संत सोपानदेव चरित्र भाग २, (६ ते १०)

आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न!  सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्‍या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न!  सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्‍या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  संत सोपानदेव चरित्र  !!!      

           

भाग  – ६.

           सोपानांनी आईच्या नांवे फोडले ला टाहो झोपडीचे छत फाडत त्या ध्वनीने इंद्रायणीचा जणूं थरकाप उडाला. आपल्या या संथ वाहणार्‍या “जीवनदायीनी” या नावाला काळीमा फासणारं ठरलं.सोपानाच्या फोडलेल्या टाहोनं इंद्रायणीची ही अवस्था? तर त्याला कुशीत घेतलेल्या निवृत्तींची अवस्था काय झाली असेल?मुक्ताई तर लहान होती,तिची समजुत कशीही पटेल पण,सोपान?आईपण आठवण्याइतके जाणते होते,ते कसे आईशिवाय राहु शकेल?निवृत्ती घायाळ नजरेने ज्ञानेशा कडे पाहत होते.सोपानांनी त्यांना घट्ट मिठी मारुन हुंदक्यावर हुंदके देत होते आणि असाह्य,केविलवाणे,निवृत्ती ज्ञानदेव मुकपणे त्याचं रडणं बघत होते.

आईच्या अनंत आठवणी सोपानांच्या मनात पिंगा घालत होत्या.डोळ्यातुन वाहणार्‍या प्रत्येक अश्रूतुन आईची एक एक आठवण झिरपत होती.दोन दिवस झाले तरी आई बाबा आले नाहीत आणि आतां ते परत कधीच येणार नाही हे सत्य स्विकारायची मनाची तयारी करुन म्हणाले, निवृत्तीदादा!यापुढे आई म्हणुन रडणार नाही.वेगळाच सोपान झालेला असेल.मुक्ताईची आई व बाबा या दोन्हीही भूमिका निभावेन.मुक्ताईला हसरं ठेवायचं असेल तर सोपानाला रडुन चालणार नाही.तुम्ही व ज्ञानदादांनी सांगीतलेल्या जीवनाच्या मार्गावरुन हा सोपान पावलं टाकेल.तीन भावांचा संवाद मुक्ताई रडणे विसरुन विस्फारल्या डोळ्यांनी पाहत,ऐकत होती.तिच्याही निरागस बाल मनाला एवढं कळलं की, आतां आई बाबा परत येणार नाही.

        उद्यापासुन कोणी काय कामे करावी याचा आराखडा करणें सुरु असतांनाच,दूरुन विनायकबुवा येतांना दिसले.आल्यावर त्यांनी धीर एकवटुन, अवसान गोळा करुन म्हणाले,मुलांनो! एक अत्यंत दुःखद वार्ता सागण्याचे दुर्भाग्य माझ्या वाट्याला  आले.उच्च वर्णीय समाजानं तुमचा स्विकार करुन, मौंजीबंधनाला मान्यता द्यावी,यासाठी धर्मसभेने दिलेली देहान्त प्रायश्चिताची शिक्षा तुमच्या आईवडीलांनी स्विकारुन स्वतःस गंगेत समर्पित केले.तुम्ही आतां पोरके झालात.चौघांच्याही गालावरुन  ओघळणार्‍या अश्रूंबरोबरच मूर्तीमंत निश्चयही ओघळत होता.निश्चयी स्वरांत ज्ञानदेव म्हणाले,अखेर हिंदु धर्मातल्या कर्मठ कर्मकांडांनी  आपल्या आईबाबां चा बळी घेतला.त्यांचं ब्रम्हसभेकडुन शुध्दीपत्र मिळवण्याचं अपुरं काम पूर्ण करुं.आणि दादा!यापुढे धर्मातल्या कर्मठ कांडापायी पुनः कोणाचा बळी जाणार नाही असं कांहीतरी करणं हेच माझ्या जीवनाचं उदिष्ट असेल.त्या चौघांचा संयमीपणा,आईवडीलांच्या मृत्युची बातमी धीरोदत्तपणे स्विकारल्याचा समंजसपणा,परमेश्वरावरचा गाढ विश्वास एकमेकांंबद्दलची आत्यंतिक माया, श्रीपादस्वामीची विठ्ठलपंताच्या पोटी चार अलौकिक रत्न जन्माला येणार ही भविष्यवाणी त्यांना आठवली.चौघांच्या  डोक्यावरुन मायेने हात फिरवत, आशिर्वाद देऊन परत गेले.

        आईबाबा कायमचे निघुन गेले हे सत्य कितीही क्लेशकारक असले तरी स्विकारणं भाग आहे.यापुढची वाटचाल आत्मनिर्भर होऊन करणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वर म्हणाले,मुक्ते! विनायक भटजीं ची पत्नी कावेरी आक्काकडुन आवश्यक गोष्टी शिकुन घे. आजचा तुझ्या चार वर्षा च्या बालपणांंतला शेवटचा दिवस समज. सोपाना!तूं जास्तीत जास्त लक्ष विद्या भ्यासाकडे व मुक्ताईकडे दे!आपण सन्यासाची पोरं म्हणुन समाज आपल्या ला धिक्कारेल,हेटाळणी,अपमान,अन्याय करतील,पण हीच सन्यासाची पोरं काय करु शकतात,हेच या समाजाला दाखवुन द्यायचं आहे.या चौघांची दुर्दम्य इच्छा शक्ती आणि केलेला संकल्प सिध्दीस नेण्याची धडपड पाहतां नियतीलासुध्दा विचार करावा लागेल.भविष्याविषयी समोर सारा अंधार असतांनाही चौघेजण निद्रेच्या स्वाधीन झाले.

        दुसरा दिवस उजाडला तोच मुळी वेगळाच.नेहमीप्रमाणे निवृत्ती-ज्ञानदेव गंगाघाटावर गेले.निष्पाप मुक्ताई अजुन उठलेली नव्हती.सोपानांना जाग आली आणि कर्तव्याची जाणीव झाली आणि घर अंगणाच्या साफसफाईला सुरुवात केली.तेवढ्यात खांद्याला अडकवलेली झोळी व उद्विग्न चेहर्‍याने निवृत्ती ज्ञानेशां नी घरांत प्रवेश केला.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  सोपानदेव  !!!

भाग – ७.

          एरवी शांत समंजस असलेले आपले हे दोन भावांच्या चेहर्‍यावर एवढी वेदना,उद्विग्नता पाहुन सोपानांनी कारण विचारल्यावर,माधुकरी मागायला गेले असतां,ज्ञानेश्वराबरोबर घडलेला प्रसंग निवृत्तीनाथ सांगु लागले.एका घरासमोर ज्ञानदेव उभे राहुन ॐ भवति भिक्षां देही असा पुकारा केल्यावर हातात भाकर घेऊन घरची बाई बाहेर येऊन झोळीत भाकर टाकणार तेवढ्यात त्या घरचा पुरुष बाहेर आला व तिच्या हातची भाकर हिसकावुन कुत्र्याला टाकली व ज्ञानदेवांना हाकलुन दिले.हा अपमान सहन न होऊन ज्ञानदेव त्याला म्हणाले, तुम्हाला जर मानव आणि पशूतला फरक  समजत नाही तर तुम्ही कसले ब्राम्हण? असा रागाने सवाल करुन तडक तिथुन निघुन आले.हे ऐकुन सोपानांही राग आला.मुद्रा लाल झाली,पण क्षणभरच! शांत स्वरांत प्रौढ मानसासारखे म्हणाले, यात एवढं राग येण्यासारखं काय आहे? हे तर अपेक्षितच होतं.आपण वादळाला तोंड द्यायचं ठरवल्यावर,मग काय घाबरायच?ज्ञानदादा आपण ज्ञानोपासक ना? मग,”विद्याविनय सम्पन्ने ब्राम्हणे गवि हस्तिनी ।शुनि चैव श्वपाके च पण्डीतः समदर्शिना”।। असं भगवंत श्रीकृष्णाने सांगीतले आहे ना? दादा!तुला तर अवघी गीता पाठ आहे.आपल्याला संतापायचं कारणच नाही.माधुकरीवरच आपलं जगनं आहे तर,स्थितप्रज्ञता ठेवलीच पाहिजे ना?

