स्वामी विवेकानंद चरित्र भाग ३, (११ ते १५)

आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न!  सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्‍या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

विवेकानंदाच्या जन्माअगोदर त्यांची माता भुवनेश्वरीदेवींनी आपला वंश उज्वल व्हावा म्हणून इतर धर्मशील हिंदु मातांप्रमाणे अनेक धार्मिक व्रत वैकल्ये,तपःसाधना, उपवास करीत होत्या.त्या शंकरभक्त असल्यामुळे त्या क्षेत्राचे दैवत असणार्‍या विरेश्वर शिवाची विशेष पुजा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! स्वामी विवेकानंद !!!    

भाग – ११.

           रामकृष्णांना घश्याच्या त्रासा मुळे अन्नपाणी घेतांना अतिशय त्रास होत होता,पण केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर देहबोधापासुन अलिप्त व ध्यानांत मग्न राहत असल्यामुळे आजाराची किंचितही जाणीव नसायची.

देह जरी यातना भोगत असला तरी ते आंतरिक शांतीचा अनुभव घेत राही, फुरसतीच्यावेळी दोघेही धर्म व तत्वज्ञान पौर्वात्य व पाश्चिमात्य दोन्ही प्रकारची चर्चा करीत असे.एके दिवशी नरेंद्रनाथां च्या मनांत,जीथे बुध्दांना ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधगयेला जायची तीव्र इच्छा झाल्यावर तिथे गेलेत.तेथील बोधीवृक्षाखाली ध्यान लावले असतां तिव्रतेने बुध्ददेवाचे अस्तित्व जाणवले. आतां नरेंद्रला अद्वैत वेदांतात सांगीतले ल्या निर्विकल्प समाधीची प्राप्ती करण्याचे वेध लागल्याचे गुरुंना बोलुन दाखवले, आणि एके दिवशी संध्याकाळी या अवस्थेची अचानक अनुभूती प्राप्त झाली.संपुर्ण बाह्य जाणीव हरपली. याच अवस्थेसाठी बरेच दिवसांपासुन प्रयत्न सुरुं होते. अशा प्रकारच्या समाधीचे परिणाम फक्त अवतारी पुरुष व इश्वराचे प्रेषितच असे परिणाम झेलु शकतात. रामकृष्णांनी नरेंद्रला उपदेश करीत म्हणाले की, आहार व मित्रपरिवार यांंची निवड अत्यंत विचाराने विवेकपुर्ण करावी.

       रामकृष्णांच्या नाजुक प्रकृतीमुळे ते मानवकल्याणासाठी परिश्रम करुं शकत नसल्यामुळे त्यांना कार्य पुढे चालवण्या साठी त्यांनी शक्तीसंपन्न नरेंद्रची निवड केली.रामकृष्णांचा भौतिक देह हळुहळु जीर्ण होत केवळ सांगाडाच उरला.भयं कर यातना असुन सुध्दा उरली सुरली शक्ती नरेंद्रला घडविण्याकडेच लावली. ते नरेंद्रच्या काळजीतुन मुक्त झाले, कारण जीचे पुर्ण विश्वब्रम्हाडांवर नियत्रण आहे त्या कालीमातेचे शिष्षत्व नरेंद्रांंनी स्विकारले होते.रामकृष्णांनी अखेरचा श्वास घेण्यापुर्वी नरेंद्रला जवळ बोलावुन त्यांनी आजपर्यंत जे कांही आध्यात्मिक साधना मिळवली होती ती सर्व त्याच्या देहात संक्रमण करुन म्हणाले, आतां मी रिक्त झालोय.तुझ्यात संक्रमित केलेल्या या शक्तिंद्वारे जगाती ल फार मोठ्या गोष्टी प्राप्त होतील.त्या दिवसांपासुन नरेंद्रनाथ श्रीरामकृष्णांच्या शक्तीप्रवासाचा मार्ग बनुन गेले आणि त्यांच्या शिकवणुकीचे प्रचारक बनले

