
आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न! सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! संत सोपानदेव चरित्र !!!
भाग – २१.
आपण मोठा भाऊ,गुरु असल्याचं दाखले देऊन हरप्रकारे निवृत्ती समजावुन सांगत दार उघडायची गळ घालुं लागले. सोपानही रडवेला होऊन म्हणाले,अरे दादा!तूच तर सांगीतले ना की,संन्यास्या ने रागालोभापलिकडे गेलं पाहिजे,दादा! संताप आवर!समाजानं तुला दुःख दिलं म्हणुन तू स्वतःला शिक्षा कां करतोहेस? त्यापेक्षा समाजाला स्वच्छ कर!उघड की रे दादा कवाड!ज्ञानदादा दोघांचेही ऐकत नाहीसे पाहुन मुक्ता आपल्या लाडक्या दादाची समजुत घालायला पुढे होऊन….
“योगी पावन मनाचा।साही अपराध जनाचा।।
विश्व रागे झाले वन्हीं।संती सुखे व्हावे पाणी।।
शब्दशस्रे झाले क्लेश।संती मानवा उपदेश।।
विश्वपट ब्रम्ह दोरा।ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
मुक्ताबाईच्या मुखातुन इतकी सशक्त, निर्दौष,स्वच्छ अभंगरचना,लाडिवाळ अविर्भाव,गहिरा स्वर,भावनेनं ओथंबले ला आवाज आणि आर्तता!ज्ञानेश्वरच काय पण झोपडीच्या भिंतीनाही पाझर फुटला.ताटी उघडा ज्ञानेश्वराsss या आर्त हाकेनं राग,रुसवा,संताप विसरुन ज्ञानेश्वर बाहेर आले.सगळ्यांना रडु आवरेनासे झाले.ज्ञानदेव बाहेर येऊन निवृत्तीदादांच्या पायावर कोसळुन माफी मागीतली.सोपानांचे डोळे पुसले,मुक्ताई ला कुशीत घेतले नी त्यांचा बांध फुटला.
घळघळ रडणारी मुक्ताई शांत,समंजस होऊन समजुत घालत असल्याचे पाहुन सर्वांना मोठे कौतुक वाटले.
दुसर्या दिवशी पैठणला जाण्या साठी चौघांनी आळंदी सोडली.मजल दर मजल करीत ही भावंंड आपेगांवला त्यांच्या वडिलोपार्जित घर असलेल्या गांवी आलेत,पण तिथेही त्यांना हेटाळणी तिरस्कार!कुत्सीकता,विखारी घाव झेलत गावाबाहेर पडले.आणि चौघेही पैठणला पोहोचले.पैठणला विठ्ठलपंताचे आजोळ होते.त्यांचे मामा कृष्णाजीपंत देवकुळे यांनीही आपल्या या नातवंडांना वाड्यात जागा दिली नाही.पण मामींनी त्यांच्या विरोधात जाऊन गोठ्याजवळची खोली देऊन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली.या विरोधाभासाने सोपान कासावीस झाले.त्यांची कासाविसी पाहुन निवृत्तीदादा म्हणाले,धर्मकांडांचा विळखा इतका जबरदस्त असतो की, अपलं परकं याचं भान विसरतो. संध्या काळी मामीआजींनी तुळशीवृंदावना जवळ सांजवात केल्यावर,या चौघांच्या आवाजाने व सुस्पष्ट मंत्रोच्चाराने वाडा दुमदुमुन गेला.ओंकारनाद,गायत्री जप झाल्यावर भगवद् गीतेच्या उच्चारवर्णाला सुरुवात झाली.
“धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मवेता युयुत्सवः।
मामकाः पाण्डवाश्चेवं किं कुर्वत संजयः”! पडवीतल्या झोपाळ्यावर रामरक्षा म्हणत असलेले कृष्णाजीपंत ह्या सर्व प्रकाराने स्तिमित झाले.ही आपली नातवंड सामान्य नसुन,ईश्वरांचे अवतार आहे याची त्यांना जाणीव झाली.
संध्याकाळचे जेवणे आटोपल्यावर ज्ञानेश्वर पैठणच्या धर्मसभेबद्दल बोलत असतांना सोपानदेव म्हणाले,दादा!पैठण च्याही धर्मसभेने आपल्याला नाकारले शुध्दीपत्रक दिले नाही तर?तर आपण काशीच्या महासभेत आपलं गार्हाणं मांडु!पण दादा!काशीला जाणं सोपं नाही निवृत्ती म्हणाले,आपल्याला हटयोग अभ्यास येतो,त्या सामर्थ्याचा वापर करुन समाजोपयोगी अस्तित्व सिध्द करु
कांही तरी वेगळं,अघटीत घडलं की,लोकं आकर्षित होतील.समाजाचं प्रबोधन, उद्बोधन करणं कर्मकर्तव्य तसेच लोकांना ज्ञान देऊन त्यांच अज्ञान दूर करणं आपलं जीवित कर्तव्य समजुन लोकं आपल्याकडे आकर्षित होतील असं केलं पाहिजे.सोपानांच्या बोलण्यांतील सुस्पष्टता,सुसंगती,तर्कशुध्दता होती. काय म्हणायचं हे ज्ञानेशांना उमजलं,पण पटलं नव्हतं.दादा! समाजाला या अज्ञाना तुन,कर्मकांडातुन,बाहेर काढायचं असेल तर,त्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित होणं जरुरी आहे,तरच मांतव्य जपणारा एक नवा समाज निर्माण होईल.मग कोण्या विठ्ठलपंत-रुख्मिणीला देहान्त प्रायश्चित घ्यावं लागणार नाही.पुन्हा कुणाची लेकरं अनाथ होणार नाही, बहिष्कृत होणार नाही.यासाठी उर्जेचं सामर्थ्य,योगसामर्थ्य समाजाला समजावुन देणे नितांत गरजेचं आहे. बोलतां बोलतां सोपानांचा आवाज गहिवरला,गळ्यात हुंदका दाटला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ५-५२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – २२.
गेल्या २०-२२ दिवसांच्या शिणवट्याने थकलेल्या चौघांनाही दुसर्या दिवशी जरा उशीराच जाग आली ती मामीआजीच्या आवाजानेच!आज त्यांच्याकडे श्राध्द असल्यामुळे गडबड सुरु होती.त्यांनाही ब्राम्हणभोजन झाल्या वर जेवायचे निमंत्रण दिल्यावर सोपानाचे चेहर्यावरची चिंता पाहुन निवृत्तीनाथांनी कारण विचारले.दादा!आपण इथे असल्याने कांही विपरीत तर घडणार नाही ना? आणि झालेही तसेच…
मध्यान्ह उलटली तरी,कोणीही बहिष्कृत नातवंड घरांत असल्यामुळे जेवायला आले नाहीत.संतापाने श्रीधर पंत मुलांवर ओरडत म्हणाले,हे सर्व तुमच्यामुळे घडलय!तुमच्यामुळे आज माझे पितर उपाशी राहणार,त्यांना अन्नोदक मिळणार नाही,हे पाप माझ्या माथी बसेल.आणि आमच्यामुळे आपल्या स्वर्गस्थ पितरांना अन्नोदक मिळाले तर?ज्ञानदेवांनी दृढ स्वरांत विचारले.मामाआजोबांच्या चेहर्यावर संताप तसाच होता.
ज्ञानदेवांनी डोळे मिटले आणि सोपानांना मामाआजोबांच्या स्वर्गस्थ पितरांना बोलावण्याची आज्ञा केली. आज जरी त्यांच्या वडीलांचंच श्राध्द असलं तरी,त्यांचे सगळेच पितरं आज इथे येऊन जेवतील.ज्ञानदेवांच्या आज्ञेने सोपान वाड्याबाहेर गेले.मामाआजोबांना काय वाटले कुणास ठाऊक,त्यांनी पुजेच्या ताटातील तीळ घेऊन दाराबाहेर टाकत आव्हान केले.
“आगच्छंतु श्राध्दकाले पितृपितामह प्रविता महः।आर्गच्छामः।अस्मत् पितृ पितामह प्रविता महस्थाने क्षणं दत्वा भवभ्दीः प्रसादः कर्तव्यः।”
त्यांच आवाहन पुर्ण झालेही नाही तोच ज्या दारांतुन सोपान बाहेर गेले,त्याच दारातुन त्यांचे पितर आंत येऊं लागले. भान हरपुन श्रीधरपंतानी मामीआजीला हाक मारली.मामी गडबडीने बाहेर आल्यावर समोरचे दृष्य पाहुन गांगरल्या तोच त्यांचा हात धरुन मुक्ताई म्हणाली, चला मामीआजी!या सगळ्यांना वाढायला घेऊ या ना?लगबगीने दोघीनी ही साग्रसंगीत सर्व वाढल्यावर सर्व पितरं आसनस्थ होऊन शांतपणे जेऊ लागली. अन्नाचा सुवास बाहेर दरवळु लागला. आपण कुणीच जेवायला गेलो नसतांना कृष्णाजीपंताच्या घरी पंगत कुणाची बसली हे बघायला ब्राम्हण तिथे आले आणि समोरचे दृष्य पाहुन दिडःमुढ झाले त्यांना दिसले,वाड्याबाहेर सोपान व वाड्याच्या अंगणांत ज्ञानेश्वर हात जोडुन डोळे मिटुन उभे आहेत आणि वाड्याच्या पडवीत चक्क कृष्णाजी पंताच्या पितरांची पंगत बसलेली.ब्राम्हणांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता स्वतःला चिमटे काढुन बघत होते.पण समोर घडत असलेले सुर्यप्रकाशा इतके सत्य होते.पितर जेवुन उठले.कृष्णाजी पंतांनी त्यांना मनोभावे प्रणिपात केला. सर्व पितर स्वर्गस्थ झाले आणि सोपान आंत आले.
मामाआजोबांचा त्यांच्याविषयीचा आकस गेला व मामाआजोबांनी चौघानां ह्रदयाशी कवटाळले.क्षमा मागीतली. आग्रहाने त्यांना जेवुं घातले.जेवणं झाल्यावर चौघेही भावंड खोलीत आल्या वर,मुक्ताईनं सोपानांना विचारले,दादा!तूं कां बरं बाहेर थांबला होतास?आणि ती सगळी पितरं गेल्यावरच तू आंत आलास सोपान म्हणाले,मुक्ते!ज्ञानदादांनी आज्ञा केल्यानुसार आजोबांच्या पितरांना आव्हान केले आणि ज्ञानदादानं आपल्या योगसामर्थ्यानं त्यांना या भूतलावर आणले,पण त्यांच्याबरोबर कांही पाशवी शक्तीही येऊ पाहत होत्या.त्या जर आल्या असत्या तर श्राध्द निर्विघ्न पार पडु शकले नसते.त्या शक्तींना रोखुन धरण्यासाठी मी वाड्याबाहेर थांबलो.
तेवढ्यात मामाआजोबांनी धर्म सभेत चलण्यासाठी बाहेर बोलावलं.इथं घडलेला वृतांत त्यांच्या कानी गेला आहे.
पैठणच्या धर्मसभेत येण्यासाठी या भावंडांनी मैलोगणती पायपीट केली होती,आता तो क्षण,ती वेळ आली होती, स्वतःला सिध्द करण्याची!
धर्मसभेच्या व्यासपीठावर आचार्य बोपदेवशास्री व दुसर्या आसणावर राम शास्री बसले होते.कृष्णाजीपंत आणि चौघा भावंडांनी आचार्यांना वंदन केले.
आणि त्यांच्या आज्ञेने चौघानीही आपापली ओळख करुन दिली.सभेतील कांही ब्राम्हणांनी त्यांच्या नांवांची हेटाळणी,उपहास करत असलेले पाहुन, सोपानदेव हात जोडुन म्हणाले, आचार्य! आपली अनुमती असेल तर,या भूदेवांच्या शंकेचं निरसन करुं का?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ६-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – २३.
आचार्यांनी मानेनंच संमती दिली. सोपान अभिवादन करुन नम्रपणे म्हणाले भूदेव!आमच्या आईवडीलांनी आम्हा भावंडांची नावे ठेवली,ती संगती सांगण्या चा प्रयत्न करतो.माझे जेष्ठ बंधु व गुरु निवृत्तीदादांना प्रणाम करुन सुरुवात करतो.निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ता यांचा अर्थ असा आहे की,”भौतिक संसारातून निवृत्त होऊन पारमार्थिक ज्ञान प्राप्त केलं की,आध्यात्माचा सोपान चढुन गेल्यावर मनुष्यप्राणी मुक्त होतो.”अशी ही प्रतिनिधिक संज्ञा आमच्या नांवाची आहे.दहा वर्षाच्या सोपानानं केललं विश्लेषण ऐकुन सारी धर्मसभा थक्क झाली.पण कांही कट्टरवादी होतेच, त्यातल्या एकाने विचारलेच,या धर्मसभेनं तुमचा न्याय कां करावा?याचे कारण देऊं शकाल का? ज्ञानेश्वर पुढे होऊन म्हणाले, आचार्य! धर्म हा मानवकल्याणार्थ असुन तो ईश्वर सर्व चरांचरांत भरुन आहे,तसच तो मनुष्यप्राण्यांतही आहे.या मनुष्यस्थीत ईश्वराच्या अधिष्ठानासाठी आम्हाला न्याय हवा.ज्ञानदेवांचे संभाषण ऐकुन धर्मसभा विचाराधिन झाली.तरीही…
कांही विकृत विचारांचे धर्ममार्तंड तिथे होतेच.तिथुन एक पाणी वाहणारा, रेड्यावर पखाल बांधुन जात होता.त्याला हाकारुन रेड्याचे नांव विचारले.त्याने ‘ज्ञाना’ सांगतांच सगळी टवाळखोर कुत्सितपणे हसली.त्यांनी ज्ञानदेवाला डिवचले आणि त्यानंतर जे घडलं ते
न भूतो न भविष्यती!
त्यांच्यातील एका कर्मठ ब्राम्हणाने आसुड हिसकावुन रेड्याच्या पाठीवर मारायला लागला,तर वळ मात्र ज्ञानेशां च्या पाठीवर उठले.कर्मठांचे आव्हान स्विकारुन ज्ञानदेवांनी रेड्याच्या मस्तका वर हात ठेवताच,रेडा स्वच्छ उच्चारांत मनुष्यवाणीत वेद म्हणुं लागला.मग मात्र सर्वांची बोलती बंद झाली.धर्मसभेची मती गुंग झाली.सारं चित्रच बदलले.या घटनेने ज्ञानदेव आणि तीन भावंडांची योग्यता किती महान आहे हे सगळ्यांना कळुन चुकले.जी धर्मसभा या भावंडांची हेटाळणी करीत होती,तीच धर्मसभा या चौघांच्या पायांशी झुकली.धर्मसभेने अत्यंत भक्तीभावाने व आदराने शुध्दी पत्रक देण्याचे ठरविले.
दुसर्या दिवशी पैठणच्या धर्मसभेने पुज्य भावाने आचार्य बोपदेवांच्या नेतृत्वा खाली शुध्दीपत्र तयार करुन या चौघांच्या सुपुर्द केलं.यानंतर पैठण वासीयांच्या आग्रहास्तव तिथं ज्ञानदेवांनी प्रवचन, संकीर्तन केलं.
चौघांचा परतीचा प्रवास सुरु झाला.चौघांची विशेषतः ज्ञानदादांची कीर्ती सगळीकडे पसरल्यामुळे लोकांचे प्रेम,श्रध्दा,आग्रह,आदरतिथ्य याचा त्यांना पदोपदी प्रत्यय येत होता.वाटेतही एक दोन ठीकाणी अघटीत साक्षात्कार लोकांना दाखवावे लागले.नेवाश्याचे सच्चिदानंद कुळकर्णी या मृत व्यक्तीला जिवंत केल्यामुळे तर कीर्तीत आणखीन भर पडली.वेद म्हणणार्या रेड्याने वाटेत आळेगांवी प्राण सोडल्यावर त्याला मुक्ती दिली.
ज्ञानदेवांच्या योगसामर्थ्याची, ते घडवित असलेल्या साक्षात्कारीची कीर्ती चहुकडे पसरल्यामुळे,या भावंडांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोणच बदलला.समाज जसजसा त्यांच्याजवळ येऊ लागला तसे सोपान अंतर्मुख होत गेले.स्वतःशीच अंतर्द्वंद सुरु झाले.ज्या आळंदीने त्यांचे आईबाबा हिरावुन घेतले, त्यांना अपमान,तिरस्कार,अवहेलना,घृणा दिली,त्याच आळंदीकरांनी त्यांचे भव्य स्वागत केले.आळंदीला आल्यावर त्यांचा पूर्वीचा दिनक्रम सुरु झाला.फक्त दोन गोष्टीत बदल झाला.एक म्हणजे त्यांची माधुकरीची झोळी सुटली व दुसरा बदल संध्याकाळी लोकांना प्रबोधन,कीर्तन, प्रवचनासाठी वेळ राखुन ठेवावा लागला. सोबतच त्यांची ज्ञानसाधनाही सुरु होती. लोकांचा भक्तीभाव,आदर वाढतच होता. आणि सोपान मात्र दिवसेंदिवस अंतःर्मुख होत होते.रेड्यामुखी वेद वदवणं म्हणजे अंतर्गत उर्जेला एकवटुन परकाया प्रवेश करायचा हे हटयोगाचं सामर्थ्य सोपानदेव जाणत होते.आताही सोपानांना तो प्रसंग जसाच्या तसा आठवला.
ज्ञानदादा रेड्यामुखी वेद म्हणवत होते आणि सोपानांना अश्रूपुर्ण नेत्राला काय दिसले,तो आभास नक्कीच नव्हता. धर्मसभेत रेड्याच्या मस्तकावर हात ठेवुन खरं तर ज्ञानदादा उभे होते,पण सोपानांना त्याजागी शंख,चक्र,गदा,पद्म धारण केलेले श्रीविष्णु,त्यांच्या हातातील सुदर्शन चक्र फिरत होतं.चेहर्यावर प्रसन्न हास्य डोळ्यात शांत,स्निग्ध भाव!सोपानांना कधी ज्ञानदादा,तर कधी विष्णु दिसत होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ६-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – २४.
लौकिक अर्थानं पारमार्थिक, आध्यात्मिकक आणि ज्ञानसंपदानं ही भावंडं महान होती.ही जितकी समाजाभिमुख होत गेली,तेवढा त्यांचा स्वशी संवाद वाढत गेला.सोपानही अपवाद नव्हते.ते ही स्वसंवेदी बनत होते अशातच एक दिवस भगवद्भक्त,विठ्ठल सखा नामदेव भेटायला आले.भक्त पुंडलिकांनी स्थापित केलेल्या वारकरी धर्माचे पाईक होते,पण लोकांमधे एक संघता नसल्यामुळे,त्यातच चक्रधरस्वामीं च्या महानुभाव पंथान जोर धरल्यामुळे भागवत धर्माला कांहीशी उतरती कळा आली होती.त्याचमुळे अलिकडे ज्ञानदेव अस्वस्थ होते.त्यांच्या अस्वस्थतेचे सोपानानी कारण विचारल्यावर,ज्ञानदेव म्हणाले,सोपाना! कांहीतरी मोठं ठोस असं समाजाच्या कल्याणाचं घडत नाही, सनातन वैदिक धर्माच्या नांवाखाली हे पाखंडी सामान्यजनांचा छळं करतात, मनांत असुन देवभक्ती करतां येत नाही. त्यांची घुसमट,कोंडमारा होतोय हे बघुन आपण कांहीतरी करायला पाहिजे,ज्या योगे या समाजातील जातीभेद,धर्मभेद, मिटुन या धर्मकांडाना टाळुन देवभक्ती करतां येईल असं कांहीतरी करावसं वाटतेय.
सोपान एकदम म्हणाले,दादा!जसं गुरुबसेश्वरांनी ‘वीरशैवपंथ’, चक्रधरस्वामीं नी ‘महानुभवपंथ’ स्थापन केला,तसं कांहीसंं घडूं शकणार नाही कां?ज्ञानदेवां चे डोळे चमकले.सांपडला,सोपाना मार्ग सांपडला,मनांतील अंधार नष्ट झाला. भक्तश्रेष्ठ पुंडलिंकांनी स्थापन केलेला वारकरी संप्रदाय जो आज थोडासा झाकाळला,त्याला आपण पुनः उजाळा देऊ या!भगवान श्रीकृष्णाने भगवद् गीतेत सांगीतलेली ‘वसुधैव कुटुम्बकम् ची संकल्पना आपण समाजात रुढ करु या!भागवत धर्माच्या झेंड्याखावी एकत्रीत येण्याचं आवाहन आपण बहुजन समाजाला करुं या!धर्म,पंथ,वंश जात यापलिकडे जाणारा मानवधर्म हाच आपल्या आवाहनाचा विषय असेल. ज्ञानदेवांनी अतिहर्षाने सोपानाला मिठी मारली.त्याच प्रसन्नतेत त्यांना झोप लागली.
दुसर्या दिवशी पंढरपूरहुन नामदेव जनाबाई,चोखामेळा, सावतामाळी, गोरोबाकाका इत्यादी संतमंडळी आल्याने सर्वानाच खुप आनंद झाला.
निवृत्तीनाथ,सोपान,मुक्ताबाईंनी सगळ्यांचे आगत स्वागत केले.नास्ता पाणी झाल्यावर अंगणांत सर्व जण बसले.अगदी निस्तब्ध शांततेत फक्त ज्ञानदादांचाच पार ह्रदयापर्यंत पोहोचणारा स्नेहसुधा वर्षवणारा आवाज ऐकु येत होता.सोपान एकटक ज्ञानदादा कडे पाहत होते.योग सामर्थ्याची अपरिमित साक्ष असलेला दादा प्रत्येक वेळी वेगळाच भासत होता.आणि सोपानांना कांही दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.
चौघेही भावंड घराच्या पडक्या भिंतीवर बसले होते.तेवढ्यात त्यांना निरोप आला,महान हटयोगी चांगदेव हातात सापाचा चाबुक व वाघावर आरुढ होऊन अमाप भक्त व शिष्यांसह भेटीस येत आहेत.मुक्ता म्हणाली दादा! आपण त्यांना पायीच सामोरे जायचं का?नाही मुक्ता?आपण या अचेतन भिंतीवरच स्वार होऊन भेटीस जाऊं या!असे म्हणुन ज्ञानदादांनी अचेतन भिंतीला आदेश दिला.जड भिंत चालवत आपल्याला सामोरे आलेले पाहुन चांगदेवांचा अहंकार पार उतरला व ते ज्ञानदादाला शरण आले.हटयोगावर प्रचंड हुकमत असुनही केवळ अहंकाराने त्यांची विद्या काळवंडली होती त्यावर हा उतारा होता.
सोपानदेव आपल्याच विचारात गर्क,तल्लीन असतांनाही ज्ञानदेवांनी विचारलेल्या प्रश्नांना संयुक्तीक उत्तर दिल्याने सर्वजण चकीत झाले.सर्वांनी पुढची भेट पंढरपूरला घेण्याचे निश्चित करुन एकमेकांचा निरोप घेतला.
पंढरपुरात त्या दिवशी अभूतपुर्व सोहळा झाला.ज्ञानदेवांची कीर्ती अवघ्या पंचक्रोशीत पसरली असल्यामुळे सगळी संत मंडळी,भगवद् भक्त,वारकरी जमले होते.अगदी पुरातन काळापासुन अस्तित्वात असलेला भागवत धर्म आणि भक्त पुंडलिकांनी स्थापलेला वारकरीपंथ या दोहोंची उत्तम सांगड ज्ञानदेवांनी घातली.भगवंताची भक्ती करणारा तो भागवत आणि वारी करतो तो वारकरी अशा दोघांना एकत्रीत आणुन या दोहोतील गाभा,सारतत्व एकत्र आणुन ज्ञानदेवांनी वारकर्यांचं,भगवद् भक्तांच उद्बोधन करुन सर्व जाती,धर्म,पंथांच्या लोकांना समजावुन घेणारा,आपलसं करणारा,सर्व समावेशक असा भागवत धर्म भक्तीच्या ध्वजपताकेखाली प्रस्थापित केला.या कार्यात सोपानांचा सक्रीय सहभाग होता.सगळ्यांनी भागवत धर्माची पताका कायम फडकत ठेवावी हे विठुरायाच्या साक्षीने निश्चित झाले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ६-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – २५.
दुसर्या दिवशी भल्या पहाटेच विठ्ठलमंदिरांतुन ॐकार ध्वनी ऐकु येऊ लागला.वातावरनांत ॐनाद भरुन राहीला.लोकांची पावले आपसुकच मंदिराकडे वळली.मंदिराच्या गर्भगारांत निवृत्त,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताई पद्मासन घालुन बसले होते.ध्वनींची स्पंदने वाढली जमलेले लोकं अनिमिष नेत्राने बघत होती.सारी आवर्तने,शांतीपाठ संपल्या वर पांडुरंगाला साष्टांग दंडवत घालुन चौघेही बाहेर येऊन जमलेल्या लोकांना नमस्कार केला.त्यांना उद्देशून ज्ञानदेव म्हणाले,हा सोपान किती नेमकं आणि सुंदर बोलतो ते ऐका,अनुभवा.तो आतां नमनस्तोस्र सांगेल.सोपानांनी निवृत्तींकडे पाहिलं,त्याच्या डोळ्यांत आदेश होता, विश्वास आणि अभिमानही! सोपानांनी विठुरायाला नमस्कार करुन पद्मासन घातले.समोर बसलेल्या श्रोतृवर्गाला वंदन करुन बोलायला सुरुवात केली.
निवृत्तीनाथांचा शिष्य,साक्षात ज्ञानसूर्याचा धाकटा बंधु सोपानदेव आपल्याला विनम्र वंदन करुन बोलायला सुरुवात करतो.डोळे मिटुन हळुवार आवाजांत सोपानांनी नमनस्तोस्रस सुरुवात केली.
“नमो ज्योतिर्मय ब्रम्हा।आनंद ईश्वर पुरातना।। अशी सुरुवात करुन शेवट ॐ शांतीः शांतीः शांतीः।। रामकृष्णहरी। रामकृष्णहरी।।नमनस्तोस्र पूर्ण झाला. रामकृष्णहरीचा गजर झाला.डोळे उघडुन बघीतले तर सर्व श्रोतृवर्गाचे डोळे मिटलेले,रामकृष्णहरीच्या गजरात तल्लीन झालेले,जणुं सगळ्यांची भाव समाधी लागली होती.त्यांनी निवृत्तीदादां कडे बघीतल्यावर त्यांच्या चेहर्यावर प्रसन्नता,समाधान,अपेक्षापुर्तीचा आनंद, धाकट्या भावाबद्दलच कौतुक,लाडक्या शिष्याबद्दलचा अभिमान,आपला शिष्य उत्तमरित्या कसोटीस उत्तमरित्या उतरल्याची पावती त्यांच्या डोळ्यांतून वाहणार्या अश्रूच्या प्रत्येक थेंबातुन दिसत होती.धन्यता कशाला म्हणतात, कृतार्थता म्हणजे काय,याची प्रसन्न जाणीव त्याक्षणी सोपानाला झाली. निवृत्तीदादांच्या शेजारी बसलेले ज्ञानदादा साक्षात ज्ञानसूर्य भासत होते. नामदेवांनी विठ्ठल गजर केला आणि लोक पांगले.
आतां सभामंडपात होते फक्त निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताबाईअणि नामदेव अर्थात या संगळ्यांचा साक्षीदार होता तो सावळा विठ्ठल!निवृत्तीदादांनी, सोपानांने रचलेल्या नमस्तोस्रात ज्या कांही क्षुल्लक चुका होत्या त्या दृष्टीस आणुन दिल्या.नमनस्तोस्र उत्तम रचल्या बद्दल कौतुक केले.
भागवतधर्माचं स्वरुप सर्व समावेशक असल्यामुळे त्याला सर्व व्यापक रुप देण्यासाठी सर्वदूर प्रचार व प्रसार होण्यासाठी दूरदूरच्या तिर्थस्थळां ना भेटी देऊन तिथे,त्या त्या ठीकाणी भागवत धर्माचा प्रसार करावा लागेल हे निवृत्तीनाथांनी सुचवल्यामुळे सर्वानाच आनंद झाला.तिर्थाटनाला जाण्याच्या योजनेला सर्वांनी संमती दिली.या चौघा भावंडाबरोबर नामदेव,गोरोबा,सावता ही संतमंडळी,गावातीलही कांही मंडळी जाणार होती.चार दिवसांनंतरचा मुहुर्त निघाला.मृत्युला मिठी मारुन केवळ ज्ञानदेवांच्या हस्तस्पर्शाने जिवंत झालेले सच्चिदानंदबाबा नेवाशाहुन त्यांच्या सोबत जाण्यासाठी आले.
तिर्थाटनाची तयारी पूर्ण झाल्यावर पंढरपूरहुन सर्व मंडळी आळंदीला आली. पैठणला जातांना वाटेत नेवासेला मोठा मुक्काम पडला.आणि तिथेच सर्व सामान्यांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेत भगवद् गीतेच्या १८अध्यायातील ७०० ओव्यांवर आधारीत भावार्थ दीपिकेची मिरास सांभाळणारा ९१३४ ओव्यांची “ज्ञानेश्वरी” ग्रंथ ज्ञानेश्वरांनी तयार केला.या अविष्काराचे आपण साक्षीदार आहोत यानेच सोपानदेव रोमांचित झाले.ज्ञानेश्वरी लिहुन झाली आणि नेवासकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन मंडळी पुढे निघाली.ज्ञानदेव जेव्हा चर्चेत,मनन चिंतनात गुंतलेले असले की, जमलेल्या श्रोतृवर्गाचे प्रबोधन करण्याची जबाबदारी सोपानावर यायची आणि मग त्यांच्याही प्रतिभेला बहर यायचा.
याच प्रवासात सोपानदेवांनीही हरीपाठांचे अभंग रचले.अवघं १४-१५ वर्षाचं कोवळं वय,पण पारमार्थिक ज्ञानानं ओसंडुन वाहणारे शब्द,कुणालाही समजेल अशी सोपी सरळ भाषा,असे सोपान खुलत,उमलत, फुलत होते.बघतां बघतां तिर्थाटन संपलं
ज्ञानदेवांनी आपल्या अलौकिक योग सामर्थ्याची साक्ष देत लोकांना आपलसं केलं होतं आणि सोपान प्रत्येक गोष्टीचं अवलोकन करत एकप्रकारे एकलव्या सारखं स्वयंशिक्षण,आत्माध्ययन सोपान करीत होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ६-५-२०२१.