‌           सहा वर्षाच्या सोपानाचे बोलणे ऐकुन निवृत्ती व ज्ञानदेव डोळे विस्फारुन दिड्ःमुढ झालेत.ज्ञानेशा म्हणाले,अरे सोपाना!तूं आणि भगवद् गीता?ते सुध्दा पांचवा अध्याय? आणि कर्मसन्यासयोग?अरे कुठे आणि कधी रे शिकलास?तुम्ही दोघे घाटावर जात होता तेव्हा मला बाबांनी संथा दिली.आणि गीतेचे अठराही अध्याय शिकवले. संकोचुन सोपानदेव म्हणाले,एवढा संयमी आणि शांत असणारा ज्ञानदादा विचलित झालेले पाहुन,जस सुचलं तसं बोलुन गेलो.तुम्ही दोघे भल्या पहाटे घाटावर जाऊन वेद उपनिषदांची हटयोगाची चर्चा करीत असत आणि बाबांनी विधिवत भगवद् गीता शिकवुन मुखोद्गत करुन घेऊन सोपानाला ज्ञानसंपन्न,समंजस शहाणं बनवलं.सोपानाच्या मनाची जमीनीची मशागत होऊन त्यावर कांही बीजांकुर फुटले होते,अंकुरले होते.ज्याला आपण लहान,अबोध समजत होतो तो आपल्याला समजवाण्या इतका समंंजस झाला होता.आतां मुक्ताईची काळजी नव्हती.तीच्यासाठी सोपानच सक्षम होता.ज्ञानदेवांचा राग कुठल्या कुठे पळाला.आणि दोघांनी धाकट्या सोपानाला आपल्या कवेत घेतले.तोच

           दादाss ज्ञानदादा,सोपानदादा, निवृत्तीदादाss बघा मला काय सांपडले? मुक्ताईच्या हाका ऐकुन तिघेही बाहेर आलेत.मुक्ताईच्या हातात पिवळे ठिपके असलेल्या हिरव्या रंगाच्या कांचेच्या बांगड्या बघुन जागच्या जागी थिजल्या सारखे थबकले.तीच्या हातातल्या बांगड्या बघुन तिघांच्याही काळजांत चर्र झालं!उरांत हुंदका घुसमटला,डोळ्यात पाणी उभं राहीलं.सावरुन निवृत्तीदादा म्हणाले,मुक्ते कुठे मिळाल्या?गंगेच्या काठावर वाळुत ह्या आईच्या बांगड्या सांपडल्या,आणि सोपानला बिलगुन रडु लागली.

         मुक्ते एकटीच गेलीस होय गंगेच्या वाळवंटात?मला सांगीतले असते तर मी ही आलो असतो खेळायला.रडु आवरुन मुक्ता म्हणाली,दादा! खेळायला नव्हते गेले,परवा विनायकबुवांनी सांगीतले होते ना की,आईबाबानी गंगेत समर्पन केले, तर,आईला शोधायला गेले होते,जिथे आपण वाळुचे घर बनवत होतो,तिथे ह्या बांगड्या सांपडल्या.

    वातावरणांतील ताण कमी होण्याच्या दृष्टीने ज्ञानेशाने केविलवाणे हसण्याचा प्रयत्न करतांना बघुन निवृत्तींना वाटले या  हास्यापेक्षा त्याचं रडणं जास्त बरं वाटलं असतं, वातावरण निवळल्यावर,ज्ञानेशाने आणलेला शिधा थोडा थोडा चौघांनी वाटुन खाऊन भरपूर पाणी पिऊन क्षुधा क्षमवली.रात्री चौघेही भावंड झोपली तेव्हा प्रत्येकाला वेगवेगळी स्वप्ने तरळत होती.

            क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  सोपानदेव  !!!

भाग  – ८.

          रात्री झोपल्यावर निवृत्तीनाथ स्वप्नात बघत होते,ते गहिनीनाथांचा हात धरुन अवघ्या त्रिखंडात संचार करीत आहे,ज्ञानेशांना दिसले,ते धर्मसभेत उभे असुन सारी धर्मसभा त्यांना वंदन करीत आहे,सोपानांना दिसले,आपण कांहितरी छान लिहित आहे आणि दोन्ही दादा आपली पाठ थोपटत आहे.आणि छोट्या चिमुकल्या मुक्ताईला दिसले,आपण मोठ्या झालोय,आईच्या बांगड्या हातात घातल्यात.आईबाबांच्या अस्तित्वाने भरुन गेलेली,वेद उपनिषदांच्या उच्चारानं पावन झालेली आणि आईच्या मायेला पोरक्या झालेल्या या जीवांना आधार देणारी ती मोडकी तोडकी वास्तू मात्र तथास्तू तथास्तू म्हणत होती.

        सकाळ उजाडली.निरागस मुक्ता झोपलेली,सोपान घरादारांची स्वच्छता करु लागले.उडालेल्या धुळीने मुक्ताला सटासट शिंका आल्याने उठुन म्हणाली, आई मला किती प्रेमाणे उठवायची.आणि तू ? सोपानच्या चेहर्‍याकडे तिचे लक्ष गेले,काय नव्हते त्या नजरेत?प्रेमळ दटावणी,कठोर बजावणी,अपरंपार माया गहरं दुःख,उदास कणव आणि होती जबाबदारीची जाणीव!मुक्ताई एका क्षणांत सावरली व समंजसपणे बोलुं लागली,अरे दादा!अर्धवट कामं टाकु नये. असे म्हणुन तीने आपली वळकटी व्यवस्थित गुंडाळुन कोपर्‍यात ठेवली.

        निवृत्तीनाथांनी आज गंगेच्या घाटा वर ज्ञानदेवांना गुरुगंडा बांधला.निवृत्ती ज्ञानदेवांच्या मुखातुन उमटलेल्या ओंकाराचा प्रतिध्वनी एका लोकविलक्षण घटनेचे साक्षीदार गंगेच्या लाटा व लोप होत असलेला चंद्र वारा होते.भाऊ भाऊ आणि आतां गुरुशिष्य या अनोख्या नात्यातुन उलगडत जाणारा उद्याचा भविष्यकाळ किती अनुपम व अपूर्व असणार होता.निवृत्तीनाथांनी गुरु म्हणुन ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात ठेवला,तेव्हा ज्ञानदेवांनां आलेली अनुभुती इतकी तीव्र आणि अकल्पित होती की, क्षणभर आपल्याला मुर्च्छा येते की काय असे ज्ञानदेवांना वाटले.त्या हातात इतकी शितलता,संवेदनशीलता होती आणि त्या हातातुन निर्माण होऊन प्रवाहीत होणारी उर्जा ज्ञानदेवांच्या मस्तकात शिरली तेव्हा त्यांच्या शरीराचा रोमरोम थरारला.संपूर्ण ज्ञानाचा प्रवाहच आपल्या नसानसात वाहतो आहे आणि त्या स्पर्शातुन झिरपणारं ज्ञान,माया,वात्सल्य,विश्वास, गुरुत्वाची साक्ष या सगळ्याने ज्ञानदेवांचा अणूरेणू व्यापला आणि त्या चैतन्याच्या वर्षावानं,त्या ज्ञानाच्या अभिव्यक्तीनं,त्या गुरुत्वाच्या अनुभूतीनं अवघे ७-८ वर्षाचे ज्ञानेश्वर विलक्षण थरारले.निवृत्तीसारखे गुरु आणि निवृत्तींना ज्ञानेश्वरांसारखे शिष्य मिळाले.न भूतो न भविष्यती ही एका अलौकिक भविष्याची आधारशीला ठरणार होती.

       या सार्‍या चमत्कारापासुन अनभिज्ञ सोपान मुक्ता या दोघांची प्रतिक्षा करीत, घरांतील जशी जमतील तशी कामे उरकली होती.सोपांनांनी केर काढल्यावर मुक्ताईने अंगणांत सडा घालुन वेडी वाकडी का होईना छोटीशी रांगोळ काढली.दोघेमिळून धडपडत कशीबशी चूल पेटवुन पाणी तापवले.दोघांनी आंघोळी उरकल्या.पण नंतर मात्र मुक्ताई ची गुंतलेल्या केसांची वेणी घालायची पंचायत झाली.मी तुझी वेणी घालतो म्हणणार्‍या सोपानांना तीच्या केसांचा गुंता काढणे अवघड झाले.गुंता काढण्या च्या नादात तिचे केस दुखवल्या जाऊन जास्तच रडायला लागली.आपल्यामुळेच दुखावल्याने ही रडते म्हणुन सोपानही रडायला लागले.त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकुन तिथुन पाण्याला जाणार्‍या कावेरीआक्कांच्या कानी पडला.ही कावेरीआक्का आळंदीला,रुख्मिणीचे वडील सिध्दोपंतांच्या घराजवळ राहत असल्यामुळे दोघींमधे विशेष स्नेह होता. बहिष्कृत केलेल्या या कुटुंबाला कोणत्या नी कोणत्या मार्गाने मदत करीत असे. विठ्ठलपंत आणि रुख्मिणींनी गंगेत आत्म समर्पण केल्याचे कळल्यावर आक्काच्या जीवाची अगदी घालमेल होत होती. या अनाथ,पोरक्या,निष्पाप मुलांना पोटाशी धरुन त्यांचे सांत्वन करावेसे फार वाटत होते,पण विनायकबुवा व त्यांच्या मुलांनी त्यांना अडवले कारण त्यांच्याही कुटुंबा वर बहिष्कार टाकला असतां.तरी त्या येता जाता चाहुल घेत असायच्याच.

                 क्रमशः
संकलन ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  सोपानदेव  !!!

भाग  – ९.

         सोपान,मुक्ताईच्या रडण्याचा आवाज ऐकुन पाण्याला जाणार्‍या कावेरीआक्का मागचा पुढचा विचार न करतां गडबडीने झोपडीत शिरल्या व समोरचे दृष्य पाहुन हसावं की रडावं हेच त्यांना कळेना.सोपानांच्या हातात केस अडकलेली तुटकी फणी,आणि मुक्ताचे मोकळे वेडेवाकडे विंचरलेले केस हे दृष्य पाहुन सारा प्रकार लक्षात आला.आणि मायेचा उमाळा येऊन त्या दोन अश्राप जीवांना पोटाशी धरुन निःशब्दपणे दोघां च्याही पाठीवरुन हात फिरवु लागल्याने दोघांनाही आणखीनच रडायला आले. थोड्यावेळाने मुक्ताने सोपानाची तक्रार केली.कावेरीआक्काने हलक्या हाताने गुंता काढुन मुक्ताची छानशी वेणी घालुन दिली.तेवढ्यात निवृत्ती-ज्ञानदेव आलेत. ज्ञानदेव हात जोडुन आक्कांना म्हणाले, आक्का तुमची माया आम्हाला कळते पण,आईबाबांनी प्रायश्चित घेऊनसुध्दा धर्मसभेने आमच्यावरचा बहीष्कार अजुन काढला नाही.तुमची आमच्या वरची माया धर्मसभेला मान्य झाली नाही तर?त्यांचा रोष होऊन तुम्हालाही शिक्षा झाली तर?दुरुन का होईना तुमचे पाठ बळ गेले तर?निवृत्तींनीही ज्ञानेशांच्या बोलण्याला दुजोरा दिल्यावर आक्का ठामपणे किंचितही चलबिचल न होता म्हणाल्या,चुलीत गेली ती धर्मसभा! ही कसली धर्मसभा?ही तर अधर्मसभा!मी नाही भीक घालत असल्या गोष्टींना.गाठ या कावेरीशी आहे.माझ्याशी पंगा घेतला तर,सगळ्यांच्या घरांतील चुली बंद करेन, मग उपाशीपोटी धर्मसभेत कसले कायदे करतील?

         निवृत्ती-ज्ञानदेवांनी मागुन आणलेली माधुकरी मग आक्काने बाहेर काढुन कोरडा,ओला शिधा वेगवेगळा करुन नीटनेटका भरुन ठेवला.ओला शिधा चार पत्रावळीत नीट वाढुन चौघांना ही जेवायला घातले.मुक्ता लक्षपुर्वक अवलोकन करत होती.यापुढे या मुलांना लागेल ती मदत हरप्रकारे,त्यांची आई नसली तरी मावशी होऊन करायची असा ठाम निश्चय करुन,मुलांना म्हणाल्या, ही कावेरीआक्का सदैव तुमच्या पाठी असेल

धर्मसभा आणि ब्रम्हवृंद काय म्हणतील याची मला पर्वा नाही.त्यांना उत्तर द्यायला मी समर्थ आहे.आणि त्या निघुन गेल्या.आज प्रथमच निवृत्ती-ज्ञानदेव मुक्ताच्या बाबतीत निश्चिंत झालेत.

          जेवणं आटोपल्यावर सोपान, मुक्ताई  वेगवेगळे खेळ खेळु लागले. आणि निवृत्ती,ज्ञानदेव बाहेर गेलेत.उद्या आईबाबांची दशपिंडविधी करायची असं ज्ञानेश्वरांनी म्हटल्यावर,आपण अजुन बहिष्कृत आहोत,शिवाय उपनयन संस्कार झालेले नाहीत.असं असतांना आईबाबांची दशक्रीया करण्याचा अधिकार आपल्याला आहे का?हे धर्म सभेला विचारल्यावर आणि त्यांनी परवानगी दिल्यावरच दशपिंडदान विधी कररतां येईल.

        कोणती धर्मसभा दादा?चार अश्राप बालकांना पोरकं करुन आईवडीलांना देहान्त प्रायश्चित घ्यायला सांगते ती धर्म सभा?ज्यांच्या ज्ञानाला आव्हान नव्हतं असे प्रकांडपंडीत असलेल्या आपल्या वडिलांना,धर्माचं ज्ञान शिकवण्याचं ढोंग करते ती धर्मसभा?अजुनही आपला बहिष्कार चालु ठेवला ती धर्मसभा?की, धर्माच्या नांवाखाली अधर्म करते ती धर्म सभा?सांग दादा कोणती धर्मसभा?आणि या धर्मसभेने दशपिंडीचा अधिकार आपल्याला नाकारला तर त्या दोन पुण्यात्म्यांना तसच तडफडत ठेवायच?धर्मसभेच्या परवानग्या,संमत्या तूं आणत बस.मी उद्या गंगा घाटावर आई बाबांची दशक्रीया करणारच!मला गरज नाही धर्मसभेच्या परवाणगीची.विचाराय चं म्हणजे दगड मारुन माशांचं मोहोळ उठवण्यासारखं होईल.आपण कावेरी आक्कांना विचारुन शिधा जमवुन उद्या दशपिंडी श्राध्द करु!निवृत्तींनाही ज्ञानदेवाचं बोलन पटलं.आवेगाने निवृत्तीने ज्ञानदेव सोपांनांना उरी कवटाळले.ज्ञानदेव म्हणाले,दादा!तुमचा हात मस्तकी व आशिर्वाद असला की, एक दिवस असा येईल की,धर्म म्हणजे काय?धर्माचे कायदे काय?हे यांना माझे कडुन शिकावं लागेल,नव्हे मीच शिकवेन

           आईबाबांचं दशक्रीया विधी करणं सोपं नव्हतं.एकतर माहिती नव्हती कुणी मार्गदर्शक नव्हतं.लागणारं सामान सुमान,शिधा उभं कसं करायच प्रश्न होता

                    क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  सोपानदेव  !!!

भाग – १०.

        आईवडीलांची दशक्रीया विधी करायचे ठरवले पण,अनेक अडचणी समोर आल्या.अखेर कावेरीआक्का धावुन आल्या.त्यांच्या चिरंजीवाने आणि विनायकबुवांनी दिलेला मदतीचा हात पुरेसा होता.दिवसभर दशक्रीया विधी साठी लागणारे सामान,शिधा,पाणं,फुलं गोळा करण्यसाठी निवृत्ती,ज्ञानदेव बाहेर होते.सोपानही कांहीबाही कामं करीत होते.लहानग्या मुक्ताईला कश्याची गडबड आहे हेच कळेना.अखेर तिची जिज्ञासा तिला समजेल अशा भाषेत समजावुन सांगीतली.दशक्रीया विधी व मनाची पण सगळी तयारी होत आली.

        ही अनाथ पोरकी चार भावंड आपल्या आईवडीलांची दशक्रीया विधी करणार ही गोष्ट वनव्यासारखी गांवात पसरली.चर्चेला उधान आले.त्यातही दोन गट पडले.एक मुलांच्या बाजुने व दुसर्‍या गटाचे म्हणणे की,पापी,अधर्मींच्या मुलांना ही क्रीया करण्याचा अधिकार नाही.हे सर्व  या भावंडांच्या कानावरही आले,पण त्यांनी आपला संयम ढळु दिला नाही.

        आणि दिवस उजाडला.विठ्ठलपंतां नी संस्कृत,संस्कृती,शास्रोक्त व अशास्र संस्कारांची ओळख करुन दिलेली होतीच कावेरीआक्का व विनायकबुवासह चारही भावंडे गंगाकाठावर गेलीत.आई वडीलांची अस्थीच नसल्यामुळे ही मुलं दशक्रीया श्राध्दविधी कशी करणार यावर लोकांचे तर्कवितर्क चालु होते.निवृत्ती, ज्ञानदेव विधीची तयारी व मांडामांड करीत होते.सोपानही मदतीला होतेच. मधेच सोपानांनी विचारले,दादा!

“जातस्याहि ध्रुवो मृत्यर्धृवं जन्म मृतस्यच” अर्थात जन्मास आलेल्या व्यक्तीस मरण आणि मृतास जन्म या गोष्टी अटळ असतात असं भगवद् गीता सांगते,मग हा श्राध्द विधी कां करायचा?निवृत्तींनी ज्ञानदेवांकडे सूचक बघितल्यावर, ज्ञानदेवांनी सोपानांच्या खांद्यावर हात ठेवुन म्हणाले,सोपाना! ” श्रध्दया क्रीयते यत् तत् श्राध्दम्” असंही वेदात सांगीतलं आहे.”वासांसि जीर्णानी यथा विहाय नवाति ग्रह्याति नरोsपराणिं तथा।शरीराणि विहाय जीर्णान्यन्याति संयति नवानि देही।” असही भगवद् गीतेत सांगीतले आहे.अर्थात ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्रे टाकुन नवीन वस्रे धारण करतो त्याचप्रमाणे जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करुन नवीन शरीर धारण करतो. सोपाना! मृत्यु अटळ पण सुंदर आहे. सोपाना! मनुष्य मृत्यु पावल्यावर त्याचं शरीर नष्ट होते,पण आपलं त्या व्यक्ती बद्दलचं प्रेम,आदर,स्नेह या भावना तर नष्ट होत नाही ना?ह्या भावनाच त्यांची स्मृती चिरंतर ठेवण्यासाठी श्राध्दविधी करुन त्यांना अन्नोदक देऊन त्यांच्या विषयीच्या ह्याच भावना त्यांच्या निर्वाणा नंतरही ह्रदयात कायम आहे असे त्यांना आश्वासक वचन देतो.आणि याचसाठी हा श्राध्दविधी करायचा असतो.

        विनायकबुवांच्या मार्गदर्शनाखाली साधन सामग्रीची शास्रशुध्द मांडामांड करायला निवृत्ती-ज्ञानदेवानी सुरुवात केली.तिघेही भाऊ गंभीर होते.त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.स्वतः सावरुन निवृत्ती दोघा भावांना म्हणाले, आईबाबांचे पार्थीव सांपडली नसल्यामुळे आपण पलाशविधीने श्राध्द करणार आहोत.पण दादा!ब्राम्हण आणि किरवंत  मिळाले नाही तर? निवृत्ती म्हणाले,तर आपण वेदांतात सांगीतल्या प्रमाणे चट श्राध्द विधी करुं.पिंडदान करुन काक स्पर्श करुन घेऊ आणि आईबाबांच्या आत्म्यांना आव्हान करुन हविर्भाग गंगेत अर्पण करु.

        सर्व श्राध्दविधी आटोपल्यावर झाडावर बरेचसे कावळे गोळा झाले होते पण ते पिंढाला स्पर्श करीत नव्हते. विनायकबुवा म्हणाले,पोरांनो! तुमच्या आईबाबांची कोणती तरी इच्छा अपुरी राहिली असावी.निवृत्ती पुढे होणार तोच, दादा थांबा! थांबा!आईबाबांना काय सांगायचे ते मी सांगतो असे म्हणुन ज्ञानदेव पुढे झाले.सोपानही त्यांच्या बाजुला जाऊन उभे राहिले.ज्ञानेश्वरांनी चित्त एकाग्र करुन,डोळ्यात अवघी उर्जा एकवटली.आणि दिसली लहरणारी दोन विरळ शरीरं,त्यांच्या आईबाबांचे!चौघाही भावंडांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवले आणि ज्ञानेश्वरांनी बोलायला सुरुवात केली.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.DD

 संत सोपानदेव चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading