
कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! द्रोण पत्नी गौतमी!!!
!!! गौतमी !!!
भाग – १६.
द्रोण बोलतच होते…. गौतमी… गौतमी हे थांबायलाच हवय!हा ऊपहास संपायला हवाय!हे दारिद्र्य,नित्याची उपासमार,इतकी निर्घुण, हीन,कठोर चेष्टा बंद व्हायलाच हवय!बालवयातच या द्रोणने कठीण आग्नेयास्र,परशुरामांकडुन ब्रम्हास्र साध्य केलं.मग द्रव्य मिळवणे तर सहजशक्य आहे.ठरल….ठरल….
पांचालाधिपती दृपदराजा हा द्रोणा चा बालसखा!हा द्रुपद द्रोणांच्या पित्या कडेच ज्ञानार्जनासाठी होता.पित्यांच्या मृत्युनंतर हा आश्रम अग्निवेष ऋषींच्या सुपुर्द केला.प्रदीर्घ काळ द्रुपद व द्रोण बंधु पेक्षाही जवळकीने मित्र होते.द्रुपदने वचन दिले होते,त्यानुसार द्रोणांनी त्याच्याकडे जाण्याचा निश्चय केला.गौतमीने शंका काढलीच.त्यावेळचा द्रुपद,आज पांचालधिपती झालेत.सत्ता,अधिकार, वैभवाने माणसात बदल होऊन पुर्वीची आठवण विसरतात.द्रोण म्हणाले,द्रुपद च्या बाबतीत अशक्य आहे.त्याने निष्पाप वयात वचन देत म्हणाला होता,पांचाल कुलाचा जेष्ठ पुत्र असल्यामुळे राज्यचे ऊत्तरदायित्व माझेकडेच येईल.द्रोण! कधी काळी जर तुझ्यावर वाईट प्रसंग आलाच तर अर्धे राज्यही तुला देईन!
गौतमी म्हणाली पण! अमृतवृत्तीचं काय?द्रोण म्हणाले, परशुरामांनी मला ही वृत्ती सोडण्यासंबंधी बरेच समजावले होते,पुर्ण विचारांती अमृतवृत्ती गंगार्पणमस्तु करुन आपण तिघेही पांचालनगरीकडे प्रस्थान करणार आहोत.गौतमीने त्यांना परावृत्त करण्या चा समजावण्याचा बराच प्रयत्न केला पण द्रोण आपल्या निश्चयावर ठाम होते.
अश्वत्थामा मनांत रंगवलेले स्वप्नां बद्दल विचारुन द्रोणांना विचारुन हैराण केल्यावर ते म्हणाले,पुत्रा!द्रुपदकाकाकडे गेलो की, आपल्या सर्व समस्या संपुन दारिद्र्य नाहीसे होईल.निर्धन म्हणुन कोणी हिनवणार नाही.परत एकदा विचार करावा म्हणुन द्रोणांना सांगीतल्या वर ते म्हणाले,आतापर्यंत लोकांनी निर्धन म्हणुन उपहास केला,आतां भेकड म्हणवु न घ्यायचे नाहीय!गौतमीच्या द्विधा मनः स्थितीत असंख्य प्रश्न आ वासुन उभे राहिलेत.द्रुपद कसं करतील स्वागत?जागेल कां मैत्रिला? अनेक विचारांत रात्र संपली.सकाळी जाण्याच्या तयारीला लागली गौतमी……
अखेर गौतमीची आशंकाच खरी ठरली.पांचालदेशी द्रुपदराजाकडे गेल्या वर द्रोणाचार्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला.द्रुपदने भर सभेत दरिद्री ब्राम्हण म्हणुन उपहास,अपमान,मित्रद्रोह केला. आमसभेत उच्चारलेले शब्द…. शब्द नव्हतेच.तिक्ष्ण तीर होते ते,थेट ह्रदयात घुसुन छिन्नविछिन्न करुन टाकले.तिथुन निघतांना द्रोणांनी प्रतिज्ञा केली की, “ज्या सत्तेच्या जोरावर या निर्धन द्रोणाला ठोकरलस,तीच सत्ता तुझ्या हातुन जाऊन तु माझ्यासमोर लाचार बनुन उभा राहशील.”वास्तविक द्रुपदाने द्रोणाचार्यां सारख्या कुशल योध्यास डिवचुन स्वनाशास आमंंत्रणच दिले,द्रुपद जरी मैत्रीला जागला नाही,तरी द्रोणाने ह्रदयात जतन करुन ठेवलेल्या मैत्रीला मुठमाती दिली नाही,पण भितीपोटी तो माझ्या नाशास कारक झाल्याशिवाय राहणार नाही.मृत्युचे भय नाही,पण त्यांच्या मृत्यु मुळे अधर्म फोफावेल,ते घडु नये म्हणुन अश्वत्थामा सबल होईपर्यत कृपाचार्या कडे अज्ञातवासात राहण्याचा द्रोणांनी निर्णय घेतला.आणि गौतमीच्या मनांत द्वंद सुरु झाले.
कोणत्या स्वाभीमानी विवाहित स्रीला माहेरच्या आश्रयाला येऊन राहायला आवडेल?स्वगत म्हणाली,तुला कृपी नांवाचा उबग आला होता ना? गौतमी बनुन हस्तिनापुर सोडलेस ना?माहेरी राहण्यास गौतमीने बराच विरोध केला.अन्यत्र जाऊन भीक मागायची तयारी ठेवली,पण द्रोण पुरुषच ना?पुरुषाच्या दृष्टीने स्री नगण्यच!शुल्लक खेळणं! खेळावायच आणि समाधान नाही झालं की,भिरकावुन द्यायचं हा निसर्ग नियमच!
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! गौतमी !!!
भाग – १७.
गौतमी उद्वेगपुर्ण स्वतःशीच विचार करुं लागली,स्री ही फक्त पुरुषाच्या उपभोगाचं साधनच कां समजतात?त्यांनी घातलेली बंधने झुगारुन स्वतंत्रपणे वागण्यास फार मोठे साहस,धाडस केल्याशिवाय पुरुषांनी ऊभारलेले अडथळे पार केल्याच जाऊं शकणार नाही.साहस जर असते तर, ज्या हस्तिना पुराने तिचे “कृपी” नामाभिधान केलं त्या शहराचे परत तोंडही बघायचं नाही मनाने केलेला निर्धार मोडुन इथे आलोच नसतो. पण! पती आज्ञा ना?असच अगतिक, असहाय्य निमुटपणे,बिनातक्रार मुखातुन उणा शब्दही न काढतां अखेरपर्यत जगावं लागणार!मन आक्रदंत होत,आक्रोश करीत होतं.
संध्यासमयी गौतमी कुटीत एकटी च होती,त्याचवेळी कृपा आले.त्यांना पाहुन तिचा धरबंध सुटला.वेड्यासारखी धावत त्याच्या कुशीत शिरुन ओक्सी बोक्सी रडुन त्याचा खांदा अश्रुत भिजवु लागली.ते तिच्या पाठीवरुन हात फिरवित असल्याने तिचा दुःखावेग आणखीनच वाढला.ते म्हणाले,कृपी! जेव्हा अश्वत्थामाच्या नामकरण विधीला आलो होतो व तुझा अस्थीपंजर देह पाहिला तेव्हाच तुझी सत्य स्थिती उमगली होती. तूं जेवढे सहन केलेस,तेवढे अन्य कोणती ही स्री सहन करु शकली नसती.कृपी सहनशीलता,त्यागातच स्रीचे जिवन समा वलेलं असते.आणि या गुणांवरच पुरुषां च्या पराक्रमांचा वृक्ष उभा राहतो.
गौतमी म्हणाली,कृपा!स्री ही नुसती स्रीच नसते.ती कुणाची तरी माता ही असते.पत्नी म्हणुन स्वतःचे मन मारले उपवास सहन करुन फक्त गंगाजलावर क्षुधा भागवली,असहाय्य जीणं भोगलं, पण निषेधाची अस्पष्ट रेषाही कधी चेहर्यावर उमटुं दिली नाही. कोण होतं माझं? एकटीच होते ना? अकालीच तारुण्य ओसरुन,शरीर काष्ठासारखं शुष्क बनलं,मुखावरचं तेज,शरीरावरची कांती निखळली तरी ओठांवरचं हसुं कधी मावळु दिलं नाही.पण मातृत्व प्राप्त झाल्यावर त्याची क्षुधा भागवु न शकल्या ने,त्याला दुध पाजु न शकल्याने स्वतःचा च धिक्कार, तिरस्कार वाटु लागला,स्वतः लाच विचारले, जर अपत्याची क्षुधा शमवु शकत नव्हती तर,त्याला जन्माला घाल ण्याचा काय अधिकार होता?कृपा! तूं पुरुष आहेस.स्रीच्या भावना कधीच समजुं शकणार नाहीस….
स्वपुत्राला धड दुधाची ओळखही नाही,मग अमृतवृत्तीने मिळालेला लौकिक प्रतिष्ठा काय कामाची?तेही बहुमुल्य अग्नेयास्र,ब्रम्हास्र जवळ असतांना….हा षंढपणाच नाही का?अरे! द्रुपदाच्या आमसभेत ह्यांच्या झालेल्या अपमानाने मी स्री असुनही पेटुन उठले, जर का त्यावेळी शस्स्रनिपुन असते तर… आणि हे मात्र शांतपणे सारं ऐकत होते. कुठलाही पुरुष पत्निसमोर,स्वपुत्रासमोर स्वतःच्या अस्मीतेला धक्का लागला तर, स्वाभीमानाने चवताळुन,पेटुन उठतो,पण कृपा! दुर्देवाने इथं असं कांहीच घडलं नाही.केवढा हा दुर्विलास?
कृपा! स्वाभीमानी स्री माहेरपणाला २-४ दिवसांसाठी येते,पण…कृपा म्हणाले,अग!द्रोण एक रत्न आहे.परिस्थी तीच्या भोवर्यांत सांपडल्याने आज जरी त्यांच तेज कांहीसं कमी झालं असलं तरी,एक दिवस असा येईल की,त्यांच महत्व पटेल तुला,थोडा धीर धर!आणि तो निघुन गेला.त्याच्या पाठमोर्या अकृती कडे पाहत,पुटपुटली,धीर धरणारच आहे, पण तो माझ्यासाठी नसुन फक्त नी फक्त अश्वत्थामासाठी!परिस्थीतीने माझ्यात ल्या सार्या आशा आकांशाची होळी झाली.जगण्याची आशाच मेली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! गौतमी !!!
भाग – १८.
हस्तिनापुरला आल्यापासुन कांहीच कामधंदा नसल्यामुळे द्रोण कांहीसे अस्वस्थ होते.दिवसभर रानोमाळ वणवण भटकायच,उपासाची संवय असल्यामुळे केव्हाही,कुठेही तासन् तास बसुन रहायचं,मग त्यांना शोधत गौतमी रस्ता नी रस्ता पालथा घालायची.द्रोण कधी एखाद्या झाडाखाली किंवा नदीकिनारी गहन विचारांत गढून स्वतःच्याच विचारात
हरवुन बसलेले आढळत.दोन प्रहरची उन शरीराला भाजत आहे याचीही त्यांना भ्रांत नसायची.तास न तास अध्यापनाचं कार्य करणारा हा माणुस अबोल बनले होते.कदाचित स्वतःकडुन झालेल्या प्रमादाची खंत त्यांना खात असावी. त्यांच्या अश्या परिस्थीतीने नवीन समस्या तर उद्भवणार तर नाही ना? या विचाराने गौतमी भयभीत झाली.
अशाच चिंतेत दिवस सरत असतां नाच ध्यानी मनी नसतांना एके दिवशी अगदी अनपेक्षितररित्या स्वपावलांनी पितामह भीष्म त्यांच्या कुटीत प्रवेशले व म्हणाले,द्रोणाचार्य! सुर्य कुठेही लपला तरी त्याचा प्रकाश दडुन राहत नाही. सुंगधावरुन फुलांटचा पत्ता लागतोच. काल इष्टीकाच्या सहाय्याने राजकुमारांची कोरड्या विहिरीत पडलेली विटी काढण्याचे कसब फक्त द्रोणाचार्याशिवाय कोणीच करुं शकत नाही याची खात्री असल्यामुळे,तुम्ही कृपाचार्यांच्या आश्रमा त राहतां असे कळल्यावरुन आपल्यावर एक जबाबदारी सोपवण्यासाठी इथे आलोय!आजपासुन कुरुकुलाचं आचार्य पद स्विकारावं.यापुढे कुरुकुलातील सर्वजन आपल्या आज्ञेत राहतील व सर्व वैभव आपल्या सेवेला हजर असेल याची हमी कुरुकुलातील एक जेष्ठ म्हनुन हमी देतो.आणि दुसर्याच दिवशी हस्तिना पुरच्या भर राजसभेत कुरुकुलाच्या आचार्यपदाची वस्रें प्रदान करण्यांत आली.हा भव्यदिव्य सोहळा सर्वजन डोळे भरुन पाहत होते,त्यांत गौतमीही होती.फक्त धृतराष्र्ट अंध म्हणुन आणि पती अंध म्हणुन स्वतःच्या डोळ्यावर बांधुन असणारी गांधारी पाहु शकत नव्हते.गौतमीची नजर गांधारीवर स्थीर होऊन तिच्या मनांत प्रश्नांचे मोहोळ उठले.जन्मतःच धृतराष्र्ट अंध हे त्यांचे दुर्देव!पण परमेश्वराने दिलेल्या डोळ्यांवर पट्टी बांधुन नेत्रांना निरुपयोगी बनविण्या चा गांधारीला अधिकारच काय?जी निर्मिती आपल्याकडुन झालीच नाही त्याला मिटवण्याचा लपवुन ठेवण्याचा काय अधिकार? हा विश्वनिर्मात्याचा अपमानच नाही का?
वास्तविक पातिव्रत्याचा डांगोरा पिटण्यासाठी गांधारीने स्वतःच्या डोळ्या वर पट्टी बांधण्याचा निर्घृण!, स्रीत्वाचं मोल कमी करण्याचा, विश्वनिर्मात्याच्या कुशल कारागिरिला हीन लेखण्याचाच हा प्रकार नाही कां? पुरुषप्रधान समाजात स्री ही नुसती भोग्यवस्तु म्हणुनच पाहण्या चा,तीला आपल्या सुखासिनतेचं साधन बनविलं जातं.द्रोणांची माता धृता,गौतमी ची माता जानपदी आणि पातिव्रत्याचा डांगोरा पिटणार्या गांधारीसारख्या स्रियां वरच उत्तरदायित्व येते.
गांधारी महाराणी असुन तिच्यापुढे सर्व सुखसुविधा असल्यामुळे तिला शक्य झाले,पण गौतमीसारखी जर परिस्थिती तिच्यासमोर असती तर,तिला डोळ्यांवर पट्टी बांधुन राहणे शक्य होते कां?अशा स्रियांची समाज नोंदही घेत नाही.मात्र गांधारीचं पातिव्रत्य….
सर्वांना जरी गांधारीबद्दल आदर वाटुन तिच्या पातिव्रत्याचे कितीही पोवाडे गायले तरी गौतमीला मात्र तिच्याबद्दल घृणाच वाटत होती,कारण गांधारी सारख्याच स्रीया समस्त स्री जातीच्या अपमानाचं निमित्य बनतात.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! गौतमी !!!
भाग – १९.
गौतमी अशी विचारांच्या आवर्तना त मग्न असतांनाच द्रोणांची हाक तिच्या कानावर पडली.गौतमी!आजच्या या सोहळ्यासंबंधी दोन गोष्टी प्रकर्षाने जाण वल्यात बघ!बालपणाची निष्पाप मैत्री विसरुन सत्तांध बनुन द्रुपदाने काळजावर घातलेला घाव,आणि अनपेक्षितरित्या निर्धतेऐवजी द्रोणांतील शस्रास्र विद्या नैपुण्य पाहुन कुरुकुलाने बहाल केलेले आचार्यपद! केवढा फरक?आतां फक्त एकच ध्येय समोर आहे,कुरुकुलाची जबाबदारी पार पाडत अश्वत्थामाला सक्षम करुन द्रुपदाचा प्रतिशोध घेणे. कारण द्रोणांचा अज्ञातवास उघड झाल्या मुळे द्रुपद स्वस्थ बसणार नाही.द्रोणांना जे हवय ते प्राप्त झाल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाही.तेवढ्यासाठीच त्यांना प्रिय असलेलं अध्यापन, आश्रम सोडुन अज्ञातवास आणि कृपाची मेहेरबानीही स्विकारली.जोपर्यत द्रुपद निर्धनावस्थेत त्यांच्या समोर येणार नाही,केलेल्या अपमानाने खोल झालेल्या जखमेच्या वेदना कमी होणार नाही.द्रोण अस्वस्थ म्हणुन पति धर्मानुसार गौतमीही अस्वस्थच राहणार.
द्रोणाचार्यांनी इतर मुलांना सुगावा लागु न देता अश्वत्थामाला नारायणास्र शिकवित होते .दुजाभाव करत असल्या ची जाणीव,खंत द्रोणाचार्यांना होती पण सूडाच्या भावने पुढे हे अन्यायी कृत्य त्याच्या हातुन घडत होते.
राजकुमारांना आतांपर्यत शिकवले ल्या विद्येतील प्राविण्य सोहळ्याच्या प्रदर्शनाचा दिवस उजाडला.प्राविण्य प्रदर्शनात पांडवांची सरशी झाली.पण दृष्ट लावली ती कर्णाने.हा सोहळा फक्त कुरुकुलातील राजकुमारांसाठीच असल्यामुळे कृपाचार्यांनी कर्ण सूतपुत्र असल्यामुळे या सोहळ्याच भाग घेण्यास अनुमती दिली नाही.पण कौरवांनी व प्रत्यक्ष धृतराष्र्टांनी कर्णाला पाठीशी घालण्याचा अविचार केल्यामुळे मात्र द्रोण दुखावल्या गेलेत.प्रदर्शनानंतर दुखावल्या मनःस्थितीत पर्णकुटीत परतल्यावर,गौतमीने त्यांचे दुःख कमी करण्याच्या उद्देशाने,एवढा कसला विचार करतां म्हणुन विचारल्यावर,द्रोण म्हणाले, आतां कसला विचार? मी जे द्यायचे ते देऊन टाकले,फक्त त्याचा वापर कसा आणि कोणत्या कामासाठी करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे! याच साठी जेव्हा राजा निषधपुत्र एकलव्य माझं शिष्यत्व मिळविण्यासाठी आल्यावर त्याचा विनम्र स्वभाव,बळकट शरीरयष्टी,व कोणतेही कष्ट करण्याची तत्परता पाहुन क्षणभर त्याला शिष्यत्व देण्याचा मोह झालाही, परंतु धर्मवचनानुसार दान नेहमी सत्पात्री द्यावं!त्याला शिष्यत्व नाकारल्याचे दुःख झाले पण,कारणही तसेच सवळ होते. निषाधराजा हा मगध देशाच्या मायावी आणि मंत्रतंत्र जाणणार्या जरासंधाचा पाठीराखा असल्यामुळे उद्या जर युध्दाचा प्रसंग आलाच तर,मी शिकवलेली विद्या वडीलांच्या आज्ञेस्तव जरासंधाची पाठ राखण करील व माझी विद्या कलंकित होईल या भयाने त्याचे शिष्यत्व नाकारले.
या विद्येने मात्र कौरव पांडवांत वैराचे बीज रोवुन कलह निर्माण झाल्यास भविष्यकाळ मोठा बिकट आहे.राज्य लोभाने व अंधपुत्रप्रेमाने प्रत्यक्ष धृतराष्र्ट व सोबतीला शकुनी यांनी पांडवाविरुध्द द्वेषाचे बिजारोपण केले,आणि त्यांना बळ देण्याचे काम माझेकडुन झाले,हे दुतोंडी समाजाच्या डोक्यात आल्या शिवाय राहणार नाही, वास्तविक कुरु कुलाचं आचार्यपद स्विकारण्यापुर्वी अश्वत्थामाला सर्व प्रकारची विद्या देऊन संपन्न करण्याचा मानस होता,पण अश्वत्थामाचा नाकर्तेपणा व अर्जुनाची शिकण्याची जिद्द व चाणाक्षपणामुळे त्यांचा डाव उधळला.आणि दुर्देवाने अश्वत्थामा त्यांच्यापासुन दुरावत गेला.या उलट अर्जुनाचा विनम्र स्वभाव, व परिश्रमाने द्रोणांचे मन जिंकुन जवळ आला.आणि त्यांच्या जवळची विद्या फक्त अर्जुनालाच देण्यासाठी वचनबध्द झालेत.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! गौतमी !!
भाग – २०.
अर्जुनाचा विश्वास संपादन करण्या साठी गुरुदक्षिणा म्हणुन एकलव्याचा अंगठा घेतल्याचे ऐकुन गौतमी म्हणाली, आपल्यासारख्या शस्रास्रविद्या संपन्न व्यकी एका श्रेष्ठ धनुर्धराचा अंगठा मागण्याचे क्रूर कर्म करुच कसे शकलात प्राणाशिवाय शरीर तसंच अंगठ्याशिवाय धनुर्धन!द्रोण म्हणाले,गौतमी! अग! एक लव्यासारख्या कुशल धनुर्धनाचा अंगठा घेऊन त्याला निष्र्पभ करण्याचे दुष्ट कर्म स्वप्नात तरी ह्या द्रोणाकडुन होईल का?जी गोष्ट फार थोड्यांना माहित आहे, ते म्हणजे,या भूमंडलात एकलव्यच असा धनुर्धर आहे की,जो धनुर्विद्येसाठी अंगठ्याचा उपयोग कधीच करीत नाही. अन्य चार बोटांचाच उपयोग करतो.त्याचे चार बोटे शिल्लक ठेवुन निरुपयोगी अंगठा तेवढा घेतला.
कौरव पांडवांचे अध्ययन संपल्यावर प्राविण्य प्रदर्शनानंतर गुरु दक्षिणा देण्याचा प्रश्न समोर आल्यावर द्रोण कौरव पांडव राजकुमारांना म्हणाले, द्रुपदराजाला निर्धन बनवुन माझे समोर उभे केल्यास हीच माझी गुरुदक्षिणा समजेन. कर्णासह कौरवबंधु मोठ्या उत्साहाने द्रुपदराजाचा पराभव करायला गेलेत,पण त्यांनाच पराभव पत्करावा लागला.एकट्या अर्जुनाने सतांध बनलेल्या द्रुपदराजाला निर्धन,सत्ताहीन करुन द्रोणाचार्यांसमोर बंधनावस्थेत उभे केले.द्रुपदाला बंधनमुक्त करुन त्यांचे यथोच्चित स्वागत केल्यावर द्रोण म्हणाले द्रुपदा! मला सत्तेचा लोभ कधीच नव्हता व नाहीही.म्हणुनच तुझं राज्य परत करतो मात्र परत तुला सत्तांधतेचा मोह होऊन मैत्रीस हीन लेखु नये म्हणुन,माझं स्वतःचं अहिच्छत्र राज्य फक्त माझेकडे ठेवतो. अर्थात ते सुध्दा कुरुंच्या स्वाधीन करणार आहे.द्रोणांची इच्छा पूर्ण झाल्यावरही ते अस्वस्थच होते.कारण द्रुपदाबरोबरच्या युध्दात कौरवांपेक्षा पांडव श्रेष्ठ ठरल्याचे शल्य कौरवांना बोचु लागल्याने ते असूये ने पछाडले शिवाय राजलोभाने धृतराष्र्ट ही त्यांना साथ देताहेत. असत्मार्गाने पांडवांना अधिकारापासुन वंचित करण्या च्या दृष्टीने पांडवांना वारणावतात पाठविण्याचे कपटकारस्थान रचल्या जात असल्याचे समजले.
सत्मार्गी पांडवांना वैर,वितुष्ट नको म्हणुन ते जायला तयार झालेत.हा अन्याय होत आहे हे ठाऊक असुनही पितामह भीष्म,कृपाचार्य,धर्मात्मा विदूर आणि स्वतः द्रोणाचार्य बदलु शकले नाही
शिवाय द्रोणच्या नाशासाठी द्रुपदराजाने यज्ञाचे पौरोहित्य करण्यासाठी दहा हजार गोधन देऊन याज व उपयाज या दोन ब्राम्हण बंधुना तयार केलय!त्याची फलश्रुती म्हणुन यज्ञ यशस्वी होऊन प्रत्यक्ष अग्निदेवतेने प्रसन्न होऊन एक पुत्र व कन्या दिली.आणि परत गौतमीची झोप वैरीण बनली.
ही वार्ता ऐकुन गौतमी स्वतःवरच चिडली,संतापली.स्रीची अगतिकता,असह्यता,दुबळेपणाचा संताप आला.विद्याभ्यासी,शस्रास्र विद्या पारंगत,कुशल अध्यापक अशा लौकिकास पात्र असलेल्या द्रोणांशी विवाहसंबंधात अडकवुन घेतल्या बद्दल खरोखर पहिल्यांदाच पश्चाताप होऊ लागला.कारण ती आर्य स्री, सौभाग्याला बहुमोल महत्व समजणारी,अहेवपणाला उदंड आयुष्य मिळावं म्हणुन व्रतवैकल्यं,उपास तापास,नवसससायास करणारी,पती लाच परमेश्वरच मानणारी त्याच्या सुखदुःखात आपलं अस्तित्व पाहते ना? काय नाही भोगले गौतमीने?
उपवास, कष्ट, निर्धनता, समाजाचा उपहास सहन करत अकाली यौवन करपले,सार्या भावनांची होळी झाली, स्वप्न मातीत मिळाली,अपेक्षाभंग दैवी आलं,तरी सर्व हसतमुखाने स्विकारलच ना? कशासाठी?पतीच्या सुखासाठीच ना? पण त्यांनी तिच्या भावभावनांचा कधीच विचार केला नाही.पण त्यांच्याच नाशासाठी द्रुपदला यज्ञपुत्र झाल्याचे कळल्यावर मात्र तिला नवर्याचा भयंकर संताप आला.वेळीच नागाचे डोके ठेचले असते तर………
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

