संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा ७१ ते ७५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

विकट विकास विनट रूपस अभंग क्र.७१

विकट विकास विनट रूपस । सर्व हृषिकेश दिसे आम्हा ॥
ते रूप साजिरे नंदाचे गोजिरे । उन्मनिनिर्धारे भोगू आम्ही ॥
विलास भक्तीचा उन्मेखनामाचा । लेशु त्या पापाचा नाही तेथे ॥
निवृत्ति म्हणे ते सुखरूप कृष्ण । दिननिशी प्रश्न हरि हरि ॥

अर्थ: ह्य जगतात काही रुप विक्राळ, प्रचंड, कुरुप आहेत. व काही रुप सुंदर साजिरी असली तरी ती सर्व एकत्वाने त्या हृषिकेश रुपात एकवटली आहेत. पण सुंदर शोभिवंत असे नंदाच्या घरी अवतरलेले कृष्ण रुप आम्ही उन्मनी अवस्थेत भोगत आहोत. असे रुप ज्याच्या मनात संचरते त्याच्या मनात पापाचा लवलेशही राहात नाही. निवृत्तिनाथ म्हणतात तोच सुखरुप असलेला परमात्मा कृष्णरुपनामाने हृदयातील नामरुप प्रश्नांचे नामरुप उत्तर होतो.

गगनाचिये खोपे कडवसा लोपे अभंग क्र.७२

गगनाचिये खोपे कडवसा लोपे । क्षरोनिया दीपे दृश्यद्रष्टा ॥
तो वोळले गोकुळीं वसुदेवकुळी । पूर्णता गोपाळी गोपीरंगी ॥
जिवशिवसीमा नाही जेथे उपमा । हारपे निरोपमा तया माजी ॥
निवृत्ति तत्पर वेदांचा ऊँकार । ऊँतत्सदाकार कृष्णरूपे ॥

अर्थ: गगनाच्या घरात कवडसा पडण्याच्या जसा योग नसतो तसा दृष्य, द्रष्टा व दृष्यत्व ह्या त्रिपुटीचा लय त्याच्या रुपात होतो. त्याच रुपात ते गोपाळ व गौवळणी रममाण झाले. ते गोकुळात वसुदेवकुळातुन आले. ज्याला जीवशिवाची सिमा नाही कोणतीही उपमा नाही किंबहुना सर्व उपमा त्या रुपाच्या ठिकाणी संपतात निवृत्तिनाथ म्हणतात वेदांची सुरवात असणारा ओंकार., तोच त्या कृष्णरुपाशी तदाकार आहे त्यात मी निमग्न आहे.

गगनी वोळले येते ते देखिले अभंग क्र.७४

गगनी वोळले येते ते देखिले । दर्पणी पाहिले बिंबलेपण ॥
ते रूप सुरुप सुरूपाचा विलास । नामरूपी वेष कृष्ण ऐसे ॥
सांडुनी धिंटिव जालासे राजीव । सर्वत्र अवेव ब्राह्मपणे ॥
निवृत्ति घडुला सर्वत्र बिंबला । दर्पण वीराला आत्मबोधी ॥

अर्थ: जसे दर्पणात पाहिले तर स्वस्वरुप दिसते. तसे परमात्म्याचे विश्वात्मक स्वरुप गगनी प्रकाश रुपाने भासते. त्याच विश्वात्मक रुपाने कृष्णावतारात सुंदर देखणे असे सावळे रुप घेतले आहे. व ते रुप धारण करुन धिटाईने राज्यकारभार पाहिला तरी त्याचे सर्व अवयव ब्रह्म स्थितीच होते. निवृतिनाथ म्हणतात, त्या स्वरुपाचे सर्वात्मक घटांत प्रतिबिंब दिसते.त्याच परमात्म्याचे ज्ञान होते ह्या भावनेचा लय त्याच्या स्वरुपात होतो.

क्षीराचा क्षीरब्धि क्षरोनिया लोटे अभंग क्र.७५

क्षीराचा क्षीरब्धि क्षरोनिया लोटे । वैकुंठ सपाटे पाटु वाहे ॥
ते माये हरिरुप कृष्णरूप माझे । नेणिजे ते दुजे इये सृष्टी ॥
सांडुंनी उपमा गोकुळीं प्रगट । चतुर्भुजपीठ यामुनेतटी ॥
निवृत्ति निकरा वेणु वाहे धरा । यमुने स्थिरस्थिरा नामध्वनी ॥

अर्थ: क्षीरसागराला भरती ओहटी असली तरी वैकुंठात वाहणाऱ्या प्रेम पाटाचे पाणी समान वाहते. त्यात कमी जास्त होत नाही. त्या मायेने निर्मित केलेल्या कृष्णरुपाला पाहिले की मला सृष्टीतील दुसरे रुप पाहता येत नाही किंवा पहायचे नाही. अनुपम्य वैकुंठ लोकातील चतुर्भुज रुप सोडुन ते ब्रह्म गोकुळात कृष्णरुपात आहे. निवृतिनाथ म्हणतात त्या कृष्णरुपात वाजवलेल्या मधुर मुरली मुळे यमुनेचे अवखळ जळ ही स्थिर झाले.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading