द्रोण पत्नी गौतमी संपुर्ण भाग ५, (२१ ते २४)

कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा ............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! द्रोण पत्नी गौतमी !!!

!!!  गौतमी  !!

                   भाग – २१.

       द्रोणांच्या विनाशासाठी द्रुपदाला यज्ञपुत्र झाल्याचे कळल्यावर गौतमी आर्तपणे म्हणाली,माझे अहेवपणी तुमच्या हाताने अग्नि द्यावा.जे अशक्य आहे अशी तुझी इच्छा कशी पुर्ण करु?ती म्हणाली,अजुनही वेळ गेली नाही, अर्जुनाला जर सांगीतले तर, द्रुपद व त्याच्या पुत्राला आपल्या समोर हजर करु शकेल.गौतमी! आतां फार उशीरं झाला. वेळीच द्रुपदचा यज्ञ उधळुन लावला असतां तर,अग्निपुत्र द्युष्टद्युम्न माझ्या संहारासाठी जन्मलाच नसतां.माझा विनाश अटळ आहे.कोणाच्याच हाती कांहीच नाही.मग मलाच माझा शेवट करावा लागेल.गौतमी! स्वतःसाठी नाही पण अश्वत्थामासाठी जगावेच लागेल.मन गलबलले,परत अगतिकतेची तिला जाणीव झाली.अग! उद्या येणार्‍या दुःखा साठी आजचे सुख कशाला गमवायचय!

           एके दिवशी द्युष्टद्युम्नासह द्रुपद द्रोणांकडे येऊन म्हणाला,याला सर्व प्रकारची विद्या देऊन समर्थ करावे.आणि द्रोणांनी जबाबदारी स्विकारल्यावर गौतमी पेटुन उठली.पण रुढी परंपरांच्या मर्यादेने बांधलेली एक अगतिक आर्य स्री निमुटपणे सहन करणे भाग होते.मनांत म्हणाली केवढी ही क्रूर थट्टा? ज्याच्या हाताने वध होणार त्यालाच सर्वप्रकारच्या विद्या शिकवुन बलवान बनवायचे,एवढेच नव्हे तर त्याला मायेने सांभाळण्याची जबाबदारी तिला पार पाडायचीय,यामुळे तिच्या अंतःकरणात होणार्‍या कोलाहला ची कल्पनाच करवत नाही,पण तिच्या सारख्या कर्मठ,पती परायण स्री कडुन पती आज्ञा उलंघण होणे शक्यच नव्हते. तोंड दाबुन बुक्याचा मार सहन करणेच तिच्या नशीबी यावे,यासारखे दुर्देव ते कोणते?प्रत्यक्ष सौभाग्य हिरावुन घेण्याच्या इच्छेने जन्मास आलेल्या द्युष्टद्युम्नला पती आज्ञेने स्वपुत्राप्रमाणे वागवावे लागणार आहे.

          एक दिवस वार्ता आली की,द्रुपद कन्या याज्ञसेनेचा मांडलेल्या स्वयंवरांत अर्जुनाने पण जिंकुन याज्ञसेना पांच पांडवांची पत्नी झाली. कौरवांतर्फे हा “पण” कर्ण जिंकणारच होता पण “सूतपुत्राला वरणार नाही अशी निर्भत्सना याज्ञसेनेने केल्यामुळे कौरवांना हात हलवत परतावे लागले.द्रोणशिष्य म्हणुन अर्जुन श्रेष्ठ धनुर्धन ठरल्याने द्रोणांचा आचार्य म्हणुन लौकिक वाढला खरा,पण आता प्रिय शिष्य गमावुन बसलेत.द्रुपदां चा नवा डाव यशस्वी झाला. द्रुपदांनी सापळा रचुन मार्ग निष्कंटक केला. द्युष्टद्युम्न द्रोणांवर चालुन आलाच तर,वाट अडवुन अर्जुन उभा राहील म्हणजेच आज ना उद्या द्रोणांचा मृत्यु…..

     या विचारानेच गौतमी घाबरी झाली. सर्वांग घामाघुम झाले.द्रोणांना म्हणाली, अहो!खरा विजय अर्जुनाचा नसुन द्रुपदां चा झाला.तुमच्या संहाराचा मार्ग त्याने मोकळा करुन घेतला.आपल्या प्रिय अर्जुनाला याज्ञसेना अर्पुन हिरावुन घेतले. अगतिकतेने भरल्या नेत्रांनी गौतमी त्यांच्याकडे पाहत राहिली.

         गौतमी! द्युष्टद्युम्न जन्माला आला तेव्हाच या द्रोणांचा मृत्यु निश्चित झाला. यात प्रत्यक्ष ब्रम्हदेवही बदल करुं शकत नाही.द्रोण निघुन गेलेत,आणि गौतमी एकटी राहिली.या आश्रमाचे स्वामी द्रोण, पुत्र अश्वत्थामा दुरावलेत.गौतमी फक्त एकटी….एकटी…..स्री ही पुरुषाच्या हातातले खेळणं असते.पुरुषाने पराक्रमा ने लौकिक साधावा आणि थकल्या शरीरांत नवा जोम,उत्साह निर्माण करण्यासाठी स्रीने त्याची शय्यासोबत करायची.सर्वस्व अर्पण करायच…बस! हेच कां स्री जीवनाचं लक्ष्य?सीता,गांधारी मंदोदरी यांच्या नशीबी तरी वेगळं काय आलं?एवढच कशाला,याज्ञसेना द्रौपदी लाही पांच पांडवांची पत्नी बनावं लागले.प्रत्यक्ष अग्निदेवतेच्या कन्येला! शीः शीः म्हणजे एका निष्पाप,दुर्बल स्री वर सामुदायिक बलात्कारच ना? शुध्द व्यभिचारच ना?

                क्रमशः
  संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  गौतमी  !!!

                      भाग – २२.

          पांडवही पुरुषच ना? सारे पुरुष इथुन तिथुन सारखेच!गौतमी विव्हल होत स्वगत म्हणाली,आपलीही कांही अंशी अशीच अवस्था नाही का?ज्याचा पती म्हणुन स्विकार केला तोच आज लौकि काच्या अधिन होऊन सौभाग्यावर उठला  अहेव लेणं निर्दयतेने हिरावुन घेणार्‍या च्यातच बळ भरलं!दृपदासारख्या दुष्ट प्रवृ तींना खतपाणी घातलें,गौतमी नुसती आक्रंदत,रडत होती.दुसरे काय होते हाती वास्तविक स्रीचा खराखुरा समर्थ एकमेव आधार तिचा पतीच! देवाब्राम्हणाच्या साक्षीने तिच्या भवितव्याची जबाबदारी आपल्या माथ्यावर घेतलेली,ज्या द्रोणा चार्यांनी कौरव पांडवादी वीरांचं भवितव्य घडविलं तेच द्रोण पत्निच्या जिवनरथाचं सारथ्य करायला कमी पडले,दुबळे ठरले

         स्रीने पतीबद्दल अनुद्गार काढणे म्हणजे,तिच्या पातीव्रत्य धर्माला कलंक, मानमर्यादा,नीतीमुल्यांना मूठमाती दिल्या चा,कर्तव्यापासुन वंचित झाल्याचा दोष तिच्या माथी येतो.हे सर्व नियमधर्म,स्वार्थी आणि स्वतःचा पराक्रम सिध्द करण्या साठी पुरुषजातीने सुरुक्षित ठेवल्याचेच दिसते.अशाच मनःस्थितीत असतांना जिवनाचे तत्वज्ञान जाणणार्‍या अश्वत्था माला गौतमी विचारते,अश्वत्थामा! समोर ठाकलेला कौरव पांडवांच्या रुपाने उभा असलेला विध्वंश टाळतां येणार नाही का?पांडवांना सत्तेचा मोह कधीच नव्हता.कौरवांशी ते नेहमीच सांमज्यस्या ने वागले,त्यांचा कांहीही अपराध नसतां ना त्यांच्या जिवनाची जी ससेहोलपट झाली,भरसभेत द्रौपदी विटंबली गेली, व्यर्थ वनवास भोगावा लागला,कशासाठी नियती त्यांच्याशी अशी वागली?आजही वागत आहे.कां?…. कां?….अश्वत्थामा  म्हणाला,हा त्यांचा भोग होता.आणि माझं काय? मी जे भोग भोगले,काय चुकलं माझं?चंदनासारखी झिजले,दारिद्र्य, उपहास,उपासमारी,यामुळे आलेलं अकाली वार्धक्य,जे आणि जेवढं मिळालं  त्यावरच पोट,मन मारुन तृप्ती दाखवत हसुं ओठांवर ठेवले.केवळ तुझ्या पित्या च्या समाधानीसाठीच ना?असं असुनही, मी काय भोगते आहे?उद्या येणार्‍या वैध व्याला नियती नाही तर,तुझे पिता जबाब दार आहेत आणि तू…. अश्वत्थामा!तुही पुरुषच ना? तुम्हा पुरुषांना चुकीचे आकलन कधीच होत नाही.माता,भगिनी, पत्नी म्हणुन येणार्‍या स्रीला तुमच्या दृष्टी ने मोलच नसावं? स्वतःचं कर्तृत्व,पराक्रम लौकिक,प्रतिशोध,प्रतिष्ठा,सन्मान,मान मान्यता या सगळ्यांपुढे तुमच्या दृष्टीने स्री ही नगण्यच ना?तस नसतं तर, द्रौपदी पांच पुरुषांची पत्नी बनलीच नसती. आचार्य द्रोणपत्नी गौतमी इतकं लाजीर वाणं जिणं जगत राहिलीच नसती.प्रत्यक्ष तिचा पुत्र अश्वत्थामानही तिला असं दुरत्व दिलचं नसतं.अरे! काय अपराध होता माझा?तुझ्या पित्याच्या अमृत वृत्तीमुळे तुझ्यासारख्या कोवळ्या जिवाचे अपरिमित होत असलेल्या हालाने जीव तडफडत,तळमत होता.एका दुर्देवी मातेचे,या असहाय्य गौतमीचे अमृतघट रितेच होते.स्वपुत्राला दुधाचे दोन थेंब पाजु शकत नसल्यामुळे तिच्या ह्रदयाला काय यातना झाल्या असतील?आणि आज तिचाच पुत्र दुरावल्याच्या जाणीवेने काय अवस्था असेल? खरच एकटी आहे रेss  एकटी….पती हयात असुनही दुरावलेले, पुत्र असुनही निपुप्रकासारखं लाचार जीणं जगणारी…जी पती पुत्राच्या विरहा त जळणारी भविष्याबद्दल पुर्णतः उदासिन आहे रे ही गौतमी…. पुत्रा! खुप एकटं एकटं वाटतय रेsss हा आश्रम,हा परिसर,पर्णकुटी सारंसारं परकं झाल्या सारखं वाटतय रे…कुणीच नाही असं वाटु लागलय…तिचा जिवनभराचा आक्रोश अशा प्रकारे पुत्रासमोर व्यक्त होत होता…

                  क्रमशः
  संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  गौतमी  !!!

                    भाग – २३.   

           इतक्या दिवसांचा दबुन असलेला

उद्रेक,लाव्हा प्रपतासारखा(धबधबा) उफाळुन बाहेर पडत होता गौतमीच्या मुखावाटे अश्वत्थामा समोर… आणि अश्वत्थामा….निस्तब्ध…शेवटी तो म्हणाला,माते! व्यर्थ शोक करुं नकोस!हा अश्वत्थामा तुझाच आहे आणि तुझाच राहील.माते! कौरवपक्ष असत्मार्गी आहे हे माहित असुमनही,द्रुपदराजा कौरव पांडवांना नेस्तनाबुत करण्याचा क्षण शोधत आहे,तरी सुध्दा हा अश्वत्थामा वचनबध्द असल्यामुळे, कौरवांना यश नाही हे ठाऊक असुनही,याच  मार्गाने जाण्याशिवाय अन्य पर्यायच नाही.माते! असत्मार्गाने जाणारा कधीच यशस्वी होत नाही म्हणुनच तुला आशिर्वाद न मागतां फक्त अनुमती मागतोय! माझ्याबद्दलचा गैरसमज काढुन टाक माते!

          माते! स्री मग ती कोणत्याही रुपात असो,ती माझ्यासाठी पुज्यनीय, वंदनीयच आहे.माते! तुझ्या त्यागाची, सहनशीलतेची,निरिच्छ वृतींची नोंद या अश्वत्थामाच्या मनांत आहे.पुरुषाच्या परा क्रमाची प्रेरणा,मग ती स्री माता!भगिनी, भार्या कोणत्याही रुपात असली तरी सर्वार्थानं स्रीशक्तीतच असते.वत्सा! स्री स्वतःचा विचार कधीच करीत नाही.तिचा स्वभावधर्मच नाही.पित्या,बंधु,पतीसाठी कणाकणाने झिजण्यांतच धन्यता,सार्थक मानते.प्रसंगी प्राणाहुती देण्यासही कचरत नाही.जेव्हा पती,पुत्र,बंधु संकटां

त असल्याची जाणीव होते,त्यावेळी तिच्या अस्वस्थतेला परिसीमाच उरत नाही.आणि तुम्ही पुरुष सर्व जबाबदारी नियतीच्या माथी मारुन आपलं निर्दोषत्व सिध्द करुं पाहतां!मक्तेदार पुरुष स्रीला कधीच समजुन घेत नाही.ती एक वस्तुच राहणार… अन्न,वस्र,निवारा यांच्या मोबद ल्यात विकली जाणार… आजच नाही तर

अनंत काळापर्यंत….

        अश्वत्थामा! सारे तुला तत्ववेत्ता समजतात.पण हे तत्वज्ञान,पराक्रम स्रीच्या कुशीतुनच जन्माला येते ना?तीच

वाढवते,पोसते,प्रगल्भ बनवते,पण तुम्ही पुरुष मोल समजत नाही,स्विकारत नाही, हेच दुःख आम्हा स्रीयांना होतय…दुःख… जन्मापासुन मृत्युपर्यंत सारं सहन करतच अंती या दुःखालाच मिठी घालुन मृत्युला कवटाळते.जा अश्वत्थामा जा!फक्त एकच सांगायचय..स्रीकडे एक वस्तु म्हणुन पाहणं सोडुन द्या… अन्यथा एक दिवस असा येईल की, तुम्ही पुरुषच वस्तु बनाल आणि स्री तुम्हाला अन्न वस्र देऊन खरेदी करेल,आणि त्याचवेळी स्रीजीवन किती असहाय्य अगतिक आहे ही जाणीव पुरुष जातीला होईल.अश्वत्थामा निघुन गेला.

           गौतमी विमनस्क बसली असतां चिंताग्रस्त चेहेर्‍याने कृपाचार्य आले. आणि म्हणाले!युध्दाचा निर्णय पक्का झाला.नियतीने ठरविल्या प्रमाणेच घडणार!गौतमी वेड्यासारखी मोठ्याने हसली. अरे!कृपा! तुला आचार्यपद प्राप्त झालं म्हणजे,सारच तत्वज्ञान समजलं असा गैरसमज तर नाही ना?आज सत्य तुझ्यासमोर मांडण्याचा निर्धार केला,नंतर संधी मिळेल न मिळेल!एक सांग कृपा! कृपाचार्याची बहिण द्रोणाचार्याची पत्नि बनली,याला तूं ऋणानुबंधच म्हणशील!

        मग द्रोणाचार्यांची अमृतवृत्तीमुळे गौतमीची झालेली परवड,द्रुपद-द्रोण बालमित्र,द्रुपदाने केलेला अपमान,द्रोण संहारार्थ द्रुपदाने केलेल्या यज्ञातुन झालली पुत्रप्राप्ती,द्रोणाचार्यापासुन अर्जुनाला हिरावुन घेण्यासाठी द्रुपदाने मांडलेले स्वयंवर,द्रोणांनी प्रत्यक्ष आपल्या मृत्यु द्युष्टद्युम्नला दिलेले शिक्षण कर्णाचा उपमर्द,लाक्षागृहातील कौरवांचं कपट कारस्थान,द्रौपदीला स्विकारावे लागलेले पांच पती,आणि उद्या होऊ घातलेले कौरव-पांडवांचे युध्द हे सर्व नियतीच घडवित आहे असचं म्हणायचय ना? युगानुयुगे अशीच कारणे सांगुन स्रियांची तोंड बंद केलीत आणि स्रीनं सहनशीलतेने,रुढीपरंपरांच्या बंधनांत अडकुन सहन करीत राहीली.पण सहन शीलतेलाही मर्यादा असतेच,एक दिवस ती हे सारं झुगारुन या मर्यादा मोडुन टाकील.

                   क्रमशः
  संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  गौतमी  !!!

                 अंतिम भाग – २६.

         अश्वत्थामा निघुन गेल्यावर थोड्याच वेळांत गौतमीसमोर द्रोण आलेत, म्हणाले, गौतमी! इतक्या लवकर  असा शेवटचा निरोप घेण्याचा प्रसंग येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.गौतमी म्हणाली,मला कांही आश्चर्य वाटत नाही. कांटे पेरले तर कांटेच उगवतात,आम्रफल नाही.कुमारवयापासुनच कौरव पांडवां च्या मनांत द्वेषाचे,शत्रुत्वाची बीजरोपन करण्यांत येत होती.मानवता विसरुन बालमित्राच्या दारिद्र्याचा उपहास करणार्‍या द्रुपदाकडुन चांगल्याची अपेक्षा करणे म्हणजेच सापाला दुध पाजण्यासारखेच होते हे मी जाणुन होते. गौतमी अंत्यसमयी गतायुष्य व्यर्थ कां समोर ठेवतेस? केवळ नाईलाजाने…गत आयुष्याने बोचणं टोचणं याशिवाय अन्य कांहीच दिले नाही,सुखाचा स्पर्शही नाही.  प्रथमच द्रोणाचार्यांना सावतःच्या वागण्या  चा पश्चाताप झालेला तिला दिसला. प्राजळपणे त्यांनी कबुली दिली.आयुष्य भर तिला झालेल्या यातनांची,होरपळीची जाणीव झाली.गौतमी! मी प्रवाहाविरुध्द जाऊन नेहमी वेदांना कुरवाळत राहिलो आणि शेवटच्या क्षणी अपयशी ठरलो. गौतमी! मला अपयशाचं दुःख नाही,दुःख आहे ते,माझ्यामुळे तुझं सर्व आयुष्य वाया गेलं,सगळी सुखस्वप्ने धुळीस मिळाली.एक सुंदर जीवन उध्वस्त झालं. एका सुंदर स्वप्नाला दुष्ट लावण्याचं महद् पाप घडलं,अपराध मी केला,आणि प्रायश्चित्त मात्र सदैव तुला भोगावं लागलं, तेही डोळ्यात अश्रु न दिसुं देतां,ओठावर चं हसु कोमेजु न देता!मी पेरलेल्या काट्यांतुन असंख्य काटे जन्माला आले आणि त्या काट्यांनीच नेमक्या तुझ्याच भावभावनांना रक्तबंबाळ केलय…

         गौतमी!माझी चुक उमगली,पण फार उशीर झाला.आज या क्षणी अशा जागेवर आलो की, इच्छा असुनही मागे परतण्याचा मार्ग बंद झाला…पुढेच जायला हवय….तेही मृत्युकडे… गौतमी! तुम्ही बायका असह्य झालं की,अश्रुद्वारे आपलं दुःख हलकं करुं शकतां,पण पुरुषांना तेही शक्य नाही. गौतमी अखेर च्या क्षणी एकच सांगतो,जर पुनर्जन्म हे सत्य असेल तर,परमेश्वराकडे तुझीच मागणी करुन या जन्मी तुझ्यावर झालेला अन्यायाचे परिमार्जन करुन,सारं जिवन तुझ्याचसाठी खर्च करेन.गौतमी शेवटचा एकच त्याग कर,सुहास्य मुद्रेने मला निरोप दे! झटकन पुढे होऊन त्यांनी गौतमीला कवेत घेतले.द्रोणाचार्य निघुन गेलेत नी गौतमी एकटी झाली.सारा आश्रम खायला उठला….

        निश्चय केल्यानुसार गौतमीने अन्नपाणी वर्ज्य केले.युध्दभूमीवरच्या रोजच्या घडामोडी विशद करण्याची आश्रमकुमारांना आग्रह केला.रोज समग्र अहवाल कानांवर येत होता.दिवसांमागुन दिवस जात होते,पण जी बातमी ऐकाय ला तिचे कान उत्सुक होते,तीच वार्ता अजुन येत नव्हती.तेवढ्यासाठीच तर इच्छाशक्तीच्या जोरावर तिने प्राण शरीरांत धरुन ठेवला होता,राहु दिला होता.अन्यथा प्राणाचा मोह केव्हाच नव्हता. सत्-असत् मधला संघर्ष न्याय अन्यायातील युध्दाचा विजय हा सत्य बाजुचाच असेल आणि म्हणुनच श्रीकृष्णानी सत्य बाजुचंच सारथ्य पत्करलं आणि कौरवांचा शेवट ठरलेला आहे.पापाला पाठीशी घालणाराही पापीच ठरतो.मग तो तरी सुरक्षित कसा राहिल?

         साराच दोष द्रोणाचार्यांना देणे संयु क्तिक नाही.नियतीही तेवढीच जबाबदार आहे. नियतीनेच स्रीजन्माला घालणे, लौकिका मागे लागलेल्या पुरुषाबरोबर विवाह होणे,हयातभर ओठ बंद ठेवुन अन्याय सहन करणे,याचीच परिणती संपुर्ण आयुष्य दुःखात गेलं,गौतमी स्वतःशीच पुटपुटली…कर्तव्यपालना साठी समर्पिता बनुन यातना,कष्ट,दुःख, अपमान,अपेक्षाभंग वाट्याला आला, याला कांही अंशी ती स्वतःही जबाबदार आहेच…. पण…पण…. अंत्यसमयी एकच अवेही जाण्याची इच्छा आणि द्रुपदसंहाराची बातमी कानावर पडल्या शिवाय…..

      आतां गौतमीची विचारशक्तीही संपली, सर्व अंग थंड थंडच पडत चाललय… घसा संपुर्ण सुकला… स्वतः चा हात उचलेनेही अशक्य….नजरेसमोर गडद अंधःकार…सारं चैतन्य संपलेलं… यमदूत समोर आलेला दिसल्यावर महत् प्रयासाने विव्हल व क्षीण स्वरांत प्रार्थना करीत म्हणाली, यमदूता,यमदेवता…फक्त  कांही काळ…द्रुपदाच्या वधाची बातमी मिळाली की…… तेवढ्यात एका आश्रम कुमाराने येऊन बातमी दिली….आचार्य द्रोणांनी द्रुपदाच्या तिनही पुत्रांचा वध करुन द्रुपदालाही यमसदनास धाडले. माते! आचार्य जिंकलेत. ते कुशल आहेत बस… तिचे कान तृप्त झाले…नी त्याचवेळी यमदूताने तिच्या गळ्यात पाश आवळला….पाश घट्ट झाला.

अशा या अज्ञात असलेल्या, आचार्यपद विभुषित द्रोणपत्नीची शोकांतिका तिच्याच बरोबर संपली.संपले एक पर्व! अशा या जन्मापासुन दुर्देवी,ऊपेक्षित, द्रोणपत्नीला कोटी कोटी प्रणाम!

                        !! समाप्त !!
  संकलन – मिनाक्षी देशमुख.

द्रोण पत्नी गौतमी संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading