीरच्या महारांजांशी दिर्घ मुलाकतीत एखाद्या मठाची स्थापना करण्याबद्दल विचार विनिमय केला. लाहोरला स्वामीजींनी अनेक व्याख्याने देऊन,तेथील विद्यार्थ्यां ना जाती पंथविरहित संस्था तयार करुन, या संस्थेद्वारे गरीबांना आरोग्याचे धडे देणे, शिक्षणाचा प्रसार, आरोग्य सेवा सुश्रुषा यासारखी कामे करण्या साठी त्यांना प्रोत्साहीत केले.
तिथुन स्वामीजी डेहराडुनला आले. तिथे दौरा संपेपर्यंत शास्रग्रंथाचा अध्यय न वर्ग सुरु ठेवला.तेवढ्यातच खेत्रीच्या महारांजाच्या आग्रहाच्या निमंत्रणावरुन त्यांच्या राजधानीस पोहोचले.
स्वामीजी कोलकात्याला परतण्यापुर्वी किशनगड, अजमेर,जोधपुर,इंदूर,खांडवा या ठीकाणी भेटी देऊन उत्तर भारत दौर्या ची इतिश्री केली.या प्रवासात स्वामीजीं नी देशवासियांना हिंदुधर्माची महत्वपुर्ण वैशिष्टे विशद करुन देशबांधवांनी हा वारसा पुढे चालवल्यास भविष्यकाळ वैभवशाली होऊन,त्याग व सेवा तसेच धैर्य,बल,आत्मसन्मान,प्रेम मानवसेवा विशेष गुण युवकांनी आत्मसात करावे असा उपदेश केला.खरे राष्टभक्त निर्माण होणारे विद्यापीठ तयार व्हावीत.हिंदु मुस्लिम ऐक्य साधण्याची गरज असल्याचे, १० जुन १८९८ मधे नैनितालमधील मोहम्मद सर्फराज हुसेन यांना पत्राद्वारे कळविले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-३६*
स्वामी विवेकानंदचे १८९८ हे वर्ष भारतीय आणि पाश्चिमात्य शिष्यांचे जीवन घडविण्यात आणि अगोदर सुरु केलेल्या कार्याला बळकटी आणण्यात गेले.ते कुठेही असले तरी,त्यांना विश्रांती अशी मिळतच नसे.स्वहस्ते शेकडो पत्रे लिहिने,येणार्यांचा ओघ सतत असणा र्यांना भेटणे,विद्यार्थ्याबरोबर तासंतास ध्यानधारणा,भजनगायन,उपनिषदे,भगवतगीता,विज्ञान,
जगातील राष्र्टांचा इतिहास अशा अनेक विषयांवर चर्चा चालत असे.
९ डिसेंभर १८९८ ला बेलूरमठा तील मंदिराचा समर्पन विधी करण्यांत आला. स्वामी स्वरुपानंदांना सन्यास दिक्षा देऊन हिमालयातील मायावती मठ १९ मार्च १८९९ ला स्थापन केलेल्या अद्वैत आश्रमाचे पहिले अध्यक्ष आणि “प्रबुध्द भारत” मासिकाचे संपादक म्हणुन नेमणुक करण्यांत आली.
भारतीय स्रीयांकरितां एक शैक्षणिक संस्था उभारण्याच्या दृष्टीने,श्री व सौ.सेव्हीयर,श्रीमती ओली बुल,कु. हेन्रिएटा मुलर, कु.जोसेफाईन मॅक्लाऊड,कु.मार्गारेट नोबल,ही पाश्चि मात्य मंडळी स्वामींसह भारतात आल्या कु.मॅक्लाऊड यांना आध्यात्मिक शिक्षणाचा भाग म्हणुन ॐ वर ध्यान करण्यास शिकवले.आलेल्या अनुभुतीने त्या इतक्या प्रभावित झाल्या की, स्वामीं जवळ पैसे नसल्याचे पाहुन,जीवनभर ५० डॉलर देण्याचे वचन देऊन लगेच सहा महिण्याचा अॅडव्हान्स पण दिला.ते पैसे स्वामीजींनी नव्यानेच सुरु केलेल्या “उद्बोधन” या बंगाली नियतकालीकेच्या खर्चासाठी त्रिगुणातीनंदांना देऊन टाकले.कु.मार्गारेट नोबल तर स्वामीजीं च्या आध्यात्मिक कन्याच होत्या.त्यांनी आपले जीवन भारताला वाहुन टाकण्या चा निश्चय केला.त्यांनी जेव्हा भारतात येण्याचा निश्चय स्वामीजींकडे व्यक्त केला,तेव्हा स्वामीजींनी त्यांना कळवले होते की,तुमच्या सारखी जातीवंत सिंहीणच भारतातील महान स्रीया निर्माण करण्यास उपयुक्त आहे.परंतु इथे दैन्य,दारिद्र्य,अंधविश्वास,दास्यवृत्ती, जातीभेद,स्पृष्यअस्पृष्य भेद, शिवाय गोरे लोकही विक्षिप्त बाई म्हणुन, व तुमच्या प्रत्येक हालचालीकडे संशयी वृत्तीने पाहतील.त्याशिवाय इथले उष्ण हवा मान,सुखसोयींचा अभाव! ही सर्व परिस्थितीशी तुम्ही धाडसाने सामना करुं शकत असाल तर भारतात तुमचे स्वागत आहे.येथील कार्यात उडी घेण्या पुर्वी सर्वांगीण विचार आवश्यक आहे.आणि जर का कार्यात यश किंवा उबग आला तरी सुध्दा माझ्या अंतापर्यंत तुमच्या पाठीशी असेन.
कु.मार्गारेट नोबल २८ जानेवारी १८९८ मधे भारतात आल्या.मार्चमधे त्यांना ब्रम्हश्चर्याची दीक्षा देण्यांत आली.ह्या सर्व विदेशी स्रीया श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या सहचारिणी सारदामाताच्या स्वाधीन केल्या.हळुहळु त्या सर्वांना हिंदु रिती रिवाज,अन्नपाणी,पोशाख,भाषा व इतर संवयी आत्मसात करायला शिकवले,
स्वामीजींनी आपल्या विदेशी शिष्यांना, भारतातील तिर्थस्थानांची महती,पावित्र्य, मोगल साम्राज्याचा आणि शूर रजपूत योध्यांचा इतिहास, खेडुत लोकांचे जीवन, पवित्र नद्या!घणदाट अरण्य,महाकाय पर्वत,पठारे, वाळवंट या सर्व भौगोलिक घटकांची माहिती त्यांना दिली.शिवाय आपल्या जन्मदात्यांना देवासमान मान,पुजा अर्चना,निश्चित वेळा,देवघर,उजव्या हातानेच अन्नग्रहन,जप,हिंदु स्रीयांची कठोर व्रतवैकल्ये तसेच गुडघे टेकुन नमाज पढण्याची मुस्लीम रीत या सर्व जीवनाची त्यांना सखोल माहिती दिली.
स्वामीजींना हिमालयातील थंड हवे चा त्रास होतो म्हणुन ३० मार्च १८९८ ला ते दार्जिलिंगला गेले,परंतु प्रकृतीत सुधारणा व्हायच्या आंतच प्लेग च्या साथीचा उद्रेक झाल्याचे कळल्यामुळे कोलकत्याला परतावे लागले.कांही स्वयंमसेवकांच्या व मठवासीयांच्या सहाय्याने मदतकार्याची योजना आखली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.


