
विवेकानंदाच्या जन्माअगोदर त्यांची माता भुवनेश्वरीदेवींनी आपला वंश उज्वल व्हावा म्हणून इतर धर्मशील हिंदु मातांप्रमाणे अनेक धार्मिक व्रत वैकल्ये,तपःसाधना, उपवास करीत होत्या.त्या शंकरभक्त असल्यामुळे त्या क्षेत्राचे दैवत असणार्या विरेश्वर शिवाची विशेष पुजा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! स्वामी विवेकानंद !!!
भाग-१६*
राजेसाहेबांच्या दरबारांतील एका ऑस्ट्रेलियन संगीततज्ञाला स्वामींनी आपल्या संगीत ज्ञानाने विस्मयचकित केले. स्वामीजींची अमेरिकेला जायची इच्छा राजेसाहेबांना कळल्यावर सर्व खर्चाचा भार उचलण्याची तयारी दाखवल्यावर पुढे बघु असे म्हणुन त्यांचा प्रस्ताव पुढे ढकलला.
स्वामींना उच्च भेटवस्तु स्विकारण्याची विनंती केल्यावर फक्त एक चिलिम व सिगार घेतली.नंतर ते रमणीय मलबारकडे वळले.त्यावेळची त्रावणकोटची राजधानी त्रिवेंद्रमला आल्यावर स्वामीं ची उठबस महाविद्यालयीन प्रोफेसर, दरबारी अधिकारी,उच्च शिक्षितांमधे होत असे.स्पेंसर,
शंकराचार्य,शेक्सपिअर कालीदास,डार्विन,पतंजली असो वा जुं चा इतिहास असो की,आर्याची संस्कृती, कोणताही विषय असला तरी स्वामीजीं चे प्रभुत्व सारखेच असायचे. त्रावणकोट च्या एका उच्चशिक्षित व्यक्तिने स्वामी बद्दल दिलेला अभिप्राय… उदारता, निर्मळ अंतःकरण,पवित्र,तपःपुर्ण जीवन मोकळा स्वभाव,उदारमतवादी मन, विशाल दृष्टीकोन,अपार सहानूभुती हे ठळकपणे गुणविशेष त्यांच्यात आहेत.
स्वामीजी त्रिवेंद्रमहुन थेट दक्षिणीकडचे टोक असणार्या कन्याकुमारीला जाऊन नंतर रामेश्वरला गेलेत.रामेश्वरला रामनद चे महाराज भास्कर सेतुपतींशी भेट झाली जे नंतर स्वामीजींचे निस्सीम शिष्य बनले. रामनदच्या राजांनी स्वामी विवेकानंदांनी शिकोगाला भरणार्या सर्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व स्विकारण्याची विनंती करुन शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कन्याकुमारीला पोहोचल्यावर ते बालकाप्रमाणे उल्हासित होऊन कन्या कुमारीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर त्यांची दृष्टी समोरच्या अथांग सागराकडे वळली.उपद्वीपासारखा दिसणार्या साग रातल्या सुसरींच्या उपद्रवाची पर्वा न करतां पोहत तिथल्या खडकावर जाऊन बसले.त्यांचे ह्रदय भावकल्लोळाने भरुन गेले.त्यांची आसेतुहिमाचल भारत परिक्रमा पुर्ण झाली.त्यांना जन्मदात्या आईइतकीच प्रिय भारतमाता वाटत होती.विशाल सागरातील शिलाखंडावर बसुन स्वामीजी भारत परिक्रमेतील अनु भवाच्या स्मरणचिंतनात मग्न झाले. धनांद जमीनदार,लोभी पुरोहितांच्या अविवेकी,लहरीचे,भारतातील सर्व सामान्य लोक बळी पडुन त्यांची होणारी दयनीय अवस्थेचे त्यांना स्पष्ट आकलन झाले.जातीव्यवस्थेची जुलुम शाही,सुरक्षित उभे राहुन सामान्य जनते च्या मुक्तीची घोषणा देणारी तथाकथित स्वार्थी नेत्यांची लबाडीही त्यांना दिसुन आली. हे सर्व पाहुन त्यांची मनःस्थिती द्विधा झाली.एकांतवासांत निघुन जाण्याचा त्यांनी प्रयत्नही केला पण असफल झाला.एक संन्यासी म्हणुन इश्वरातच रममाण होण्याचे धेय्य निश्चित केले.
स्वामीजींना तपश्चर्या व आत्म संयमाद्वारे फार मोठे आत्मबल प्राप्त झाले. या सर्व संपदेचा मानवातील परमे श्वराच्या सेवेसाठी वापर करायचा दृढ निश्चय केला, यासाठी संसाराची बंधने नसणारे,स्वार्थनिरपेक्ष पुर्णवेळ कार्य कर्त्यांची त्यांना गरज होती,परंतु असे अनुयायी कोठुन मिळणार? मग त्यांचे लक्ष संसारत्याग केलेल्या संन्यासांकडे गेले. परंतु बहुतांश सन्यासी निरोद्योगी व आळसात जीवन व्यतीत करणारेच होते.कांही निरिच्छ,निस्वार्थी व परहितेच्छु संन्यासी जर खेडोपाडी जाऊन शिक्षणाचा प्रसार,उपयुक्त गोष्टी, ऊच्चनिच्च,निरक्षर अज्ञानी लोकांच्या उन्नतीसाठी, भेटले तर कांही उपयोग होईल, तसेच राष्र्टीय सत्व,वैशिष्ट्य हरवुन बसल्यामुळेच भारतातील लोक दुःखी आहेत. हे सर्व त्यांना परत मिळवुन त्यांना उन्नत करण्यासाठी हिरीरीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-१७*
स्वामी विवेकानं एकाच देही देशभक्त व द्रष्टे पुरुष होते.ते मुर्तीमंत भारत बनले होते.पण त्यांच्या द्रष्ट्या पणाच्या योजना प्रत्यक्षात आणण्या करितां आर्थिक बळ नव्हते. ते स्वतः एक सन्यासी, निष्कांचन याचक होते. देशातील धनवान फक्त तोंडाने बोलत, पण करण्याची वेळ आली की, हात झटकुन मोकळे होत! बर! इतर देशात याचना करणे,त्यांच्या स्वाभीमानी स्वभा वात बसत नव्हते. त्या उपद्वीपसदृष्य खडकावर एकांत व शांत वातावरणांत चिंतनात बुडलेल्या स्वामीजींना एक उपाय सुचला. आशावादी,समृध्दी,उदारता म्हणुन ओळखल्या जाणारा,अनेक प्रकारच्या सुसंधी उपलब्ध असणारे, तेथील लोकांची मने जातीपातीच्या काचापासुन मुक्त असलेली अमेरिका त्यांच्या डोळ्यासमोर आली.त्या स्वागत शील मनाच्या लोकांसमोर जर प्राचीन ज्ञानभंडार खुले केले तर, बदल्यात आपल्या मायभूमीसाठी विज्ञान व तंत्र ज्ञान आयात करुं शकु.ही मोहीम यशस्वी झाली तर,भारताची प्रतिष्ठा पाश्चात जगात वाढेलच,पण त्याचबरोब र आपल्याकडच्या लोकांमधे एक नवा आत्मविश्वासही वाढेल.
शिकागोमने भरणार्या आगामी सर्वधर्मपरीषदेत प्रतिनिधित्व करण्या साठी मित्रांनी केलेली कळकळीची विनंती व एखाद्या तुफानाप्रमाणे गर्जुन परत या! हे प्रोत्साहित शब्द त्यांच्या कानात घुमले.स्वामीजी शिलाखंडावरुन पोहत किनार्यावर परतले.एक महत्वा ची गोष्ट म्हणजे स्वामीच्या परिभ्रमणात असंख्य अशा घटना घडल्या की, परिणा मी त्यांची इश्वरभक्ती जास्तच दृढ झाली. निम्नस्तरांतील लोकांबद्दल,मनुष्यजीवन व सामाजिक रितीभातींचा दृष्टीकोण विशाल व व्यापक झाला.त्यांच्या मनात विचार आला, जरी सन्यासाला भिक्षेचा अधिकार असला तरी ज्यांच्या जवळ पुरेसे अन्न नसुनही अतिथी सेवाभावाने स्वतःच्या अल्पशा अन्नातुन ते आपल्या ला अन्न देतात हे तर अयोग्यच आहे. अशाच विचारांत ते सरळ जंगलात शिरले.पोटांत अन्नाचा कण नाही,भुकेने व्याकुळलेला जीव,भटकंतीमुळे पायाला आलेले फोडं अशा अवस्थेत थकुन एका वृक्षाखाली बसलेले असतांना एक वाघ येतांना पाहुन त्यांना वाटले, चला माझे शरीर मानवांच्या नाही तर निदान या भुकेल्या प्राण्याच्या तरी कामी येईल असे वाटुन ते शांत बसुन राहिले,पण तो वाघ विरुध्द दिशेला निघुन गेला.ती रात्र स्वामीजींनी समाधीवस्थेत तिथे घालवली.सकाळी मात्र नवा उत्साह संचारला त्यांच्यामधे!!
हिमालयाच्या परिक्रमेत असतांना ते एका तिबेटी कुटुंबात राहिले असतां, त्यांना तीथे बहुपतीत्वाची चाल असल्या चे दिसुन आले.सहा भावांमिळुन एकच पत्नी! स्वामींनी या पध्दतीबाबत निषेध व्यक्त केल्यावर, मोठा भाऊ म्हणाला, समाजाच्या असलेल्या परंपरेनुसार वागणे भाग असते.
एकदा स्वामीजी रेल्वेने प्रवास करीत असतांना, सहप्रवाशी म्हणुन दोन इंग्रज होते. स्वामीजी कोणी ऐखादा अशिक्षित असेल, असे समजुन त्यांच्यावर उपहास टिंगल इंग्रजीत करणे सुरु केले. पुढच्या स्टेशनवर स्टेशनमास्तरांशी अस्खलीत इंग्रजीत बोलतांना पाहुन, आश्चर्यचकीत होऊन विचारले, आम्ही एवढे उपहास गर्भ बोललो तरी प्रतिवाद कां नाही केला? स्वामीजी स्मित करीत म्हणाले, बंधुनो! मुर्ख लोकांच्या संगतीत येण्याची ही कांही माझी पहिलीच वेळ नाही,असे ऐकल्यावर चिडुन मारामारीवर आलेत, परंतु स्वामींचे बलदंड शरीर पाहुन माघार पत्करुन दिलगिरी व्यक्त केली.
राजपुतान्यात स्वामींनी सतत तीन दिवस लोकांना धर्मोपदेश केला पण त्यांच्या खाण्यापिण्याची वा विश्रांतीची कोणी दखल घेतली नाही हे पाहुन एका निम्न जातीच्या माणसाने आपल्या हातचे शिजवलेले अन्न खाणार नाही असे वाटुन कोरडा सिधा त्यांना दिला, पण स्वामींनी त्यालाच स्वयंपाक करायला लावुन आनंदाने त्याच्याकडे जेवले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-१८*
स्वामीजी कन्याकुमारीहुन रामनद व पांडेचरीला मुक्काम करुन मद्रास (चेन्नई) ला पोहोचले. त्यांची किर्ती आधीच पोहोचली असल्यामुळे कांही उत्साही तरुणांनी स्वागतसमारंभ आयोजित केला.अमेरिकेत जाण्याचा मनोदय प्रथमच प्रकटपणे जाहीर केला तो इथेच! तेथील लोकांनी अमेरिका मोहिमेसाठी निधि गोळा केला.याच शहरांत स्वामींनी धर्मशास्र,तत्वज्ञान, विज्ञान,वाडःमय,इतिहास या विषयांवर चर्चा केली.निजामची राजधानी हैदरा बाद मधे जाहीर व्याख्यानात “पाश्चिमा त्य देशात जाण्याचा उद्देश प्रथमच जाहीर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
मद्रासच्या लोकांनी अमेरिका प्रवासासाठी जमा केलेला निधि स्विकार न करतां गोरगरिबांना वाटण्यास सांगीत ले, अमेरिकेत जावे ही प्रभुचीच इच्छा असावी असे त्यांना वाटलं. कांही श्रीमंत स्नेह्यांनी देऊ केलेली देणगीचा अस्विकार करुन, जर मी पाश्चिमात्य देशात जावे, अशी इच्छा जगन्मातेची असेल तर, ज्या सर्वसामान्य व गोरगरीबांसाठीच जात आहोत तर, निधि सुध्दा याच लोकां कडुन गोळा करुं! इश्वरी मार्गदर्शन व्हावे म्हणुन, एकाग्रतेने इश्वराची प्रार्धना सुरु केली.
स्वामीजींच्या प्रयाणाची सर्व जुळवा जुळव झाली असतांना अचानक स्वामीं चे शिष्यत्व पत्करलेल्या खेत्री महाराजां ना पुत्ररत्न प्राप्त झाल्याची व पुत्राला आशिर्वाद देण्यासाठी स्वामींना खेत्रीला येण्याची कळकळीची विनंती केल्या नुसार स्वामीजी खेत्री संस्थानात दाखल झाले.या अनंदपित्यर्थ आयोजित जलशाला उपस्थित राहण्याची स्वामींना महाराजांनी विनंती केली,पण तीथे एका नृत्यांगनेचे गीतगायन होणार व आपण विरक्त सन्यासी! अशा प्रकारच्या ऐहिक आनंदात रममाण होणे उचित नाही असे सांगुन त्यांनी निमंत्रण नाकारले. स्वामीजी येणार नाही कळताच गायिका अत्यंत दुःखी होऊन शोकमग्न,दुःखी स्वरात गायन सुरुं केले.भावपुर्ण गीत ऐकुन स्वामीजींचे मन विरघळले.जीला समाजाने अमंगल,अपवित्र मानले, त्या नृत्यांगनेने फार मोठे तत्वज्ञान त्यांच्या लक्षात आणुन दिले.नित्य शुध्द,मुक्त, बुध्द,ब्रम्ह हेच सर्व जीवांचे मूलभूत तत्व होय.इश्वरासमोर शुध्द अशुध्द,पवित्र अपपवित्र असा भेद नसतोच.सन्यास्याने “सर्व खल्विदं ब्रम्हं” याच दृष्टीने,एखादी अपवित्र व्यक्तीदेखील निषिध्द वा तिरस्कृत न मानतां सर्व सृष्टीकडे पहावे.
स्वामीजी संगीत जलशात जाऊन अश्रुपुर्ण नेत्रांनी नर्तकीला म्हणाले,माते! मी या समारंभात येण्याचे नाकारुन तुला अपमानीत केले,परंतु तुझ्या या गीताने माझा विवेक जागृत झाला.मी तुझा अपराधी आहे.क्षमा कर मला!
खेत्री महाराजांच्या विनंतीवरुन स्वामीजींनी विवेकानंद नांव धारण केले.
मुंबईकडे जातांना स्वामी ब्रम्हानंद व स्वामी तुरीयानंद या दोघां गुरुबंधुंची भेट झाली.
भारतमातेचे दैन्यदुःख दूर करण्याच्या व दरिद्रग्रस्त लोकांच्या उन्नतीसाठी साधन सामुग्रीची जुळवा जुळव करण्याच्या हेतूने आपण अमेरिकेत जात असल्याचे सांगीतल्या वर त्या दोघांना अतिशय आनंद झाला. तुरीयानंद स्वामींना फार पुढे घडलेला एक प्रसंग आठवला.स्वामीजी अमेरिके हुन परतल्यावर ते कोलकात्याला बलराम बंधुच्या घरी मुक्कामाला असतांना, आपल्या विश्वविख्यात गुरुबंधुला भेटायला गेले असतां व्हरांड्यात स्वामी एकटेच फेर्या मारीत विचारात इतके मग्न होते की, तुरीयानंद आल्याचे सुध्दा त्यांना कळले नाही.मीराबाईच्या भजना तील एकच ओळ “मेरा दर्द ना जाने कोई ही एकच ओळ वारंवार म्हणत त्यांच्या डोळ्यांतुन अश्रुपात होत राहिला.त्यांची ही अवस्था म्हणजे सर्वत्र दुःख,अन्याया मुळे त्यांच्या मनांत निर्माण झालेल्या वैश्विक सहानुभावाचा परिपाक होय.हे तुरीयानंदाच्या लक्षात आले.पण त्यांची ही अवस्था मात्र जगाला अज्ञातच राहिली.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
*!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-१९*
स्वामी विवेकानंद मुबंईला पोहोचल्यावर, खेत्रीच्या महाराजांनी दिवाणासोबत स्वामींसाठी भगव्या रंगाचा रेशमी अंगरखा,फेटा व पुरेसे द्रव्य आणि पेनिनशुला अॅंड ओरिएण्ट कंपनीच्या आगबोटीचे प्रथम श्रेणीचे तिकिट पाठवले.तसेच स्वामी विवेकानंद हे नांव धारण करण्याची विनंतीही केली.३१ मे १८९३ ला आगबोट निघाली.आगबोटीच्या डेकवर उभे अस तांना त्यांच्या मनःचक्षुसमोर गुरुराम कृष्ण, देवी सारदामाता, वराहनगर मठा तील व डोंगरपठारांतुन सोबत परि भ्रमण करणारे गुरुबंधु व संन्यासी, आपल्या मातापित्यांचे उदात्त संस्कार, गूरुदेवांचे आशिर्वाद,
हिंदुशास्र ग्रंथातुन प्राप्त ज्ञान, पाश्चिमात्य राष्र्टातील ज्ञान विज्ञान,स्वतःचे आध्यात्मिक अनुभव, भारताचे गतकालीन वैभव व वर्तमान कालीन दुःस्थिती,भविष्यकालीन उत्कर्षाचे स्वप्न,
उन्हातान्हात काळ्या मातीत घाम गाळणारे लक्षावधी शेतकरी,पुराणां तील भक्तीकथा,बौध्द तत्वज्ञान,भारतीय षडदर्शनांतील सुक्ष्म तत्वे,अजिंठाएलोरा गुफांतील पाषाणशिल्पे व भितिचित्रे, राजपूत,मराठ्यांच्या युध्दाच्या शौर्यकथा हिमालय पर्वताची उतुंग शिखरे, अनेक पवित्र नद्या हे सर्व आणि असेच असंख्य भावविचारांची शिदोरी घेऊन ते परक्या देशात निघाले.
स्वामी विवेकानंदानी सन्यासाच्या जीवनापेक्षा भिन्न असलेल्या जीवनाशी जुळवुन घेतले. त्यांचा धीरगंभीर स्वभाव सखोल विद्वता, लांबलचक भगवा अंगरखा याने त्यांचे सहप्रवाशी दिपुन गेले. स्वामी बालकागत औत्सुक्याने सागर प्रवासाचा आनंद घेत होते. कोलंबोला बोट थांबली तेव्हा तिथले हिनयान बौध्दमठ व सिंगापुरकडे जातांना मलाया बेटावरील चाच्च्यां चे अड्डे पाहिलेत. हाँगकाँगला बोट पोहचली तेव्हा त्यांना जणु चीन देशाची झलकच पहायला मिळाली. छोट्या नावा व पाडावांची भरपुर वर्दळ,प्रत्येक नावमधे नावाड्याचे पत्नि,मुलं असे कुटुंब, पत्नि छोट्या मुलांना पाठीला बांधुन नाव वल्हवणे,अवजड सामान हलविणे,चपाळीने दुसर्या नावेत उड्या मारत जाणे,असे अवघड कामे पाहुन स्वामीजींना भारतातील त्या वयाची मुलं रांगत,त्याच वयात चीनी मुलाला कामा च्या ठीकाणी जावे लागत.चीनी मुलं म्हणजे जणु छोटं तत्वज्ञच! कमालीच्या दारिद्र्यामुळे “गरजेचे तत्वज्ञान” चांगले आत्मसात केले.
भारतीय महान योगी म्हणुन कॅंटन मधील बौध्द विहारात अत्यंत सन्मान पुर्वक त्यांचे स्वागत झाले.चीनमधे व नंतर जपानमधे बंगाली लिपीतील हस्त लिखिते जतन करुन ठेवलेली खुप मंदिरे पहायला मिळाली.आपल्या भारताचा देशाबाहेर असलेल्या प्रभावा ची त्यांना जाणीव झाल्याने आशियाती ल आध्यात्मिक एकात्मतेबद्द त्यांचे मत दृढमुल झाले.आगबोट जपानला पोहोच ल्यावर स्वामीजींनी योकोहामा,ओसाका कियोटो आणि टोकियो शहरे पाहिलीत. रुंद रस्ते,
लहानलहान घरे,पाईन वृक्षांनी आच्छादिलेल्या टेकड्या,सुशोभित बागा तलाव,छोटे छोटे पुल,सुसज्ज लष्कर नौसेना,सागरी व्यापार,औद्योगीक कारखाने अशा बर्याच गोष्टी पाहुन जपानी लोकांची कलासक्त स्वभावाची स्वामींच्या मनावर छाप पडली.
योकोहामाहुन आगबोट पॅसिफिक महासागर ओलांडुन कोलांबियातील हॅंक्युअरला पोहोचली.यानंतरचा शिकागोपर्यंतचा प्रवास आगगाडीने केला.अमेरिकेतील तिसर्या नंबरचे शहर राजधानी असलेले शिकागो अतो नात लोकसंखेनै गजबजलेले सुसंस्कृत, सभ्य जनता आणि भग्न जंगलमय प्रदे शातील संस्कारहीन रासवट प्रजा यांचे मिश्रण असलेलं शिकागो शहर पाहुन हा तरुण सन्यासी गडबडुन गोंधळुन गेले. कठोर परिश्रम,बंधुत्व,सहकार्य व वैज्ञानिक योजनेने प्राप्त केलेल्या सुखसोयी बघुन ते अचंबित झाले. शिकागोत पोहोचल्यावर,सर्वधर्मपरिषदे ची चौकशी केल्यावर त्यांना कळले की, जुलै मधे होणारी परिषद पुढे सप्टेबरला होणार!शिवाय प्रतिनिधी म्हणुन नोंदणी तारीख पण उलटुन गेलेली.भारतातुन याच्या तपशीलाची माहिती करुन घेण्याची कोणीही दक्षता घेतली नसल्याने अशी विकट स्थिती निर्माण झाली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*!!!स्वामी विवेकानंद!!!
भाग-२०*
नरेंद्रांच्या साध्या स्वभावानुसार परिषदेत सहभागी होण्यासाठी कांही अडचणी उद्भवतील असे वाटलेच नाही त्यांच्याजवळ असलेले थोडेफार पैसे सुध्दा संपत आले होते.अशा क्लेश दायक मनःस्थितीत भारताशी मित्रता असणार्या थि ऑसॉफिकल सोसायटी कडे सहाय्य मागीतल्यावर,
त्यांना सांगण्यात आले की, यासाठी आधी सोसायटीचे सदस्यत्व गरजेचे हवे.अखेर हताश होऊन मद्रासमधील चाहत्यांना पैसे पाठविण्याबद्दल सागरी संदेश (केबल) पाठविला.अखेर बोस्टन शहरात स्वस्ताई आहे असे कळल्यावर तिथे गेले असतां,त्यांचे राजबिंड व्यक्तीमत्व पाहुन एका श्रीमंत महिला मिस केट सॅनबर्ग ने त्यांना अतिथि म्हणुन राहण्या स येण्याची केलेली विनंती त्यांनी मान्य केली.स्वामीजींची व्यवस्था मॅसेच्युसेट्स राज्यातील मेटकाफ येथील ब्रिझीमेडोज मधे केली.स्रियांच्या कारागृहाच्या अधिक्षिका श्रीमती जॉन्सनच्या निमंत्रना वरुन स्वामीजी तीथे गेले असतां तेथील मानवतावादी दृष्टीकोन पाहुन ते अतिशय प्रभावतीत झाले.व भारतातील सामान्य जनतेच्या पिळवणुकीचे स्मरण झाले.
प्रोफेसर राईट यांनी स्वामीजींची सर्वधर्मपरिषदेत भाग घेण्याची व्यवस्था केली शिवाय शिकागोचे तिकीट देखील काढुन दिले.शिकागोला ते रात्री पोहोच ले.दिलेला प्रतिनिधी पास दुर्देवाने गहाळ झाल्यामुळे,शिवाय हे रेल्वेस्टेशन जर्मन लोकांच्या वस्तीत असल्यामुळे त्या लोकांना इंग्रजी भाषाही कळत नव्हती.शेवटी कडाक्याच्या थंडीत यार्डात उभी असलेल्या मालगाडीच्या डब्यात अन्नपाण्याविना व अंथरुन पांघरुणा शिवाय स्वामीजींनी रात्र घालवली. दुसर्या दिवशी सकाळी कार्यालयाचा पत्ता शोधत फिरत होते पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते.भुकेने व्याकुळ त्यांनी अनेक दरवाजे ठोठावले पण उध्दटपणे नकारच मिळाला.थकुन भागुन रस्त्याच्या एका कडेला बसले असतां समोरच्या घरातील एक महिला मिसेस जार्ज डब्लु हेल यांना हा माणुस सर्वधर्मपरिषदेसाठी आलेला प्रतिनिधी असावा असे वाटुन मोठ्या अगत्याने त्यांना घरी आणले.
त्यांची सर्व व्यवस्था झाल्यावर,त्या प्रतीष्ठीत महिलेने त्यांना सर्वधर्मपरिषदेच्या कार्यालयात घेऊन गेल्या.परिषदेचे आयोजक,अध्यक्ष असलेल्या डॉ. जे.एच,बॅरोज यांच्याशी स्वामीजींची भेट घालुन दिली. व त्यांना परिषदेत सहभागी होण्याची अनुमतीही मिळाली.त्यांच्या राहण्याची व्यवस्था श्री जॉन बी लायन यांच्याकडे करण्यांत आली. अशा प्रकारे हेल व लायन ही दोन्ही कुटुंबे कायमची स्नेही झालेत. अशा सार्या घटनाप्रसंगात पावलो पावली परमेश्वर सहाय्य करीत आहे ही श्रध्दा बळकट झाली.इश्वराप्रती मनोमन ते विनम्र झाले.
११ सप्टेंबर १८९३, सोमवार रोजी जागतिक सर्वधर्मपरिषदेचे विधिवत उद् घाटन झाले.क्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध ४०० वर्षापुर्वी लागला म्हणुन आयोजित केलेल्या जागतिक कोलंबिया प्रदर्शनाच्या महो त्सवाचा एक भाग म्हणुन या भव्य सर्व धर्म परिषदेचे आयोजन केले होते. भौतिक शास्रे व तंत्रज्ञानाने केलेली प्रगती व ज्ञानविस्तार याची माहिती सर्व जगाला करुन देण्याचा मुख्य उद्देश या परिषदेचा होता. सकाळी १० वाजतां सर्वधर्मपरिषदेचा शुभारंभ झाला.आर्ट पॅलेसचा भव्य हॉल व सात हजार लोकां नी गॅलरी तुडुंब भरली. १२० कोटी लोकांनी स्विकारलेल्या प्रत्येक संघटीत धर्ममताला त्यात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.
यात ख्रिस्ती,हिंदु,जैन, बोध्द,शिंतो,इस्लाम,अहुरमझ्द(पारशी) कन्पुन्युशियस या सर्व धर्मांचा समावेश होता. परिषदेचे सर्व अभिकृत प्रतिनिधी भव्य मिरवणुकीने व्यासपीठावर स्थाना पन्न झाले.रोमन कॅथॉलिक चर्चचे प्रमुख आर्च बिशप कार्डिनल गिबन्स यांनी शेंदरी रंगाचा लांब झगा परिधान करुन अध्यक्षपद स्विकारुन प्रार्थना झाल्यावर सत्र सुरु झाल्याचे उद् घोषित केले. स्वामी विवेकानंद ३१व्या आसनावर स्थानापन्न झाले.ते कोणत्याही विशिष्ट धर्माचे प्रतिनिधित्व करीत नव्हते तर “वेदांच्या सार्वजनीन” धर्माचे प्रतिनिधित्व करीत होते.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.