       रामकृष्णांनी देह ठेवण्याच्या दोन दिवस आधी नरेंद्र त्यांच्या बिछानाजवळ ऊभे असतांना नरेंद्रच्या मनांत एक चमत्कारिक विचार आला की,गुरुदेव खरोखरच इश्वरी अवतार आहेत का?नरेंद्रच्या मनांतले विचार जाणुन गुरुदेव म्हणाले, अजुनही तुला सभ्रम आहे का? अरे!भूतकाळात जे रामकृष्ण म्हणुन होते तेच  या रामकृष्णाच्या देहात होते. नरेंद्रच्या जिज्ञासेची परिपुर्ती करत म्हणा ले हिंदु लोक ज्यांना इश्वरी अवतार मान तात त्या राम-कृष्णाच्या पंक्तीमधेच आपण आहोत.वास्तविक ब्रम्ह हे आजन्मा अविनाशी आहे.सर्व जीवांची इश्वरही ब्रम्हच आहे. तरीदेखील प्रत्येक युगामधे मांगल्याच्या,कल्याणाच्या संरक्षणाकरितां व दुष्टांच्या सहाराकरितां ब्रम्ह मानवी देहामधे अवतार घेतात.

       सामान्य माणसाचा जन्म कर्म सिध्दातांने होतो, तर अवताराचा जन्म जगाच्या कल्याणासाठी स्विकारलेली एच्छिक कृती असते. सारांश! गुरुदेवांनी मृत्युशय्येवर असतांना स्वतःच्या मुखाने आधुनिक युगातील अवतार घेतल्याचे कबुल केले. १५ आॅगस्ट १८८६ ला मध्य रात्री नरेंद्रनाथांना जवळ बोलावुन अगदी खोल आवाजात नरेंद्रला शेवटची शिकवण दिली. मध्यरात्री एक वाजतां रामकृष्णांनी आपल्या प्रिय काली मातेच्या नामाने नादमय स्वरांत त्रीवार उच्चारण करुन ते अंतिम समाधीवस्थेत गेले, जिथुन या संसारी जगात पुनः परतेल नाही.गंगानदीच्या किनार्‍यावर असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्या देहाला अग्नि देण्यात आला. त्यांच्या पत्नीने जेव्हा विधवेची चिन्हे धारण करायला लागल्या तेव्हा “मी मृत्यु पावलेलो नाही” केवळ एका खोलीतुन दुसर्‍या खोलीत गेलो असे आश्वासक शब्द मातांजींना ऐकु आले.

           क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!! स्वामी विवेकानंद  !!!

                    भाग – १२.

            श्रीरामकृष्ण सर्वांसाठी जन्मदा त्या पित्याहुनही अधिक होते.त्यांची शिकवण,त्यांचा सहवास सतत प्रेरणा दायक होता. सर्व शिष्यांना त्यांची अनु पस्थिती खुप अखरत होती.नरेंद्र एके रात्री एका गुरुबंधुसमवेत फिरत असतां ना एकाएकी त्यांच्या समोर तेजोमय आकृती रामकृष्णांच्या रुपात दिसली,आपला भ्रम असावा असे वाटुन ते स्तब्धच राहिले,पण सोबतचा गुरुबंधु विस्मयचकित होऊन नरेंद्रला म्हणाले, अरे! हे पहा, गुरुदेव! नरेंंद्रचा भ्रमनिरस झाला.ते प्रत्यक्ष गुरु रामकृष्णच होते ही खात्री पटल्यावर पुढे होताच आकृती अदृष्य झाली.

        गुरु श्रीकृष्णांच्या अंरंग शिष्यां पेकी तारक,लाटु,बुढो गोपाल या तिघां नी घराचा संबंध पुर्णपणे तोडला होता. त्यामुळे त्यांची व्यवस्था करण्याची जबा बदारी गुरुदेवांच्या आज्ञेनुसार नरेंद्रवर पडली. रामकृष्णांना प्रिय असणारे सुरेंद्र नाथ मित्र यांच्या औदार्याने त्या तिघां च्या खाण्यापिण्याची,राहण्याची व इतर गरजांची समस्या सुटली.कोलकात्याती ल वराहनगरमधे गडबड गोंधळापासुन मुक्त गांवाबाहेर भूतांचा वाडा म्हणुन प्रसिध्द असलेल्या घरांत या तिघांना आश्रय मिळाला. पहिल्यावहिल्या या साधुनिवासाला वराहमठ नांव पडले. नरेंद्र दिवसभर कुटुंबातील समस्यांची काळजी घेत,पण संध्याकाळी मात्र या गुरुबंधुंना आध्यात्मिक साधनेस प्रवृत्त करण्यात घालवी.या तरुण गुरुबंधुंनी अग्निदेवताच्या साक्षीने आजीवन सन्यस्त जीवन व्यतीत करण्याची शपथ घेतली.घरादारांचा कायमचा त्याग करुन पुर्णतः मठवासी झाले. त्यांची ध्यान धारणा इतकी तिव्र होती की, ते तहान भुक हरवुन जात.कधीकधी मठात अन्ना चा कणही नसे,त्यामुळे त्यांना उपास मार होत असे.महिनोनमहिने फक्त उकडलेला भात व पाल्याच्या भाजीवर गुजरान करावी लागत.पण हे पुण्यात्मे इश्वरप्राप्तीसाठी दुःखकष्टे सहन करीत असे.वस्रांच्या बाबतीतही तीच परिस्थि ती.चटईवर झोपणे,फारच थोडे पुस्तके.

      नरेंद्रनाथांनी १८९० मधे परिभ्रमणा साठी मठाच्या बाहेर पाऊल ठेवले. जवळ फक्त एक कमंडलु व दंड होता. जेव्हा परदेशातुन परतले तेव्हा ते पुर्वीचे अप्रसिध्द नरेंद्र नसुन १८९३ मधे शिकागोला घडविलेल्या इतिहासाने ते स्वामी विवेकानंद झाले.अनंतकाळापासु न संन्यासांच्या व भक्तांच्या पदस्पर्शाने पुनित,तेथेच बुध्द,शंकराचार्य,चैतन्यदेव अश्या द्रष्ट्या महापुरुषांना दिव्य मिळालेले संदेश,अशी पवित्र तिर्थस्थान म्हणुन प्रसिध्द असलेल्या वाराणसीस आल्यावर, या पुण्यभुमीत असलेला त्याग,भक्तीच्या भावाने आपले अंतःकरण उन्नत होत आहे असे त्यांना जाणवले.त्यांनी तेथील मंदिरांतील देव देवतांची दर्शने घेतली. गंगेच्या काठावर ध्यानधारणेत असलेल्या तैलंगस्वामी, भास्करानंदस्वामी या सारख्या महा पुरुषांना भेटुन आशिर्वाद प्राप्त केले.

     वाराणसीत असतांना वानरांच्या एका टोळीने नरेंद्रांचा पाठलाग केल्याने सुटकेसाठी ते पळु लागले असतां एका सन्यासाने ओरडुन सांगीतले,पळु नका, मुकाबला करा! हे ऐकुन ते ठामपणे उभे राहुन आक्रमक वानरांकडे एकटक पाहुं लागल्याबरोबर बिचकुन सारे वानर माघार घेत पळुन गेलीत.लोकांनी संकटाचा व आक्रमणांचा दूर पळून न जाता सामना करावा ही स्वानुभवाची शिकवण ते नंतरच्या काळांत आपल्या व्याख्यान,प्रवचनांमधुन देत असे.वाराण सीत विद्वान पंडीत प्रमदादासांशी गाढ मैत्री झाली. दोघेही हिंदुच्या सामाजिक रुढी,शास्रांतील गुढगहन पुष्कळ चर्चा करीत.नंतर अयोध्या,लखनौ,आग्रा करीत वृंदावनला आले.श्रीकृष्णांच्या जीवनांतील अनेक प्रसंग आठवुन मन उचंबळुन व्याकुळ झाले.

                 क्रमशः
संकलन- मिनाक्षी देशमुख.

!!!  स्वामी  विवेकानंद  !!!

                      भाग  –  १३.

           हिमालयाच्या पायथ्याशी असले ल्या हरिद्वारला जाण्यासाठी हाथरस स्टेशनवर आले असतां तिथले स्टेशन मास्तर शरच्चंद्र गुप्त नरेंद्रचे शिष्य झाले.  हाथरस सोडतांना नरेंद्र शरच्चंद्रांना म्हणाले, गुरुदेवांनी मातृभूमीच्या पुनरु त्थान कार्याला वाहुन घेण्याची आज्ञा केली होती.या भारतभूमीमधे एकीकडे आध्यात्मिकतेचा,धर्माचा र्‍हास, तर दुसरीकडे उपासमारीने गांजुन गेलेला भारत बलशाली होण्यासाठी आध्यात्मि क जोरावर प्रयत्न करायला हवेत.शरच्चं द्रांनीहरिद्वारपर्यंत नरेंद्रनाथांची साथ

 केली. ह्रषीकेशला नरेंद्रंना मलेरिया झाल्यामुळे वराहनगर मठाकडे परतलेत

       नरेंद्रांना सतत “कांही तरी करावे” ही इच्छा प्रबळ झाली पण त्यांच्या कौटुंबिक दैन्यावस्थाने मन सैरभैर होत. पाश्चिमात्य देशात जसे विज्ञान व तंत्र ज्ञानाची प्रगती झाली तशी इथे झाल्या शिवाय बहुजन समाजाची भौतिक सुधा रणा होऊं शकणार नाही,म्हणुन पौर्वात्य व पाश्चिमात्य देशांना जोडणारा सेतु बांधावा असे त्यांना वाटत.वाराणसीच्या रस्त्यावर असतांनाच अलाहाबादमधे नरेंद्रचा गुरुबंधु योगानंद आजारी असल्याचे कळल्यामुळे ते अलाहाबाद कडे निघाले.तिथे त्यांना मुस्लिम संत, ज्याच्या अंगप्रत्यंगातुन तो परमहंस असल्याचे जाणवत होते.  त्यांची भेट झाली. तीथेच त्यांना फक्त वायुभक्षण करुन राहणार्‍या पवहारीबाबांची माहिती मिळाली.

       पवहारीबाबांचा जन्म एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता.त्यांनी तारुण्यातच भारतीय तत्वज्ञानावर प्रभुत्व मिळवुन नंतर सन्यास घेतला व तपःपूत जीवन जगुं लागले. त्यांनी योग व वेदांताची साधना करुन संपुर्ण भारतभर भ्रमण करुन शेवटी गाझीपुरला आश्रम बांधुन राहिलेत.ते फक्त पवन भक्षण करीत असल्यामुळे “पवहारीबाबा” म्हणुन प्रसिध्द होते.ते रामकृष्णांना इश्वरावतार मानत.एकदा त्यांना साप चावल्याने भयंकर वेदना होत असतांनाही हा साप इश्वरदूत आहे म्हणालेत.देह ठेवण्यापुर्वी त्यांनी स्वतःला कोंडुन घेतले. अंतिम समय आल्यावर आहुती म्हणुन अग्निला आपले शरीर समर्पण केले.

       नरेंद्र पवहारी बाबांना भेटायला गेले असतां त्यांच्या कमरेत उसण भरल्याने भयंकर वेदनेमुळे परिभ्रमण किंवा ध्यानधारनेसही बसतां येत नव्हते शिवाय ह्रषीकेशमधला गुरुबंधु अभनानं द आजारी असल्याचे कळल्याने ते जास्त व्यथित झाले.नरेंद्र योगसाधने द्वारा देहाचा बोध विसरण्याच्या संदर्भा तील ज्ञान प्राप्त व गुरु  करण्यासाठी ते पवहारी बाबांकडे आले होते,परंतु कित्येक दिवस बाबांनी त्यांची दखलच घेतली नाही.शिष्यांने गुरुविषयी सेवाभाव व विनम्रता अंगी बाळगावे हे  पवरीबाबांची दोन गुणांचा त्यांनी अवलंब केला.तसेच ध्येयाइतकेच साध नेला महत्व देऊन साधकाने साधना व साध्य यांत भेद मानु नये हे पण जाणले.

      पवरीबाबांच्या कृपादृष्टीची वाट पाहत नरेंद्र असतांना, सतत २१ दिवस रामकृष्ण गुरु मुकपणे दाराजवळ प्रकट होऊन ऊभे आहेत असे दृष्य दिसे.नरेंद्र समजुन चुकले की, रामकृष्णांवर  संपुर्ण विश्वास न ठेवल्याने त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली.व नरेंद्र ना खात्री पटली की,रामकृष्ण परमहंस असुन त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.रामकृष्ण हेच एकमेव गुरु आहेत हा पक्का निश्चय झाल्यावर ते परत ध्यानधारणेत मग्न झाले.याच काळात त्यांच्या दोन गुरुबंधुंचा मृत्यु झाला पण त्यांनी मन विचलित होऊ दिले नाही.

        नरेंद्र ज्यावेळी समाधिस्त होत, त्यावेळी त्यांच्या कानावर दारिद्र्य व अज्ञानाने गांजलेल्या कोट्यावधी भारती यांचा करुणाजनक आक्रोश पडे. या लोकांचा त्राता कोण? या सर्व परिस्थीती मुळे आपल्या शुल्लक जबाबर्‍यांवरुन त्यांचे मन उडाले. संपुर्ण जग आपल्या ला खुणावत आहे असे वाटल्याने २५ वर्षाच्या या तरुणाने १८९० मधे वराह मठाचा साक्षात्कार  झाल्याशिवाय परतायचे नाही असा निश्चय करुन हिमालयात जाऊन तपःसाधना करण्यासाठी वराह मठाचा निरोप घेतला. सर्वोच्च प्राप्ती साठी जातांना आईच्या ठायी समजुन सारदामातेचा अशिर्वाद घेतला.

         क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

*!!!स्वामी विवेकानंद!!!

भाग-१४*

         अखंडानंद या गुरुबंधुसह गंगेच्या काठाकाठाने प्रवास सुरु केला.भागलपुर वाराणसी व आणखी कांही ठीकाणी भटकंती करत,एकाही पैशाला स्पर्श न करतां पायीपायीच दोघेही नैनीतालला पोहोचले.अल्मोड्या जवळील एका ओढ्याकाठी असलेल्या वृक्षाखाली ध्यानधारणेत असतांनाच त्यांना उच्च आध्यात्मिक अनुभुती येऊन मनुष्य व विश्वाचे एकत्वाची जाणीव झाली. याच वेळी सासरच्या जाचाला कंटाळुन त्यांच्या बहिणीने आत्महत्या केल्याचे कळल्यावर, आपण अश्या सामाजिक अत्याचाराविरुध्द आवाज ऊठवण्याचे त्यांच्या मनांत आले.

      नरेद्र ह्रषीकेशला पोहोचले पण तिथे त्यांच्या जीवीताची चिंता व्हावी एवढे गंभीर आजारी पडले.आजारांतुन उठल्यावर ते मिरतला आले. तिथे वराह मठाची जणुं छोटी प्रतिकृतिच होती.

१८९१ जानेवारीला पांच महिण्याच्या मुक्कामानंतर गुरुबंधुंचा निरोप घेऊन, अज्ञातप्रवासासाठी, स्वामी विवेकानंद नांव धारण करुन ते दिल्लीकडे निघाले.

त्यांनी कितीही वेशांतर केले तरी त्यांच्या  नेत्रातील चमकेने त्यांचे वेगळेपण दिसत असे. दिल्ली शहरांतील आनंद व जीवंत पणा पाहुन, भारतीय संस्कृतीच्या अमरत्वाची जाणीव झाली. त्यांना शोधत कांही गुरुबंधु आलेत,पण आपल्याला एकाकी अवस्थेत रहायचे आहे असे सांगुन त्यांना परत पाठविले.

       नरेंद्रच्या जीवनावर प्रभाव परिणाम घडविणारे व भविष्यकालीन शिक्षण देणार्‍या अनेक घटनांपैकी तीन घटनां चा प्रामुख्याने निर्देश करतां येईल… (१) रामकृष्णांशी झालेला पवित्र संग (२) पाश्चिमात्य संस्कृतीविषयीचे स्वतःचे ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभुती(३) परिभ्रमणाद्वारे प्राप्त केलेली भारता विषयीची नवजाणीवने त्यांचे झालेले प्रबोधन. त्यांच्या मनमिळावु स्वभावाने कधी एखाद्या शुद्राच्या झोपडीत निवास करीत तर कधी एखाद्या संस्थानाच्या महाराजांशी,

प्रधानमंत्री,सनातनी पंडीत, उदारमतवादी महाविद्यालयीन प्राध्याप कां सोबत राहुन समान पातळीवर चर्चा करीत असत.त्यांच्या याच वागणुकीने लोकांच्या सुखदुःशी,आशानिराशांशी समरस होऊन अर्वाचीन भारताची शोकांतिका समक्ष पाहुन त्यावरील उपाययोजनेसंबधी सतत चिंतनशील असत. जनतेचा आक्रोश,जीवन संघर्ष करीत असलेल्या नररुपी नारायण व्याकुळतेने मदतीच्या हाताची अपेक्षा करणार्‍या मानवांचे दुःखकष्ट बघुन त्यांचे ह्रदय कळवळुन येत.मानवतेच्या कल्याण व सेवेसाठी इश्वराचे माध्यम कसे होऊ शकतो हे परिभ्रमण काळातच त्यांना कळल्यामुळे ते स्वतः शिकले व इतरांनाही शिकविले.

       १८९१ फेब्रुवारीला नरेंद्र अलवार संस्थेत पोहोचले. अलवारच्या महाराजांशी नरेंद्रची शाब्दीक चकमक होत असे. अलवारचे महाराज मुर्तिपुजेच्या पुर्ण विरोधात होते.स्वामी नरेंद्रांनी खुप समजावल्यावरही त्यांची समजुत न पटल्याने भिंतीवरचा त्यांचा फोटो खाली उतरवुन एका सेवकाला त्यावर थुंकायला सांगीतले, या औध्दत्यपुर्ण आज्ञेने दरबारातील प्रत्येकजन भितीने थरथर कापु लागला.स्वतः महाराज पण अतिशय क्रुध्द झालेत. मग स्वामीजी त्यांना म्हणाले,ही फक्त प्रतिमा आहे, आपण स्वतः नाही.तरी देखील या प्रतिमेमुळेच आपले स्मरण,आदरभाव बाळगला जातोच ना?त्याचप्रमाणे एखाद्या देवतेच्या मूर्तीमुळे भक्ताच्या मनांत इष्ट देवतेचे अस्तित्व जागृत होऊन चित्त एकाग्र होण्यास सहाय्य होते.महाराजांच्या लक्षात चुक आल्या वर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.नरेंद्रने तिथल्या लोकांना संस्कृत अभ्यास करण्यास प्रवृत्त केले.पण हा अभ्यास भारतीय ग्रंथातुनच असावा!कारण युरोपियन लेखकांनी भारतीय संस्कृतीच्या र्‍हासाचा कालखंडावरच भर दिला होता,तो त्यांना टाळायचा होता.

             क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

*!!!स्वामी विवेकानंद!!!

भाग-१५*

      जयपुरमधे स्वामीजींनी आपला बहुतांश वेळ संस्कृत व्याकरणाच्या अध्ययणात घालविला.अजमेरमधे हिंदु मुस्लिम राजवटीचे अवलोकन केले. माऊंटअबुच्या दिलवाडामधील मंदिराचे असामान्य बांधकाम पाहुन ते थक्क झाले.इथेच एका मुस्लीम हुद्देदाराचे अतिथ्य स्विकारल्यामुळे हिंदुकडुन त्यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देत म्हणाले, मी परमहंस या उच्चकोटीचा सन्यासी असल्यामुळे जातपात,धर्म, उच्च नीच्च या बंधनापलीकडे असल्या मुळे संकुचित वृत्तीच्या हिंदु पुरोहितांनी कितीही आग पाखडली तरी मला पर्वा नाही.माऊंट अबुमधेच खेत्रीच्या महारांची भेट झाली जे पुढे स्वामीजींचे निस्सीम भक्त झाले.त्यांनी पुत्रप्राप्ती साठी आशिवादाची याचना केली असतां ती नंतर फलद्रुप झाली.

         यानंतर स्वामीजी गुजरात काठेवाड भागात गेले.अहमदाबादला जैन धर्माचा अभ्यास केला.काठेवाड व हिंदुजैन लोकांचे अनेक तिर्थस्थाने होती या प्रदेशावर हिंदु राजाचे राज्य होते.या हिंदुमहाराजाने स्वामींजीचे अतिव श्रध्देने आदरतिथ्य केले.जुनागड मुस्लीम संस्थानचे प्रधान,बाबु हरिदासां ना स्वामीजींनी पटवुन दिले की,हिंदु  शिकवण्याचा प्रचार व प्रसार करण्याची कशी गरज आहे? नंतर पोरबंदरला ११महिने संस्थानचे प्रधान व महान संस्कृत शंकर पंडीतासोबत आनंदाने घालवले. पंडीत स्वामीजींची बुध्दीमत्ता आणि स्वयंप्रज्ञाने अत्यंत प्रभावित होऊन म्हणाले, या देशातील लोक तुमची पारख करुं शकणार नसल्यामुळे इथे तुम्हाला फार कांही करतां येईल असे वाटत नाही.पाश्चिमात्य लोकच तुमच्या ध्येयकार्याला समजुन घेऊ शकतील.तेथील लोकांना हिंदु धर्मा विषयीचे तेजस्वी अभिनव विचार तुम्ही सांगु शिकवुं शकाल.नरेंद्रंना पंडीतांचे विचार पटले,

आणि फ्रेंच भाषेचा अभ्यास सुरु केला.

         हिंदु समाजातील क्षुद्रता,मत्सर, दुही,अज्ञान व दारिद्र्य यामुळे त्यांचे मन वेदनांनी व्यथीत झाले होते. हिंदु समा जाने आत्मविश्वास व आत्मसन्मानाची जाणीव रुजवावी असे स्वामीजींना वाटे. स्वामीजी हिंदु राज्यांशी विशेष मैत्रीपुर्ण सलगीने वागत,कारण ते कोट्यावधी जनतेवर राज्य करीत असुन,प्रजेवर त्यांचा फार मोठा प्रभाव असल्यामुळे त्यांच्या द्वारेच लोकांमध्ये सामाजिक सुधारणा,शिक्षण व सांस्कृतिक लाभा च्या योजनाद्वारा भारताच्या पुनरुत्थाना चे कार्य अमलांत आणने शक्य होईल. बडोदा संस्थानात थोडे दिवस घालवुन स्वामीजी मध्यप्रदेशातील खांडव्याला पोहचले. शिकागोमध्ये भरणार्‍या “सर्व धर्म परिषद” चे वृत्त त्यांना इथेच कळले. त्यांनी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.नंतर ते मुंबई,पुणे आणि कोल्हापुरहुन बेळगांवला पोहोचले.तिथेच स्वामी अभेनंदाची भेट झाली.

        त्यांच्या संपुर्ण परिभ्रमणांत सर्व वयोगटांतील लोकांना आपल्या ओघवती भाषा व विनयी वकृत्वाने भारतातील अन्यायाला बळी पडलेल्या अज्ञानग्रस्तांची स्थिती कशी सुधारतां येईल? पाश्चिमात्य संस्कृतीविषयीच्या बद्दलचे विचार मांडुन खेडुतांचे आरोग्य, शेती व्यवसाय,शुध्द पाणी, अज्ञानाच्या गर्तेतुन कसे मुक्त करतां येईल? त्यांचा गमावलेला आत्मविश्वास कसा परत आणतां येइल? अशा अनेक विचारांनी त्यांना हैराण केले होते.उपाशी पोटींना धर्म शिकवतां सांगतां येत नाही हे गुरुंचे शब्द त्यांच्या कानांत घुमले.

     नंतर ते बेळगांववरुन बेंगलोरला आले.तेव्हा म्हैसुर हे एका हिंदुराजाच्या अधिपत्याखाली होते. त्यांनी स्वामींचे वर्णन एक तेजस्वी व्यक्तीमत्व,दिव्य शक्तीस्तोत्र असे केले.स्वामीजींच्या प्रखर तेज व चारित्र्याच्या सुगंधाने प्रभावित होऊन अतिथी म्हणुन राज वाड्यात ठेवुन घेतले.

त्यांनी दरबारातील लोकांविषयी विचारल्यावर राजा स्वामींना म्हणाले, संस्थानांच्या दरबारी लोकांबद्दल बोलतांना सावधानता बाळगावी, अन्यथा घात करायलाही मागे पुढे पाहणार नाही! त्यावर स्वामी त्वेषाने म्हणाले, मी एक प्रामाणिक सन्यासी परिवाणामाची पर्वा न करतां नेहमी सत्यच बोलेन.

              क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

स्वामी विवेकानंद चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading