संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा ६६ ते ७०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

मध्यबिंदनाद उन्मनि स्वानंद अभंग क्र.६६

मध्यबिंदनाद उन्मनि स्वानंद । रुपरस गोविंद गुणनिधी ॥
ते रूप सुरवर सोविती अरुबार । नित्यता सविचार भोगीताती ॥
गौळिया गोजिरे दैवत साचारे । नंदासि एकसरे प्रेम देत ॥
निवृत्ति निवाला प्रेमरसे धाला । सर्व सुख डोळा हरिकृष्ण ॥

अर्थ: मध्य बिंद म्हणजे ॐकाराचा वरचा बिंदु ज्याला शुन्य म्हणा पण ह्या शुन्यात निर्मिती आहे. किंबहुना येथुन सुरवात आहे. ते स्थान शरिरात दोन डोळ्यामध्ये आहे तेथे उन्मनी अवस्थेत जो ब्रह्मानंद होतो तो स्वानंद सकल गुणाचा स्वामी गोविंद आहे. त्याच रुपा नित्य स्मरण करुन सुरवर सुख अनुभवतात.ते गोजिरे दैवत गोकुळात गौळी व नंद यांना प्रेम देत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ते सर्व गोकुळातील सुख मी माझ्या डोळ्यानी पाहिल्यामुळे निवांत झालो आहे.

विश्वाते ठेऊनि आपण निरंजनी अभंग क्र.६७

विश्वाते ठेऊनि आपण निरंजनी । नामाची पर्वणी भक्तालागीं ॥
ते रूप संपुर्ण वसुदेवाकुळी । यादव गोपाळी वोळलासे ॥
व्यापकपण धीर ब्रह्मांड साकार । ते रूप तदाकार भाग्ययोगे ॥
निवृत्ति घनवट आपण वैकुंठ । कृष्णनामे पेठ गोकुळीं रया ॥

अर्थ: विश्वाची निर्मिती केल्यावर निरंजनी राहिलेल्या ह्या परमात्माच्या नामाची पर्वणी नामसाधना करुन भक्त साधतात.तोच परमात्मा वसुदेवाच्या कुळात जन्मुन यादवकुळी गोकुळात राहिला गेला.ह्या विश्वाचा आधार तो परमात्मा असुन तो तदाकार रुपाने प्रतित होतो.निवृत्तिनाथ म्हणतात त्या घनवट परमात्माने कृष्णनाम योगाने गोकुळात वैकुंठ पेठ निर्माण केली.

विश्वंभरमूर्ति विश्वाचे पाळक अभंग क्र.६८

विश्वंभरमूर्ति विश्वाचे पाळक । वैकुंठव्यापक जीवशिव ॥
ते रूप सुंदर नंदघरीं वसे । जनीवनी वसे कृष्णरुप ॥
निखळ निघोट नितंब परिपूर्ण । आनंदपूर्णघन गोपवेषे ॥
निवृत्ति परिकर वैकुंठ अपार । भाग्य पारावार यशोदेचे ॥

अर्थ: विश्वाचे भरणपोषण तो परमात्मा विश्वाचा पालक आहे तो वैकुंठा पा़सुन जीवशिवा पर्यंत सर्वत्र तोच आहे. जनीवनी असलेले ते सर्वव्यापक रुप कृष्णरुपाने गोकुळात नंदाघरी आले. तो नितळ, निघोट परमात्मा कंबरेला पितांबर बांधुन गोपवेशात साकार झाला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ज्या सुंदरतेला मर्यादा नाहीत असा तो परमात्मा यशोदेचे मुल होऊन गोकुळात राहतो हे तिचे भाग्य आहे.

त्रिभंगी त्रिभंग जया अंगसंग अभंग क्र.६९

त्रिभंगी त्रिभंग जया अंगसंग । एकरूप सांग वोघवतसे ॥
ते रूप सावळे भाग्ययोगे वोळे । नंदाचे सोहळे पाळियेलें ॥
श्रुतिप्रतिपाद्य शास्त्रांसि जे वंद्य । निर्गुणाचे आद्य भाग्यनिधी ॥
निवृत्ति नितंब रूपस स्वयंभ । कृष्णनामे बिंब बिंबलेसे ॥

अर्थ: जरी कृष्ण रुपात तिन ठिकाणी वाकडा देहुडा असलेला परमात्मा मात्र एकात्मरुपाने जगात आहे. ते सावळे सुंदर कृष्ण रुप दैवयोगाने नंदाला प्राप्त झाले आहे. व ते नंदाचा आनंद द्विगुणित करत आहे. ज्याचे वर्णन करायचा प्रयत्न वेद व शास्त्र करतात जो वेदांना वंद्य आहे. ते निर्गुण गणातीत स्वरुप आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्या पितांबरधारी सुंदर रुपाने माझा अंतःकरणाला व्यापले आहे.

ज्याचे स्मरणे कैवल्य सांडणे अभंग क्र.७०

ज्याचे स्मरणे कैवल्य सांडणे । एका नामे होणे चतुर्भुज ॥
ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळीं । नंदाचिये कुळी बाळकृष्ण ॥
न संपडे ध्यानी लाविता उन्मनी । तो गोपाळाचे कानी सांगे मातु ॥
निवृत्ति अरुवार कृष्णरूपी सेवी । मन ठाणदिवी हृदयामाजी ॥

अर्थ: ज्या चतुर्भुज रुपाच्या नामाचे स्मरण जरी केले तरी त्या पुढे वैकुंठतील कैवल्याला ही फिकेपण येते. नंदाच्या घरी अवतरलेल्या त्या रुपामध्ये गोकुळाचे जन वैकुंठाचे सुख भोगतात. जे उन्मनी अवस्थेत समाधी लावलेल्यांच्या ध्यानात सापडत नाही ते रुप गोपाळाच्या कानाशी हितगुज करते. निवृत्तिनाथ म्हणतात मी त्या रुपाच्या लामणदिवा बनवुन माझ्या हृदयात स्थापन केला व त्या योगे ज्ञानप्रकाश सुख उपभोगत आहे.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading