
विवेकानंदाच्या जन्माअगोदर त्यांची माता भुवनेश्वरीदेवींनी आपला वंश उज्वल व्हावा म्हणून इतर धर्मशील हिंदु मातांप्रमाणे अनेक धार्मिक व्रत वैकल्ये,तपःसाधना, उपवास करीत होत्या.त्या शंकरभक्त असल्यामुळे त्या क्षेत्राचे दैवत असणार्या विरेश्वर शिवाची विशेष पुजा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! स्वामी विवेकानंद !!!
भाग-२६*
स्वामी विवेकानंद हे मानवतेवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व होते.भारतीय लोकांच्या पुनरुत्थानासाठी अमेरिकेतुन धन,विज्ञान,ज्ञान, आणि तांत्रिक सहाय्य मिळवण्याच्या बदलात ते अमेरिकन लोकांना “शास्वत सत्या” चे ज्ञान देणार होते. डेट्राइटहुन स्वामीजी शिकागो, न्युयार्क आणि बोस्टान या शहरांत ते अलटुनपालटुन जात. १९९४ च्या वसंत ऋतुत(अमेरिकन समर) मॅसॅच्युसेट्स मधील ग्रीनएकर येथे आयोजित केलेल्या “ह्युमन कॉन्फरन्स” मधे अनेक सभांसाठी स्वामीजींना निमंत्रित केले. इथेच त्यांची मैत्री डॉ.लेविस जेन्सशी झाली. ३१ डिसेंबर १८९४ ला संध्या.१ले व्याख्यान झाले.अनेक डॉक्टर, वकील,न्यायाधीश,अध्यापक इत्यादी मान्यवरांची उपस्थिती असलेला उत्साही श्रोतृवृंद अगदी मंत्रमुग्ध झाला. या व्याख्यानात स्वामीजींनी आपल्या ओजस्वी व वकृतावपुर्ण शैलीत हिंदु धर्माची बाजु लावुन धरली. प्रभावित होऊन श्रोत्यांनी ब्रुकलीनमधे नियमित वर्ग घेण्यासाठी उत्फुर्त मागणी केली,व स्वामीजींनी मान्यही केली.या व्याख्याना मुळेच अमेरिकेत कायमस्वरुप कार्याचा शुभारंभ करण्याची त्यांची इच्छा फलद्रुप झाली. स्वामीजींचे व्याख्यान ऐकण्यासाठी अनेक गरीब विद्यार्थ्यांनी न्युयार्कमधील गरीब वस्तीत भाड्याने खोल्या घेऊन गैरसोयीकडे दुर्लक्ष करुन स्वामीजींचा शब्बनशब्द आत्मसात करीत असत. निवडक शिष्यांना वेदांता ची गहन सत्ये उमजावी म्हणुन त्यांची बौध्दीक तयारी करुन ज्ञानयोग शिकवु लागले.त्याचबरोबर आत्मसंयमन, मना ची एकाग्रता,ध्यानधारणा शिकतां यावी म्हणुन राजयोगही विशद करुं लागले. शुध्दतेवरही भर देत. १८९५ जुन मधे “राजयोग” या सुप्रसिध्द ग्रंथाचे लेखन स्वामीजींनी पुर्ण केले. या ग्रंथानेच हार्वर्डचे सुविख्यात तत्वज्ञ विल्यम जेम्सचे लक्ष वेधुन घेतले.टाॅलस्टाॅयचेही कुतुहल जागृत झाले. हा ग्रंथ म्हणजे पतंजली योगसुत्र असुन यात त्यांनी स्वतःची भाषा वापरली. या ग्रंथात मनाच्या एकाग्रतेवर भर दिला.कोणतेही धार्मिक अनुभव हे विद्यानातील प्रयोग, निरिक्षण,पडताळा या पायांवरच अवलंबुन असतात. या ग्रंथाच्या लेखनिका कु. एस एल वाल्डो होत्या.
अनेक प्रकारचे वर्ग,व्याख्याने, वैयक्तिक उपदेश,प्रचंड वाढता पत्रव्यव हार आणि “राजयोगा” चे लेखण या सर्वांमुळे स्वामीजी शरीर आणि मनाने खुप थकुन गेलेत.त्यांना या दमणुकीच्या कामातुन विश्रांती मिळावी म्हणुन त्यांचे मित्र फ्रान्सिस एच लेगेट न्यू हॅम्पशायर परगण्यातील पर्सी येथे त्यांची व त्यांची शिष्या एलिझाबेथ डचर यांनी थाऊजंड पार्कमधील सेंट लारेन्स रिव्हर येथे दोघां नाही अगदी आत्मियतेने निवांत राहण्या साठी निमंत्रीत केले. पर्सीला थोडे दिवस राहिल्यानंतर थाऊजंड आयलंड पार्कला येऊन सात आठवडे राहिलेत. डचरचा हा प्रस्ताव स्वामीजींच्या कांही शिष्यांना खुप आवडला.स्वामीजीसुध्दा निवडक शिष्यांची आध्यात्मिक जीवने घडविण्यास उत्सुक होते,जेणेकरुन त्यांचे कार्य अमेरिकेत चालु राहिल.
या शिबिरांत फक्त बारा शिष्यांना ज्ञानदान केले.मादाम मेरी लुईस आणि श्रीयुत लिऑन लॅण्ढबर्ग या दोघांना सहस्रद्वीपोद्यानात सन्यास दीक्षा दिली. मादाम लुईस जन्माने फ्रेंच असल्या तरी वृत्तीने त्या अमेरिकनच बनल्या होत्या. त्यांना अभयानंद असे सन्यासनाम दिले. दुसरे शिष्य लॅण्डस् बर्ग हे रशियन ज्यु असुन एका मान्यवर वृत्तपत्रामधे नोकरीस होते.सन्यासग्रहणा नंतर ते कृपानंद नांवाने ओळखले जाऊं लागले.या दोघांनाही अपरिग्रह आणि पावित्र्याची शपथ घेतली.कुंडचर यांच्या कुटीतील अल्पकालीन वास्तव्य स्वामीजींच्या दृष्टी ने आदर्श ठरुन येथेच त्यांच्यातील प्रगाढा विद्वत्ता प्रवाहित झाली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-२७*
कु. डचर यांनी कल्पकतेने फळं, फुलं झाडे कुटीर समोरील निसर्गरम्य परिसर सुशोभीत केला. सुट्टी घालवण्या साठी व जपसाधनेसाठी लोकं येऊन तिथे राहुं लागले. पुढे ही कुटी १९७४ डिसेंबरमधे न्युयार्क रामकृष्ण-विवेका नंद सेंटरने आपल्या ताब्यात घेतली. आतां ती वास्तु रामकृष्ण संघाचे संन्यासी वसंतऋतु शिबिरांसाठी वापर ल्या जाते.”विवेकानंद कॉटेज” असे नाम करण त्या वास्तुचे झाले.ज्या खोलीत विवेकानंदाचा निवास होता तो भाग मंदिरासाठी व जीथे ज्ञानसाधना होत होती तो भाग मठवासीं यांचे पुजागृह म्हणुन वापरला जातो.
सहस्रद्वीपोद्यानात स्वामींनी दिले ल्या व्याख्यानांची,त्यांची शिष्या कु.सारा एलन वाल्डो यांनी “इन्सायर्ड टॉक्स” (दैवीवाणी) या शिर्षकाचे पुस्तक प्रकाशित केले.रामकृष्ण परमहंसांनी म्हटल्याप्रमाणे स्वामी विवेकानंद हे नित्यासिध्द इश्वराचे खास दूत म्हणुन या पृथ्वीवर अवतरले.
स्वामीजींना केवळ स्पर्शाने मनुष्या च्या जीवनांत परिवर्तन घडवुन किंवा दूरच्या अंतरावर जे कांही घडते ते स्वच्छ दिसणे,अश्या शक्तिचांही त्यांना अनुभुती आल्यात,परंतु योगमार्गाद्वारे प्राप्त झालेल्या या शक्तींचा वापर फार क्वचित केला.एके दिवशी स्वामी तुरीया नंद स्वामींच्या खोलीत गेले असतां त्यांना स्वामींऐवजी एक तेजोमय व्यक्ती दृष्टीस पडली.
कधी कधी स्वामीजी स्वहस्ते झणझणीत भोजन बनवुन स्वतः शिष्यां ना वाढत असे.७ ऑगस्ट १८९५ ला सहस्रद्वीपोद्यचा निरोप घ्यायच्या दिवशी सकाळी, श्रीमती फंकी आणि सिस्टर ख्रिस्तीन सह स्वामीजी जंगलझाडी असलेल्या एकांतस्थळी गेले असतां तेथील एका झाडाखाली स्वामीजी ध्यानस्थ बसले,तोच विजेच्या कडकडा सह जोराचा पाऊस सुरु झाला.पण त्याची समाधी भंगली नाही.इथेच त्यांना निर्विकल्प समाधीची अनुभुती झाली.
स्वामीजींच्या कांही अनुयायांचा असा समज झाला की, ते एखादी संघटना सुरु करताहेत,
पण त्यांनी स्पष्ट सांगीतले की,संघटनेच्या संकुचित चौकटीत पडणे मला पसंत नाही.व्यक्ती स्वातंत्र्य हेच ध्येय असुन,मी सन्यासी आहे.म्हणुनच मी जगाचा स्वामी नसुन स्वतःला सेवक मानतो.अमेरिकेतील कांही विशिष्ट व्यक्तींपैकी राबर्ट इंगोरसेल एक प्रसिध्द वक्ते आणि अज्ञेयवादी विचारवंत होते. धर्म आणि तत्वज्ञानावर दोघांच्या चर्चा झाल्यात. अप्रत्यक्षपणे स्वामीजींच्या कार्याला मदतच करीत होते.निकोला टेस्ला हे मोठे वैज्ञानिक असुन विद्युतशक्ती हा त्यांच्या अभ्यासाचा प्रांत होता. भौतिक पदार्थ आणि उर्जा याबाबत आधुनिक पदार्थविज्ञानातील सिध्दांताच्या साम्या बद्दलचे स्वामींचे विवेचन ऐकुन ते अतिशय प्रभावित झालेत. सर विल्यम थॉमसन(नंतरचे लॉर्ड केल्विन) आणि प्रोफेसर हेल्मेडोल्टझ या पाश्चिमात्य विज्ञानाच्या दोन थोर विभुतींशि देखील भेट झाली.सुविख्यात फ्रेंच नटी सारा बर्नहार्ट यांनीही स्वामीजींची मुद्दाम भेट घेऊन त्यांच्या शिकवणीची प्रशंसा केली
सुविख्यात प्रमुख गायिका,शारिरीक व मानसिक स्थिती खालावलेल्या अवस्थेत स्वामीजींना भेटल्या तेव्हा, त्यांच्या समस्या त्यांनी कधीच कोणाला सांगीतल्या नव्हत्या व स्वामीजींना त्यांचे नांव माहित नसतांना सुध्दा ते सर्व गोष्टी खात्रीपुर्वक जाणतात अशा रितीने मादाम काल्हेशी बोलले,त्यामुळे त्या आश्चर्यचकीत झाल्या. स्वामींनी त्यांना आश्वासित केले की,मला कोणाकडुन कांही समजले नसुन मी फक्त तुमचे मन वाचुन सर्व सांगीतले.सर्व विसरुन परत आनंदी,उत्साही व सुखी राहण्याचा उपदेश करीत म्हणाले,परिवर्तन ही आध्यात्मिक गरज आहे व हीच तुमच्या कलेची मागणी आहे.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-२८*
कित्येक वेळा स्वामीजींना निग्रो समजुन उपहारगृहात,केशकर्तनालयात किंवा अतिथीगृहांत प्रवेश नाकारला जाई.त्यामुळे त्यांच्या विदेशी मित्राने, निग्रो नसुन हिंदु आहे असे सांगण्याची सुचना केल्यावर त्यांनी तीव्र निषेध करत म्हणाले,त्यांना त्यांच्या सावळ्या वर्णाचा अभिमान आहे असे ठणकावुन सांगीतले.एकदा स्वामीजींना विचीत्र अनुभव आला.अमेरिका शहरातील कुरणात राहणार्या गुराखी कॉलेजकुमारांनी स्वामीजींची परीक्षा घेण्यासाठी त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले. ते व्याख्यानात गर्क असतांना त्यांच्या दिशेने बंदुचीचे बार झाडुन त्यांच्या कानाजवळुन कांही छर्रे सुs सुs आवाज करीत वेगाने निघुन गेले,पण अविचल स्वामीजींचे भाषण सुरुच राहिले.जेव्हा त्यांनी आपले व्याख्यान संपविले तेव्हा त्या तरुण मुलांनी “एक धैर्यवान सज्जन माणुस” म्हणुन अभिनंदन केले.
सर्वधर्मपरिषदेतील आपल्या यश प्राप्तीनंतर स्वामीजींनी भारतीय मित्रांशी,भक्तांशी व अनुयायांशी पत्र संवाद साधुन भारताच्या पुनरुत्थानाच्या योजना कळवणे सुर केले.शिक्षण व्यवस्था व आरोग्यविषयक सुधारणा होईल,अश्या लोकोपयोगी कार्ये करण्या चे आव्हान केले.
देशबांधवांच्या मनामधे शक्ती,क्षमता व आत्मविश्वास जागृत होऊन वेदांतातील सत्याचा प्रचार व्हावा म्हणुन एखादे नियतकालिन सुरु झाले तर त्यांचे हरवलेले व्यक्तिमत्व पुनः गवसेल असे त्यांना वाटल्यामुळे या साठी स्वामीजींना व्याख्यानाद्वारे मिळा लेले पैसे देखील पाठविले.
स्वामीजींच्या आवेशयुक्त पत्रांमुळे त्यांच्या अनुनयांना प्रेरणा तर मिळाली पण त्यांनी लवकर भारतात परत येऊन नेतृत्वाचे सुत्र हाती घ्यावे म्हणुन आतुरतेने वाट पाहत होते. भारतातील ख्रिश्चन मिशनरी स्वामीजीं विरुध्द विद्वेशपुर्ण अपप्रचार करीत असल्यामुळे ते अडचणीत सांपडले तरी स्वबळावर कार्य करण्यास उद्युक्त करीत म्हणाले, तुम्ही जर माझे संतान असाल तर सिंहासारखे गर्जत,कुठेही न अडखळता,न भिता पायावर उभे रहा.
भारतातील ख्रिश्चनधर्म आणि अमेरिकेतील ख्रिश्चन धर्मामधे फरक आहे. अमेरिकेतील जे मित्र आहेत, त्या मधे एपीस्कोपल व प्रोस्बेटेरियन पंथाच्या चर्चमधील धर्मगुरु आहेत, आपण जसे आपल्या धर्माच्या संदर्भात विशाल ह्रदयी व प्राजंल आहोत तसेच हेही धर्मगुरु आहेत.खरा आध्यात्मिक माणुस मग तो जगातला कुठलाही असो तो विशाल ह्रदयीच असतो. म्हणुन भारतातील अपप्रचार करणार्या ख्रिश्चन मिशिनरी लोकांकडे दुर्लक्ष करुन जराही किंमत देऊ नका अशी सुचना केली.
असत्याहुन सत्याचे पारडे नेहमीच जड असते.चारित्र्याची,पावित्र्याची आणि सत्याची सर्वांगीण व्यक्तीमत्वाची शक्ती जोपर्यंत माझेजवळ आहे तोपर्यत मी जगाच्या कल्याणासाठी अव्याहत कार्य करीतच राहणार,इतकेच काय मेल्यानंतरही कार्य सुरुच राहणार.
शक्तीशाली ब्रिटिश साम्राज्यातील राजधानीत वेदांताचे बीज पेरण्याची इच्छा बरेच दिवसांपासुन होती,तेवढ्या त त्यांना कु. हेन्रीएटा मुलरने लंडनमधे व श्री. लेगेट यांनी पॅरीसमधे येण्याचे निमंत्रण दिले.श्री लेगेट व त्यांच्या स्नेही विधवा असलेल्या श्रीमती विल्यम स्टर्जेस व बहिण कु. जोसेफीन मॅक्लाऊड या सर्वांनी न्युयार्कमधे झाले ले स्वामीजींचे व्याख्यान व त्यातील संदेश ऐकुन चांगलेच प्रभावित झालेत. जेव्हा विधवा स्टर्जेस व लेगेट यांनी विवाह करण्याचे ठरविले तेव्हा या विवाहाचा साक्षीदार म्हणुन स्वामीजींना निमंत्रित केले होते.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-२९*
कुमारी मुलर आणि स्टर्डी यांचे योगायोगाने एकाच वेळी मिळालेले निमंत्रन पाहुन स्वामींजींना ही “परमेश्वरा ची हाक” वाटली.स्वामीजींचे मन व शरीर पाहतां असा विचार त्यांच्या न्युयार्क मधील मित्रांना वाटल्याने समुद्र प्रवास सोईस्कर वाटले. त्याचवेळी आपला अंतकाळ जवळ आल्याची जाणीव त्यांना झाली. १८९५ मधे लेगेट व स्वामीजी न्युयार्कहुन समुद्रमार्गे पॅरीस ला पोहोचले.तिथे स्वामीजींची अनेक फ्रेंच विद्वानांशी ओळख करुन दिल्या गेली.अमेरिकेत कु.मुलरने स्वामीजींचे उत्साहात स्वागत केले. श्री स्टर्डीनी संस्कृतचा अभ्यास केलेला असुन हिमा लयात कठोर तपस्याही केली होती. जवळ जवळ १४० वर्षे इंग्लड साम्राज्य वादी अधिपत्याखाली असलेल्या वेगवेग ळ्या वंशापैकी आपणही एक आहोत याची त्यांना जाणीव होती.स्वामीजींनी कांही दिवस विश्रांती घेतल्यावर कांही ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्यात. त्यांचे अध्ययन वर्ग सुरु झाल्यावर स्टॅंडर्ड वृत्तपत्राने स्वामीजींच्या नैतिक उंचीच्या संदर्भात राजा राममोहन रॉय आणि केशवचंद्रसेनशी तुलना केली.
लंडनमधील स्वामीजींची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे कुमारी मार्गारेट, ज्या नंतर त्यांच्या निस्सीम शिष्या झाल्यात.त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारतातील स्रीशिक्षणाला समर्पित तर केलेच शिवाय भारतीय चळवळीत आपल्या भाषणा व लिखानाद्वारे अनेक नेत्यांना स्फूर्ती दिली. अमेरिकेच्या तुलने त इंग्लडमधे त्यांनी अप्रतिम व अधिक कार्य केले.इंग्लडमधील दोन महिन्याचे वास्तव्य संपवुन ६-१२-१८९५ ला स्वामीजी न्युयार्कला पोहोचले.स्वामीजीं च्या अनुपस्थितीत कृपानंद,अभयानंद व कु. वाल्डो या त्यांच्या अमेरिकन शिष्यां ची नियमित वर्ग घेतले होते.स्वामीजी आणि कृपानंदानी मिळुन एक घर भाड्याने घेतले.तिथे त्यांनी “कर्मयोग साधना” ही व्याख्यानमाला सुरु केली. पुढे हीच व्याख्यानमाला “कर्मयोग” ग्रंथ रुपात प्रकाशीत झाली.स्वामीजींचे जीवनकार्य व उपदेश लिहिण्यासाठी गुडविन नावाच्या लघुलिपिकाची नियुक्ती केली.पण लिहितांना गुडविन इतके प्रभावित झाले की,त्यांनी आपली सेवा ‘गुरुदक्षिणा’ म्हणुन विनामुल्य देऊ केली. १८९५ च्या ख्रिसमसमधे स्वामजी विश्रांती घेण्यासाठी, श्री व सौ.लेगेट यांचा ग्रामीण परिसरात असलेल्या रिजले मॅनॉर या निवासस्थानी गेलेत पण तिथेही विश्रांती न घेता दमणुक होईस्तोवर प्रवचणे देतच राहिले.
न्युयार्कमधील मॅडीसन गार्डन मधे व्याख्यान सत्रे सुरु केलीत. “भक्ती एक आध्यात्मिक साधना” या विषयावर व्याख्याने दिली. पुढे ही व्याख्याने “भक्तीयोग” नांवाने प्रकाशीत झाली. त्यांचे व्यक्तिमत्व व व्याख्यानाची भरभरुन प्रशंसापर अभिप्राय वृत्तपत्रा द्वारे प्रसिध्द झाले.इथेच डॉ. स्टीट (Street) यांना संन्यास दीक्षा देऊन योगानंद हे नांव दिले.
न्युयार्क मधील कार्य संपवुन गुडविनसह डेट्राइटला आले.तेथील भाषणाचे भक्ती हे मुख्य आशयसुत्र होते.स्वामीजींनी शेवटचे व्याख्यान टेंपल बेथल ला देऊन श्रोतृवृदांना अगदी मंत्रमुग्ध करुन टाकले होते.श्रीमती फंकी लिहितात, त्या रात्री स्वामीजी असे भासत होते की! आत्मरुपी पक्षी देहाचा पिंजरा सोडुन बाहेर झेपावण्या च्या तयारीत आहे,जणुं या पृथ्वीवरचे ते नव्हतेच.जणुं प्रथमच त्यांच्या देहावसानाचा पूर्वाभास झाला.
आपले इहलोकातील दिवस संपत आल्याची जाणीव स्वामीजींना पुनः पुनः होऊ लागली. त्यामुळे विश्रांतीची अतिशय आवश्यकता असुनही,आतां विश्रांतीला वाव नाही हे जाणुन सतत कार्यात झोकुन दिले. २५ मार्च १८९६ रोजी हार्वर्ड विद्यापीठाच्या तत्वज्ञान विषयाच्या स्नापक विद्यार्थ्यांसमोर “वेदांताचे तत्वज्ञान” हे त्यांचे गाजलेले व्याख्यान दिले. परिणामी स्वामीजींना या व कोलंबिया विद्यापीठाकडुन पौर्वात्य तत्वज्ञानाच्या सन्मान्यनीय पदा वर काम करण्यास निमंत्रीत केले,परंतु आपण संन्यासी आहोत या कारणाने त्यांनी दोन्हीही निमंत्रणे नाकारली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख,
!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-३०*
१८९४ मधे स्वामीजींनी “वेदांत सोसायती ऑफ न्युयार्क” ची स्थापना केली होती. १८९६ मधे तीचे अधिक चांगल्या रितीने संगठन करण्यांत आले. या संघटनेच्या सदस्यांना “वेदांतवादी” म्हणुन ओळखले जाऊ लागले. दरम्यान च्या काळात स्वामीजींच्या “राजयोग” “भक्तीयोग” आणि “कर्मयोग या तीन महान ग्रंथांनी अमेरिकन विचारवंतांचे लक्ष वेधल्या गेले. लंडन आणि न्युयार्क मधील कामे आपल्या अनुपस्थीतीत योग्य प्रकारे सुरु रहावे म्हणुन कु.वाल्डो आणि इतर शिष्यांची योजना केली व फ्रान्सिस लेगेट यांची वेदान्त सोसायटी चे अध्यक्ष केले.
स्वामीजींनी १५ एप्रील लंडनला प्रयाण करुन तेथील योजना कार्यान्वित झाल्यावर आपल्या मायभुभीला परत ण्याची व्यवस्था केली. स्वामीजींचे कार्य खुप मोठ्या मानसिक तणावाखाली होत होते. मग थोडा विरंगुळा म्हणुन हलका फुलका विनोद करणे, कधी कधी मित्राच्या घरी आपल्या जळजळीत वक्तव्य करणार्या स्वभावाला शोभणारे झणझणीत भारतीय पदार्थ बनवत, स्वामीजी सतत नवनवीन कल्पना साकार व्हाव्यात या विचारांनी त्यांचा मेंदु भरलेला असे.शास्वत ब्रम्हाचे प्रतिक असणार्या ॐ या प्रतिकाची पुजा सर्वधर्म पंथाचे लोक एकत्रीत करु शकेल असे “सार्वजनीक मंदिर” बांधण्याची त्यांची कल्पना होती.
मॅसॅच्युसेट्स राज्यातील केम् ब्रिज मधल्या कांही महिलांसमोर “भारतीय स्रीयांचे आदर्श” विशेषतः माृतत्वाचा आदर्श या मुद्यावर जास्त भर दिला होता हे ऐकुन त्या इतक्या भारवल्यात की, मेरीच्या मांडीवर असलेल्या येशुबाळाचे चित्र पत्रासोबत स्वामीजींच्या आई भुवनेश्वरीदेवीला पाठविले, व लिहिले की,स्वामीजींनी मातृपुजा या विषयांवर चे व्याख्यान आम्हा सर्व स्रीयांना प्रेरक व उन्नतीपर ठरणार आहे.स्वामीजींबद्दल त्यांचे पाश्चिमात्य शिष्य त्यांना”रुबाबदार सन्यासी”, “उदात्त दरबारी” तर कोणी त्यांच्या विचारांबाबत “प्लेटो” तर निर्भिडपणाच्या बाबतीत आधुनिक “सेव्होनारोला” तर धार्मिक अनुभुतीच्या विविधतेच्य संदर्भात “वेदान्तवेत्त्यातील चुडोमणी” असा त्यांचा गौरव करीत.
स्वामीजींनी स्वतःला विविध उप क्रमांच्या वादळी भोर्यात झोकुन दिले. मे महिन्याच्या सुरुवातीपासुनच आठव ड्याला पांच अध्ययनवर्ग,प्रत्येक शुक्र वारी खुले चर्चासत्र, तसेच रॉयल इन्स्टीट्युट ऑफ पेन्टर्सइन वॉटर कलर्स या संस्थेनी दर रविवारी एक व्याख्यान, प्रिन्सेस हॉल व लॉज ऑफ अॅनी बेझंट येथे व्याख्याने, याखेरीज वेगवेगळ्या मंडळ शैक्षणिक संस्था आणि कला दालनात व्याख्याने देत होते.
स्वामी विवेकानंद मॅक्समुलर यांच्या सहवासात येण्यास रामकृष्ण परमहंसच निमित्य झाले होते.मॅक्स मुलर हे विद्वान जर्मन संस्कृत पंडीत आणि भारतविद्यावत्ते( इण्डाॅलाॅजिस्ट) होते. त्यांनी भारतातुन माहिती गोळा करुन नाइण्टीन्थ सेंचुरी या पत्रिकेत श्रीरामकृष्णांवर आधीच “खरा महात्मा” नावांचा लेख लिहिला होता.त्यांचाच पट्ट शिष्य विवेकानंदांना आपल्या समवेत भोजनासाठी आक्सफर्ड येथे २८ मे १८९६ रोजी निमंत्रित केले.मॅक्समुलरचे भारतावरचे प्रेम पाहुन स्वामी अत्यंत प्रभावित झाले.मॅक्समुलरांनी रामकृष्णां च्या जीवनावर “दी लाईफ अॅण्ड सेईंग्ज ऑफ रामकृष्ण” हा ग्रंथ लिहिला.इंग्लड मधे भरपुर लोकोपयोगी कार्याव्यतिरिक्त कांही महत्वाचे वैयक्तिक संबंध देखील प्रस्थापीत केले. ज्यांनी नोकरीचा बराच काळ भारतात घालवला होता ते एकोन पन्नास वर्षाचे कॅप्टन सेव्हीयर व त्यांची पत्नी स्वामींचे शिष्यत्व पत्करुन त्या दाम्पत्यांनी स्वामींना आपला मुलगा मानुन आपली संपत्ती त्यांना देऊ केली पण स्वामीजींनी स्पष्ट नकार दिला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.


